subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, September 30, 2015

रसिक भारावले तिघींची नृत्यकला पाहून




मध्यंतरी तीन युवतींची नृत्यकला पाहण्याची संधी मिळाली..खरचं किती छान तयारी होती त्यांची.. आपल्या गुरुकडून भरतनाट्यमच्या सा-या प्राथमिक शिक्षणाच्या कला शिकल्यावर  गुरुंच्या म्हणजे नृत्यांजली संस्थेच्या प्रमुख सौ. अंजली गोखले-भाटवडेकर यांच्या परवानगीने  प्राजक्ता विवेक कुलकर्णी,चैतन्या चंद्रकांत जाधव आणि मुग्धा विजयकुमार पाध्ये यांनी पुण्याच्या बालशिक्षण मंदीरात आपला पहिला जाहिर कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम..सादर केले

आणि खरोखरीच रसिकांना नृत्यकलेतील निपुणतेचे दर्शन घडविले.

मलरी, अलारिपू, जातीस्वरम, दशावतार..आणि मध्यतरांनंतर पदम्, तिल्लीना, अभंग आणि मंगलम्..अशी एकापेक्षा एक तयार रचनेतून केलेले सादरीकरण पाहताना या कलेत किती एकाग्रचित्त झाल्या आहेत हेच स्पष्ट होत होते.

यातले तांत्रिकपण जरी फारसे समजले नाही तरी जे काही त्या सादर करीत होत्या त्याला ताल, लय आणि त्पातल्या पदन्यासाचे ते एकचित्त स्वरूप पाहताना त्यांचा अभिमान वाटतो..

अशा कला पारंपारिक पध्दतीने आजही सादर केल्या जातात..आणि या अधुनिक काळाचे आवरण असलेल्या
जमान्यातही पालक आपल्या कन्यकांना ती सादर करण्यासाठी परवानगी देतात याचे अधिक बरे वाटते.
तसे पाहिले तर ह्या सर्वच कला शिकण्यासाठी असणारी जिद्द आणि पराकाष्ठ्येची भक्ती यातून दिसून येते..
आपल्या गुरूवर असलेला अढळ विश्वासही याला कारणाभूत ठरतो..

यासर्वांना साथसंगत करणारी मंडळीही उत्तम होती...गायक मयुर महाजन, मृदंगवर शंकर नारायणन्, पखवाज- राजू जावळकर, व्हायोलिन- रमाकांत परांजपे, सिंथेसायझर- केदार परांजपे आणि निवेदनाची यथायोग्य बाजू सांभाळणारे रवीन्द्र खरे यांचाही उल्लेख नक्कीच करावा लागेल.

यासाठी सौ. निलिमा व विवेक कुलकर्णी, सौ. उमा व चंद्रकांत जाधव आणि सौ. सषमा व विजयकुमार पाध्ये या माता-पित्यांनाही धन्यवाद द्यावासा वाटतो..
यासाठी आर्थिक झीज तर होतेच..पण कलेतले प्राविण्य मिळविल्यावर ते अद्भूत  सादरीकरण पाहण्यातला अभिमान तिनही माता-पित्यांना धन्यतेकडे घेऊन जातो..

अतिशय मृदु आणि निगर्वी अशा गुरु सौ. अंजली भाटवडेकर यांचे गोडवे गावे तितके कमी पडतील..
त्यांनी या तीनही कलावतींना देखणे रुप प्राप्त करुन कलेतील साधना एकाग्रतेने शिकण्याची जिद्द निर्माण केली...

पुढील काळात  त्या तीनही कलावती उत्तम नृत्यकलानिपूण होतील आणि आपल्या गुरूंचे, आई-वडीलांचे आणि भारतीय संस्कृतीचॉी महती पुढे उत्तमरित्या जपतील यात शंका नाही..त्यांना खूप सा-या शुभेच्छा.



-सुभाष इनामदार, पुणे