subhash inamdar
subhash inamdar
Sunday, April 29, 2012
तुमची प्रसन्नता इतरांना प्रसन्न् करेल
मन करा रे प्रसन्न!
लोकबिरादरीच्या मदतनिधीसाठी रविवारी आयोजिलेल्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे रसिले साक्षात्कार ऐकणे. मनोहर मंगल कार्यालयात जमलेल्या तीनशेएक लोकांना दीड तास हा माणूस माणसात राहून अनेक माणसांना हसवित होता..त्यात गंभीरता होती. त्यात स्वतःला शोधण्याचा मार्ग होता. आहे त्या परिस्थितीत आनंदी कसे रहावे याचे ते ओजस्वी भाषेतले स्वैर चिंतनच होते.
स्वतःबद्दचा अंदाज चुकणे...थोडक्यात स्वतःला ओळखायला शिका..
मन कुणाजवळ तरी प्रकट करणे..
विरोधाभासमय जीवनाचा विचार सोडून द्या..
मनाविरुध्द घडणा-या गोष्टीसाठी निराश होणे..
पैसा हे ही निराशाचे मोठे कारण..
नको त्या गोष्टीची अनावश्यक प्रसिध्दी देणारी वर्तमानपत्रे..
देशाचा राजकिय प्रवास चांगला झालेला नाही...
म्हणूनच व्यक्तिपासून राजकारणापर्यंत सगळीकडे अप्रसन्नता आहे..
मन प्रसन्न कसे करता येईल...
व्यक्तित बदल घडवायचा असेल..तर...आधी सर्वात उत्तम आरोग्य हवे..
मनमोकळं हसा...
स्वतः सकाळी उठल्यावर आरशात स्वत-ला पहा...इतरांना पाण्यात पाहणे.. सुटेल
विचारसरणी गोलाकार ठेवा..सर्वांनाच तुमचे बरोबर म्हणा. त्यांचेही ऐका..
आपल्या जागेत बदल करा... म्हणजे विचारात..अहंपणात..
आपाआपच वाटेल सारे जग गजाआड आहे मी मुक्त आहे..
क्रोध स्वतःच्या ताब्यात ठेवायला शिका..
आनंदाने तृत्पीने जगा..
मन कमळासारखे फुलायला हवे..
तुमची प्रसन्नता इतरांना प्रसन्न् करेल....
मन मोठं करुन जगाकडे विशेषत. स्वतःच्या कुटुंबाकडे पहायला शिका...
अनेक मुद्दे त्यांनी मांडले.. त्याची रोजच्या जिवनातील उदाहरणे दिली... बारीक गोष्टीतून आनंद कसा घ्यावा दुखः विसरुन आनंदाला कसे सामोरे जा..ह्याचा धडाच त्यांना दिला...तोही सामूहिक पध्ततीच्या या वेगळ्या व्याख्यानातून..
त्यासाठी गाणी, कविता आणि स्वतः छोट्या छोट्या गोष्टीतून धडे कसे घेतले घ्यावेत..हे ही सांगून टाळ्यांनी त्यानी दाद घेतली...
अपंगाच्या कल्याणाकरीता संजय उपाध्ये यांनी आत्तापर्यंत २२ लाख रुपयांचा निधी त्यांच्या कार्यक्रमातून मिळवून दिला. याही कार्यक्रमाचे मानधन त्यांनी डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतनिधीसाठी समर्पण केले. कार्यक्रमातून जमलेला निधीही त्या कार्यासाठी दिला जाणार आहे.
अनेकविध अनुभवांचे विश्व सांगणारी या प्रकल्पाची माहिती असलेली चित्रफित उपस्थितांना दाखवून त्या कार्याचे मोल बोलते केले.
अखेरच्या टप्प्यात अनिकेत प्रकाश आमटे ह्यांनीही हेमलकसातल्या अनुभवाविषयी संवाद साधला. त्यांना बोलते केले ते लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचे पुंडलिक वाघ यांनी.
अनेकविध स्तरातील तरुण आणि उत्साही कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने यासाठी शिल्पा तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून झटत होते. यात नचिकेत बापट, क्षितीज खटावकर, तनुजा कुलकर्णी.अनघा भावे असे अनेकजण आहेत..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
रोजचीच जगण्याची लढाई, रोजचेच आहे ते काम,
क्षणाचीही नाही उसंत, आणि हरवला माणूसाकीतला राम,
घटकाभर काढूनिया वेळ, जाणूयात आपल्या गोष्टी भिन्न-भिन्न,
.......मन करा रे प्रसन्न......मन करा-रा रे प्रसन्न......!!
... कलियुगात ह्या मोबईल, इंटरनेट जगण्यासाठी आवश्यक,
मुलभूत गरजा राहिल्या पुस्तकात.......वस्त्र, निवारा आणि अन्न,
विज्ञानाचे युग अवतरले, आधुनिकीकरणाचे वारे वाहिले,
तारेल का रे त्याला देव, उकल करूयात याची......
म्हणा............मन करा रे प्रसन्न.....मन करा-रा रे प्रसन्न......!!
कुणी केले राजकारण, तर कुणी आणतोय परिवर्तन,
नुसतीच आश्वासने, नुसत्याच घोषणा आणि समाजाचे अध:पतन:,
सामान्यांची व्यथा वेगळी, महागाईने झालेत सर्व खिन्न,
विसरुनिया थोडा वेळ सगळे, …..मन करा रे प्रसन्न..मन करा रे प्रसन्न....!!
--क्षितीज
Kshitij Khatavkar
email- xitijk@gmail.com
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment