subhash inamdar
subhash inamdar
Monday, March 26, 2012
ग्रेस सरांची एक आठवण-चंद्रशेखर गोखले
सांगावीशी वाटते... आमची प्रत्यक्ष ओळख होण्याचा योग कधी आला नाही पण त्याना कायम माझी खबरबात कळायची, त्याची सूरूवात झाली ते मी `सामना`त सदर लिहायला लागलो तिथपासून, म्हणजे साधारण सतरा अठरा वर्षांपूर्वी...माझा एक मित्र मला `सामना`मधे घेऊन गेला आणि माझं पान नावाचं एक सदर मी दर शनिवारसाठी लिहायला लागलो.
अल्पावधीतच ते सदर अपेक्षेपेक्षा लोकप्रियं ठरलं मग ज्याला मी माझा मित्र समजत होतो त्यालाच
त्याचा त्रास व्हायला लागला. थोडक्यात पोटात दुखायला लागलं आणि घाणेरडं राजकारण करून त्याने माझं सदर
परस्पर रद्द करून टाकलं.
त्या नंतर एकदा ग्रेससर राऊत साहेबांना भेटले तेंव्हा त्यानी आवर्जून माझ्य़ा सदराबद्दल विचारलं म्हणाले का बंद केल? फार वेगळं लिहित होते ते वगैरे वगैरे.. राऊत साहेबानी मला हे आवर्जून सांगितलं आणि पून्हा मी `सामना`मधे नियमाने लिहायला लागलो...नंतर माझा कथासंग्रह आला मनोगत, तेंव्हाही ग्रेस सरानी संग्रह वाचल्यावर मला लगेच निरोप पाठवला कथा वाचल्या आवडल्या... पवईला आम्हा दोघाना शेजारच्याच इमारतीत सदनिका मंजूर झाली होती सात वर्ष आम्ही तिथे राहिलो पण तरी भेट झाली नाही पूढे आम्ही ते घर विकून चारकोपला स्थाईक झालो आणि काही दिवसातच मेहेंदळे सरांबरोबर निरोप आला चारकोप आवडल का?
मी हो म्हणत त्याना आगत्याचं घरी यायचं निमंत्रण दिलं ... पण योग नव्हता... गेला आठवडा मी आणि उमा
" वा-याने हालते पान"या त्यांच्या संग्रहाचे पारायणच करतोय...
भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे पठडीतली भाषा त्याना रुचायची नाही...त्यांचं स्मरण हिच त्याना श्रद्धांजली ठरेल..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment