subhash inamdar

subhash inamdar

Tuesday, February 28, 2012

दैवतासमान कुसुमाग्रज....


फेब्रुवारी २७ सन २०११ ही तारीख म्हणजे कुसुमाग्रजांच्या जन्म शताब्दी वर्षाची आठवण मनावर कोरुन ठेवलेली. या निमित्ताने `गतिमान प्रॉडक्शन प्रस्तुत`, `रसयात्रा` ही अत्यंत साधेपणाने आलेली जाहिरात आकर्षून गेली. त्या कार्यक्रमाला मी वेदशास्त्रोजक सभेतल्या सभागृहात गेले होते. कुसुमाग्रजांचे सर्व साहित्य वाचून मानसी आपटे यांनी त्यांचे निवडक साहित्य या निमित्ताने समोर मांडले. वर्षापूर्वीचा तो कार्यक्रम आवडला पण भावला नव्हता.

बरोबर वर्ष झालं आणि मटातली जाहिरात बघितली आणि टिळक स्मारक मंदिरात निवडक कविता, नाट्यप्रवेश, कथा आणि गीतांवर आधारित `रसयात्रा` कार्यक्रमाला गेले.

अध्यक्ष सुधीर मोघे, ते स्वतःच स्फूर्तिचं उत्तमस्थान असल्याने त्य़ांच्या कुठल्याही कार्यक्रमाला मी नेहमी जातच असते. आजही त्यांनी आपल्या वेगळेपणाच्या भाषणात कुसुमाग्रजांनाही माहिती नसलेली कविता म्हणून दाखविली. ५० वर्षापूर्वीची कविता. ह्या कवितेने त्यांच्या मनात घर करुन ठेवलेले नी म्हणूनच ते कवी झाले. कुसुमाग्रजांच्या संस्काराने.

कुसुमाग्रजांच्या अनेक आठवणी माझ्याही मनात घर करुन गेल्या.

मी त्यांना प्रथम भेटले ती प्रभाकर पाध्येंकडे. प्रभाकर पाध्यांकडे दरमहा इंडियन रायटर्स तर्फे अनेक मोठमोठे लेखक जमत असत. त्यात कुसुमाग्रजही मुद्दाम नाशिकहुन येत. बापट, पाडगावकर, श्री.पु.भागवत, मे.पुं. रेगे, अशोक केळकर, दि.के बंडेकर..असे कितीतरी.. आणि त्यात कुसुमाग्रजांचे देखणे सात्विक व्यक्तिमत्व कुणालाही भारवून टाकणारे. तेथील पुंडलिकांच्या वेगळ्या विचारांवर ते भारावून गेलेलेही आठवतात. पुंडलिकांनाही त्यांच्याविषयी खूप आदर. विशेषकरुन चक्र, माता दौपदी, चार्वाक नाटकांवर खूष होऊन ते बोलत राहात. त्यांच्या आवाजातही.. बोलण्यातही गोडवा असे. हा कार्यक्रम बघत असताना मला हे सारं आठवत राहिलं.

त्यांच्या `गर्जा जयजयकार`शी मला सातवीपासूनची ओळख.पाठांतराला हीच कविता होती.

त्यांचा `दुसरा पेशवा`ही बघायला गेलेलो. आठवले. त्यातील त्यांच्या संवादाने. त्यावेळेलाही भारालेपण आले होते. त्यांनी बारकाव्यानी केलेल्या इतिहास वाचनाचेही कौतुक वाटलेले. आणि काशीबाईबद्दलही पेशव्यांच्या भावना खूप बारकाईने न्याहाळलेल्या. विशाखा हा कवितासंग्रह अनंतराव कुलकर्णींनी कुसुमाग्रजांच्य़ा सांगण्यावरुन पाठविलेला. त्या कवितांचे वाचन कितीतरी वेळा झालेले.

त्यांचे `विज म्हणाली धरतीला..`हे मला सर्वात आवडलेले नाटक. त्याच्या पहिल्या प्रयोगाला बालगंधर्वाला आम्ही गेलेलो. त्यातील काव्यमय भाषा आणि नाटकाच्या शेवटी आलेले कुसुमाग्रज आठवले. हा कार्यक्रम बघताना जणू ते स्वतः शेवटी येऊन बसलेले आठवले.

