राज्यस्तरीय `स्टार बॅटल्स` स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्राच्या कोप-या कोप-यात
दडलेल्या कलाकारांच्या शोधासाठी आणि त्यांना पुरस्कृत करुन त्यांच्या कलेला अधिक
मोठ्या प्रमाणात वाव आणि व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने
कै.लक्ष्मीकांत बेर्डे फाउंडेशन आणि मास्टर इव्हेंस्ट हे `स्टार बॅटल` ही राज्यस्तरीय स्पर्धा लवकरच जाहिर करीत आहेत. याची
प्राथमिक फेरी पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर
अशा शहरांमध्ये १६ ते १८ नोव्हेंबर २०१२ ला होत आहे. यात गायन, वादन आणि नृत्य या
संगीत क्षेत्रातल्या कलेतील वय वर्षे ७ च्या पुढील कलावंतांना सहभागी होता येणार
आहे.
बुधवारी पुण्यात या संदर्भात आयोजकांच्या वतीने यासाठी काम करणा-या
परिक्षकांसाठीचे एक विचारमंथन मेळावा आयोजित केला होता. यात विजय बक्षी( गायन),
धनंजय दैठणकर (संतूर वादक),स्वाती दैठणकर (भरत नाट्यम), संजय करंदीकर (तबला) आणि
शर्वरी जमेनिस-फाटक(कथ्थक) यांचे मार्गदर्शन लाभले.
आजच्या काळातही यातून अभिरुची जपून सादरीकरणाराचा दर्जा सांभाळण्याचे भान आयोजकांच्या
वतीने केले जाईल. योग्य वयाला साजेसे आणि त्यात्या क्षेत्रातल्या संस्काराचे भान ठेऊन
स्पर्धक यात सहभागी होतील अशी आशा आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने अभिनयाच्या स्पर्धाही घेण्याचे आयोजकांच्या
मनी आहे...मात्र आत्ता भारतीय संगीताच्या क्षेत्रातल्या गुणवंतांसाठी `स्टार बॅटल`च्या वतीने गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धची घोषणा केली जाणार
आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नावाने सुरु केलेले हे फाउंडेशन २००५ साली सुरु
केले गेले. नवीन कलाकारांना रंगमंच मिळत नाही आणि त्यांना महागड्या अभिनय शाळेत
जाणे जमत नाही अशा कलाकारांसाठी काहीतरी करावं हे त्यांचे (लक्ष्मीकांत बेर्डे ) स्वप्न
होते. यातूनच या संस्थेचा जन्म झाला..अभिनेत्री प्रिया बेर्डे हे कार्य याद्वारे
पुढे नेत आहेत. त्यांच्या सोबत आहेत रिचा शहाही आहेत.
या संस्थेने आत्तापर्यंत
मुंबई, बेळगांव इथे अभिनय आणि नृत्याची प्रशिक्षण शिबीरे यापूर्वी घेतली आहेत
.
कोणत्याही कलेचा प्रचार आणि प्रसार हा नेहमीच लहान मुलं आणि युवकांवर अवलंबून
असतो. कलेच्या प्रचाराचे ते शिल्पकार असतात. म्हणूनच त्यांच्याकडे योग्य प्रकारे
लक्ष दिले तर कलेच्या क्षेत्रात काहीतरी नक्कीच चांगले घडू शकेल या विश्वासावर कै.लक्ष्मीकांत
बेर्डे फाउंडेशन आणि मास्टर इव्हेंस्ट या दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन या
राज्यस्तरीय स्पर्धेचे नियोजन सुरु केले आहे
....
....
डिसेंबर १६ ह्या त्यांच्या स्मृतिदीनी दरम्यान याची अंतीम फेरी घेण्याची
आय़ोजकांची इच्छा आहे..अवघ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीत या बहुगुणी आणि बहुरुपी
कलावंताने आपल्या अभिनयाने महाराष्ट्राला ..तमाम मराठी प्रेक्षकांना वेड़ावून
सोडले होते...या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या गुणांची आरती करून पुढील पुढ्यांना
प्रेरणा देण्याचे काय या निमित्ताने होत आहे, ही सर्वात आनंदाची गोष्ट म्हणावी
लागेल.
सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276