मानसी आपट्यांनी एवढ्या मोठ्या कुसुमाग्रजांच्या साहित्यातून निवडलेले तुकडे खूपच महत्वाचे आणि सामान्य वाचकांपर्यत पोचतील असे वाटते. त्यांच्या सगळ्या साहित्याची लयमयता, शब्दयोजना..जोरदार व ठशीव भाषाप्रभुत्व आहे. वर्षभर सततच्या त्यांच्या कार्यक्रमांना जाऊनही कुठेही तोच तोचपणा ..कंटाळवाणेपणा.. वाटला नाही., त्याचे हेच कारण.

पाठ्यपुस्तकातील कवितांमुळे प्रत्येक विद्यार्थ्य़ांच्या तोंडावर कुसुमाग्रज हे गोड व्यक्तिमत्वाच्या कविचे नाव परिचयाचे झाले. अनेक प्रेमगीते, प्रेमकथा ऐकल्या पण कुसुमाग्रजांनी `पृथ्वीचे प्रेमगीत` लिहून त्याला लखलखीत नक्षत्राचे अढळस्थान दिले. ही कल्पनाच जगाविरहित आहे. या गीताने कुसुमाग्रज हे नाव कवितेइतकेच तोंडातच बसले.

त्यांच्या लेखणीला जणू कालिदासापासून ते शेक्सपीअर पर्यंतच्या नाटककारांचा स्पर्श आहे. त्यानी कुठल्याही विषयावर चार ओळी लिहिल्या तरी त्यात काव्यात्मकता असते. मराठी भाषेबाबात बोलताना ते म्हणतात.. भरजरी वस्त्राच्या जोडीला लक्तरांना आणले.. ...हे एकमेव वाक्य सुभाषितासारखे रसात्मक बनले.....जणू ही मराटी मनासाठी आताच्या सद्यपरिस्थितील मराठी भाषेच्या संदर्भात अंतर्मुख करणारे काव्यच बनले. `मराठी भाषा मंत्रालयाच्या दारात मस्तकी राजमुकुट घालून आणि अंगावर लक्तरे लेवून उभी आहे......या वाक्याने मराठीचा उपेक्षा करणारे शासन. मराटी समाज थरथरून चळचळ कापत..विचार करायला लागला.

त्यांचे लेखन आजच्या पिढीने मनलावून अभ्यासले तर ते अनुपमेय असे सांस्कृतिक वाड्मयीन उच्च दर्जाचे संचितच ठरेल.

बालगंधर्व आणि लो. टिळक यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले... टिळक म्हणजे मार्तंड की सूर्यतेजाईतके तेजस्वी असूनही ते तापहिन होते. तर बालगंधर्व म्हणजे शीतल, अलांछन चंद्रमा होते....
आजच्या पिढीने या दोघांना न पाहताही त्यांच्या या वाक्याने या दोन महान देवतासमान पुरुषांपुढे आपोआपच मस्तक लवून त्यांना वंदन करतील अशी त्यांची थोडक्याच शब्दात केलेली वाखाणणी.

या महापुरुषाची भेट झाली की त्यांच्याबद्दल इतका आपलेपणा वाटायचा की ते आपल्याच कुटुंबातील एक आहेत असे त्यांच्या लेखनावरुन वाटत राहते. असे निर्विष. स्वच्छ मनाचा. गोडवाणीचा साहित्यिक आजपर्य़ंत झालेला नाही. म्हणूनच ते सर्वांना साहित्यातून प्रत्यक्ष भेटीतून दैवतासमान वाटत गेले.

आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर जे कार्यक्रम पाहिले त्यातून ते मनात ठासून पक्के झाले. त्यांच्या नावाचे जन्मस्थान, गोदावरी पुरस्कार असले तरीही ते समारंभ स्टेजवर हजर न राहता पहात..ऐकत. आले आहे.....

अशी त्यांची थोरवी गाताना आपल्या मनाला खरा आनंदयुक्त आदर वाटून आपोआपच मान वाकते हे त्यांचे श्रेष्ठत्व!-रागिणी पुंडलिक,
१४५६, सदाशिव पेठ, पुणे-३०
फोन. ०२०- २४४६०२३८V V Shirwadkar / “Kusumagraj” is a gem of a person, a poet, a social and cultural personality born in Nashik.
The original name of V V Shirwadkar was Gajanan Ranganath Shirwadkar that changed after after adoption.
He was born on 27th February 1912 in Pune.
Kusumagraj completed his primary education in Pimpalgaon and high school education in New English School, now J.S. Rungtha High School of Nashik. He then passed matriculation from Bombay University.
His poems and articles were first published in “Balbodhmewa ” magazine when he was hardly 17 years old. Later these were published in “Ratnakar” magazine.
In 1932, he participated in the “Satyagraha” for allowing untouchables to enter Kala Ram Temple. Kusumagraj had no looking back, he began writing poems, stories, plays for the news papers like Weekly Prabha, Sarathi, Navyug etc.
Some of this well acclaimed poem collections are “Vishakha”, “Marathi Mati”, “Swagat”, “Himraesha”, “Yayati Ani Devayani”, “Veej Mhanali Dhartila”.
His eye-opening play “Natsamrat” which fetched him the Sahitya Academy Award in 1974, is regarded as a milestone by the Marathi population till date.
The other awards confernend on Kusumagraj include : Ram Ganesh Gadkari Award, honourable degree of D.Lit. from the Poona University, Sangeet Natya Lekhan Award, Dnyanpeeth Award and above all the Padmabhushan.
This great personality left us on 10 March 1999.

See Also

Thursday, February 23, 2012

Dr Arawind Thatte's lecture series


Great first day of The precision,of his approach to the subject, in depth analysis of even the minutest detail and his ability to convey his thoughts to one and all is simply amazing! looking for the remaining 3 days.

Second day@ Dr arawind Thatte's lecture series.
Yesterday was all about the Tanpura, the backbone of our music. He explained very scientifically the nuances of the instrument and its tuning. He lays immense stress on developing our auditory capacities. As only this will make us sensitive to the various shades of ''Swar'' He also explained the Shadja Gram and madhyam Gram and the difference between them
Today he unfolded the vast topic of ''Shruti Swar Vyavastha'', the mainstay of his research. He explained different methods like 'Moorchana'', applying Shadja and Madhyam grams to all the notes in both these Grams.
His concept of the ''Saptak'' is not limited to just 7 notes. He proves that Saptak should be looked on as a continuum consisting of many audibly distinct points
These Swar sthaans or note positions can be knowingly used in various Raags
He proved very logically that the 22 shruti concept which is still prevalent today is a very limiting approach. In fact if we consider a Saptak from Shadja to Nishad, we can get more than 50 shrutis.
His vocal command over the notes was brought to the forefront when he effortlessly demonstrated some note shades raags like Bhairav, Desi, Darbari, Jog etc
Looking forward to the remaining two days!


It was an exhilarating session not only because the subject was so close to us but because it was put forth in a very different perspective.
Those who are not his students or are unfamiliar with his thoughts might find many theories he puts forth, very hard to digest as they clash with their musical mindset.
But those with an open mind, a logical and scientific approach and receptivity, will no doubt be drawn towards these theories.
Today was all about ''RAAG RACHANAA AND RAAG WYAWASTHAA'' How Raags are created and what is the whole system that lies underneath our music making.
Dr Thatte explained the 10 rules of raag He explored each rule to the fullest and did not limit it to a superficial ''Do and Don't''. For example Every Raag besides the Aaroha Avaroha which spans a whole Saptak, can also have partial ascend and descend starting from any note of the original and reaching up or coming down to any other note in the Original. Aroha-Avaroha
He explained the relation between Vaadi and Samvadi and the relationship between the remaining notes of the raag
When he explained about the composition ''Bandish'' he also said that it is possible to create a Raag without the help of a Bandish. That does not in any way mean that a Bandish is unimportant. But just that it is a possibility which one may explore.
When he talked about Raag Vistar or Raag elaboration, he put forth the concept of the Core of a Raag and how artists of calliber can create wider circles around this core and how the Raag grows over time.
He also mentioned the Time theory and his opinions about it.
He explained that there are many unwritten rules about Raags which are passed on or imbibed with observation and riyaz.

Today the subjects were Bandish,Lay Taal, and gayaki Ang and Tant ang and the difference between the two.
About the Bandish he explained what the principle of ''Bandish ke ang se gaanaa'' means. It means exploring the various ideas a bandish propagates and elaborate it along those lines. This includes the musical phrases, the Lay or speed,the words and the interrelation and intricacies of all these aspects. and the optimum limits to which they can be explored..
Then he explained about lay taal and theka and how that can be studied.
The Gayaki aang and tant ang and the difference between the two. He made a very important point that the tant ang has made a phenomenal contribution to music and so the claim that tant ang is inferior in any way to the gayaki ang as some instrumentalists claim to be is highly untrue. Both are unique in their own way and also intersect each other at some point.
The last point was the various possible exercises of increasing complexity that one can do to get a command over Lay and Taal.Anuradha Kuber.

email-kuberanuradha@yahoo.com

Sunday, February 19, 2012

गोनीदांच्या श्रींची इच्छेने श्रवणसंपुटे तृप्त जाहली


पुण्याच्या पावन विश्रामबाग वाड्यातील भवानी महालात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या विद्ममाने शिवजयंतीच्या पावन दिवशी गो.नी. दांडेकरांच्या लेखणीतून साकारलेले `हे तो श्रींची इच्छा`च्या कादंबरीच्या अभिवाचनातून उपस्थित शिवप्रमी संतुष्ट जाहले. रविवारची संध्याकाळ. १९ फैब्रुवारी. २०१२. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत गोनदांच्या कन्या आणि साहित्यिक सौ. वीणा देव यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेकावर आधारित असलेले हे लेखन प्रभावीपणे सादर झाले.

राज्याला छत्रपती देणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक त्याची सारी पार्श्वभूमी त्यावेळचे सारे वातावरण आणि त्याकाळाची परिस्थितीचे यथोचित सादरीकरण या अभिवाचनातून श्रोत्यांच्या कानी पडले..एकूणच श्रवणसंपुटे तृप्त झाली.
सासू (डॉ.विणा देव), सासरे (डॉ.विजय देव) जावई (रुचिर कुलकर्णी) आणि नातू (विराजस कुलकर्णी) यांनी आपल्या प्रभावी वाचनातून सारा तो सोहळा..आउसाहेब आणि शिवाजी महाराज यांचे पुत्रप्रेम. गावोगावच्या लोकांना झालेला आनंद. गागाभट्ट आणि कवीभूषण यांच्या उपस्थित झालेल्या राज्याभिषेक सोहळ्याची वर्णने...सारेच ऐकून उपस्थित सारेच शिवाजी महाराजांच्या त्या काळात न्हाऊन निघाले.

गोनि दांडेकरांच्या संवादातील प्रतीभा..नव्हे त्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेले असावे असे लेखणीतील जीवंतपण ही त्या लेखनाची ताकद होती. ते वाचन करताना सारेच अभिवाचक त्या काळात रमून तुमच्याशी जणू ती गोष्ट सांगताहेत असा भास होत होता.

राजगडावर ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होऊन महाराष्टाराचे दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांना राज्याभिषेक कसा झाल्या त्याचे वर्णन कानात टिपून घेत श्रोतेही त्याकाळात स्वतःला नेत होते. ती भाषा. ती भावना आणि लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलचा अतिव आदर सारेच इथे ओतप्रोत दिसत होते.

विश्रामबागवाड्याच्या त्या महालात झुंबरांच्या साक्षिने आणि देखण्या ऐतिहासिक दरबारात बसून ऐकताना जी वातावरण निर्मिती झाली ती शब्दात सांगणे कठीण आहे. त्यासाठी पुन्हा एकदा असा अभिवाचनाचा कर्यक्रम होणे आवश्यक आहे.सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, February 12, 2012

व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा....youtube वर


स्वर्गीय बाबा आमटे यांनी रुजविवेल्या आणि डॉ. मंदाकिनी आणि प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी रविवारी पुण्यात सौ. चारुशीला गोसावी यांचे व्हायोलीन गाऊ लागले..तेंव्हा.... टाळ्यांतून रसिकांची दाद मिळाली. बालशिक्षण मंदिराचे सभागृह व्हायोलीनच्या सुरावटींनी हेलावून गेला..कधी आनंदाने तर कधी गहि-या पण सुरेल बोलांनी.

यातून उभा राहिलेला निधी अंदाजे रक्कम सुमारे छपन्न हजार रुपये यासाठी जमा झाले..ते या व्हायेलीन गाते तेव्हा...ऐकणा-या रसिक आणि देणगीदारांच्या पाठिंब्यातून .सांस्कृतिक पुणेचे वतीने हा दिवस नोंदविला गेला तो या एका सुरेल पण समर्थ व्हायोलीन वादकाच्या मराठी- हिंदी गितांच्या बोलांचे ध्वनी रसिकांना मोहवित गेले. अनेक संस्थांचे प्रतिनीधींच्या उपस्थितीत साजरा केला गेला हा स्वरोत्सव. अनेक वर्षांच्या वाद्यावरच्या हुकमतीनंतर चारुशीला गोसावी प्रथमच आपला स्वतंत्र वादनाचा ..तोही लाईट संगीताचा कार्यक्रम `व्हायोलीन गाते तेंव्हा...` प्रथमच सादर करीत होत्या. आणि हा सारा संकल्प लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधीसाठी.हळुहळु रसिक गर्दी करु लागले.

ख्यातनाम चित्रकार रवि परांजपे. लंडन स्थित रहिवासी किशोर देशमुख. गुरू पं. भालचंद्र देव यांच्या हस्ते शुभारंभानिमित्तचा नारळ वाढविला गेला आणि...व्हायोलीन गाते झाले....


मुळातच कंठसंगीताला जवळचे सूर म्हणून संगीत क्षेत्रात लोकप्रिय असेलेल्या व्हाय़ोलीन या वाद्यावरची हुकूमत सिध्द करीत सौ. चारुशीला गोसावी ...प्रथम तुला वंदितो या स्व. अनिल मोहिले यांनी संगीतबध्द केलेल्या गीताने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. टाळ्या पडल्या..अणि एकेका गीतांच्या सुरावटीने ते सारे शब्दच जणू व्हायोलीनच्या वाद्यातून उमटू लागले.... खरचं... व्हायोलीन गाऊ लागले...

विवेक परांजपे यांच्या सिँथसाय़झरने स्वरांचा आणि गीतांच्या मधल्या सुरावटींची हरकत हुकमी ऐकत.अनिल सुखापुरे यांच्या गीटारीवरच्या स्वरांच्या कंपनातून आणि रविराज गोसावी यांच्या तबला बोलातून तालाची लय धरीत व्हयोलीन गात होते.... साथीला राजेंद्र साळुंके , मधुरा गोसावी तालवाद्यातून गाणी बोलत होती..ती रसिकांच्या ह्दयी झिरपत होती.

बाहेर लोकबिरादरीच्या निधीसाठी लोक मधूनच आपली मदत दानपेटीत देण्यासाठी येत होते. ती झोळी धनानी भरत होती. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, जनता सहकारी बॅंक, सिंडिकंट बॅंक, फौंउंटन म्युझिक यांनी या कार्यक्रमसाठी आर्थिक मदतीचा हात दिल्याने रंगमंचावर त्यांचे नाव झळकत होते. मात्र निवेदिका सौ. विनया देसाईंच्या तोंडून जेव्हा मदतीचे आवाहन झाले तेव्हा...तिकीट काढलेला रसिकही त्या मदतीसाठी उत्सुक होऊन आपले सहाय्य करीत असल्याचे चित्रही विलोभनिय होते. तुम्ही मदत योग्य कारणासाठी मागा लोक भक्कम पाठिंबा देतात...हा अनुभव होता.


`चांदणे शिंपीत जा`, `अशी पाखरे येती`..नंतर बरसलेले `श्रावणात घननीळा`ने वन्समोअरची दाद घेतली. `काहो धरीला मजवरी राग` सारखी बैठकीची लावणीही रंगतच गेली. `जांभुळ पिकल्या झाडाखाली` या जैत रे जैत सारख्या अवघड शब्दांना लिलया व्हायोलीनवर झुलवकत गोसावी ते रंगवत होत्या...तेव्हा श्रोते त्यांच्या वादनातल्या कौशल्याने भारावून जावून दाद देत होते. `बोलो रे पपी`, `बैय्या ना धरो.`.`बाबुजी धीरे चलना` गाण्यांनी ठेका धरायला तर लावलाच पण..त्या सुरांवटींच्या हिंदोळ्यावर असेच तरंगत रहावे असेही वाटू लागले.


पं. भीमसेन जोशी ( माझे माहेर पंढरी) या भारतरत्नांच्या तोंडून गायल्या अभंगाला पेलण्याची ताकद गोसावी यांच्या वादनातून प्रकटपणे दिसत होती.

अखेरच्या टप्प्यावर या `चिमण्यांनो परत फिरा` हे अतिशय स्वरमेळांचे विविध आविष्कार घडविणारे गीत समर्थपणे सादर करून त्यांनी कमालीची घेतलेली मेहनत कारणी लागल्याचे जाणविले. `लागा चुनरीमे दाग` या लयकारींने आणि सुरावटींची मोहकता दाखविणारे गीत सादर करुन जेव्हा कार्यक्रम संपविला तेव्हा रसिकांनी ऊठून टाळ्यांचा कडकडात करून त्यांच्या व्हायोलीन कलेला दाद दिली.

असे कार्यक्रम महाराष्ट्राच्या विविध शहरात आणि हेमलकसाच्या अदिवासी मुलांसमोर सांस्कृतिक पुणेला करायचे आहेत. त्याचे हे आरंभीचे पाऊल आश्वासक आहे. त्यांच्या कार्याला आणि सौ. चारुशीला गोसावी यांच्या वादनाला आमच्या मनापासून शुभेच्छा.


व्हायोनीन गाते तेव्हा...
टाळ्यातून प्रतिसाद उमटतो ..
लोक डोलू लागतात..
भारावलेल्या मनातून सहजपणे दाद येते..
कलावंताचे कौतूक होते..
शब्दांचे सूर बनून ते बोलू लागतात.
ताल आणि लयींचा एकजीव होतो..
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...
सुभाष इनामदार, पुणे.

subhashinamdar@gmail.com
9552596276

Tuesday, February 7, 2012

`व्हायोलिन गाते तेंव्हा......`

रविवार, १२ फेब्रुवारी.२०१२ –सकाळी १० वाजता. बालशिक्षण संस्थेचे सभागृह (मयूर कॉलनी, कोथरुड)

डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या `लोकबिरादरी प्रकल्पाच्या` मदतीसाठी
आणि संगीतकार कै. अनिल मोहिले यांच्या स्मृतीला समर्पित

सांस्कृतिक पुणे आयोजित(www.culturalpune.blogspot.com)

शुभारंभाचा कार्यक्रम

`व्हायोलिन गाते तेंव्हा......`
व्हायोलीन वरील मराठी-हिंदी गीतांचा सुरेल आविष्कार
सौ. चारुशीला गोसावी

सहभागी कलाकार- विवेक परांजपे( सिंथेसायझर), रविराज गोसावी(तबला),
अनिल सुखापुरे( गिटार), राजेंद्र साळुंके आणि मधुरा गोसावी(तालवाद्ये)
सूत्रसंचालन- सौ. विनया देसाई

ति.दर रु. १०० व ५०.

शुक्रवारपर्यंत उपलब्ध- नावडीकर म्य़ुझिकल्स ( कोथरुड-२५३८८७९० व ग्राहक पेठ-२४४७४२००)
आणि शिरीष ट्रेडर्स(९४२२३०६६७०)
शिल्लक ति.वि. सभागृहावर शनिवार स.१० ते १ संध्या.५ ते ८.रविवारी तासभर आधी


संपर्क- सुभाष इनामदार( ९५५२५९६२७६) चारुशीला गोसावी (९४२१०१९४९९)

Sunday, February 5, 2012

When Violin sings..for the aid of lok biradari of Hemalkasa

पुण्यातील प्रसिध्द व्हायोलीनवादक सौ. चारुशीला गोसावी आपल्या व्हायोलीनवरील हिंदी-मराठी गीतांचा आविष्कार करणारा `व्हायोलिन गाते तेंव्हा...` हा शुभारंभाचा कार्यक्रम रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात (मयूर कॉलनी, कोथरुड) सादर करणार आहेत. ज्येष्ठ व्हायोलीन वादक, संगीत संयोजक आणि संगीतकार स्व. अनिल मोहिले यांच्या स्मृतीला समर्पित केला जाणार असून तो सांस्कृतिक पुणेच्या (www.culturalpune.blogspot.com) वतीने आयोजित केला आहे.

सौ. गोसावी ह्या पं. भालचंद्र देव यांच्या कन्या व शिष्या असून गेली ३२ वर्ष त्यांचे अनेक व्हायोलिनवादनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर झाले आहेत. सुगम व्हायोलिनवादनाच्या क्षेत्रातही एक उत्तम साथीदार म्हणून त्या सुपरिचित आहेत. या कार्यक्रमात विवेके परांजपे, रविराज गोसावी, अनिल सुखापुरे, राजेंद्र साळुंखे, मधूरा गोसावी हे सहकलाकार साथीला आहेत. सौ. विनया देसाई यांचे निवेदन आहे.

हेमलकसाच्या लोकबीरादरी प्रकल्पाच्या (खर्च वजा जाता सारा निधी) मदतीसाठी दिला जाणार आहे. कार्यक्रमास प्रवेश मूल्य असून कार्यक्रमस्थळीही निधी रक्कम स्विकारली जाणार आहे.

Friday, February 3, 2012

व्हायोलिन गाते तेव्हा...चा शुभारंभ लोकबीरादरीच्या मदतनीधीसाठीहेमलकसा इथल्या डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील प्रसिध्द व्हायोलिन वादक सौ. चारुशीला गोसावी आपला शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,१२ फेब्रुवारी २०१२ रोजी बालशिक्षण सभागृहात सकाळी १० वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. यात मराठी व हिंदी लोकप्रिय गाणी सादर केला जाणार आहेत.हा कार्यक्रम त्या ज्येष्ठ व्हायोलिनवादक, संगीत संयोजक आणि संगीतकार अनिल मोहिले यांना श्रध्दांजली म्हणून सादर करतील .सांस्कतिक पुणेच्या वतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचे विविध शहरात करण्यात येणार आहेत.

हेमलकसा इथल्या आदिवासी भागात आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या कार्याला आपण कलेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा या हेतूने सो. चारुशीला गोसावी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.व्हायोलिन वादन क्षेत्रात सौ. गोसावी गेली ३२ वर्षे विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला पोचविली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनइल) मध्ये त्या कार्यरत असून त्यांना खात्या अंतर्गत होणा-या अ.भा. स्तरावरील शास्त्रीय संगीताच्या व्हायोलीन वादनाच्या स्पर्धेत सलग २२ सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.

त्यांनी आत्तापर्यंत २५०० कार्यक्रमामधून व्हायोलीनचा साथ केली असून १०० चे वर स्वतंत्र व्हायोलीनवादनाचे कार्यक्रमही केले आहेत. आपले वडील व गुरू पं. भालचंद्र देव यांचेकडून त्यांनी हा कलेचा वारसा घेतला आसून भारभतभर विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.

कार्यक्रमात अभंग, नाट्य़गीत, लावणी इत्यादी प्रकारही त्या व्हायोलीनमधून सादर करणार आहेत.पुण्यातला शुभारंभाचा कार्यक्रम पुण्यात रविवार, दि. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी सकाळी. १० वाजता बालशिक्षण संस्थेच्या सभागृहात( मयूर कॉलनी,कोथरूड) पुणे होणार असून त्याची तिकीटे रूपये. १०० , व ५० अशी असून ती रविवारपासून नावडीकर म्यूझिकल्स (कोथरुड व ग्राहक पेठे शेजारी),आणि कमला नेहरू उद्याना समोर शिरीष ट्रेडर्स यांचेकडे उपलब्ध होणार असून शिल्लक तिकीटे सभागृहास्थळी मिळतील.

कार्यक्रमाला आर्थिक मदत करणारे आश्रयदाते लाभले असून खर्च वजा जात सर्व रक्कम लोकबीरादरी प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. ज्यांना धनादेशाद्वारे मदत करायची आहे त्यांनी तो महारोगी सेवा समिती, वरोरा (Maharogi Sewa Samiti, Warora) या नावावर काढला तर तो स्विकारण्याची सोय सभागृहात खास करण्यात आली आहे.


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276