subhash inamdar

subhash inamdar

Saturday, April 20, 2013

पाडवा ते रामनवमी सांस्कृतिक महोत्सव..

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता .
त्यात पहिल्या दिवशी गीत रामायणाने महोत्सवाची  सुरवात झाली. तो सादर केला दता चितळे यांनी..... सौ. मृणालिनी चितळे यांच्या निवेदनाने कार्यक्रमात गदीमांच्या गीतरामायणातली एकेक गीते उलगडू लागली..तुषार रिठे, प्रार्थना पटवर्धन, पूजा गाजरे या गायकांची संगत आणि चारुशीला गोसावी, श्रीरंग चासकर आणि अनघा वैशंपायन याच्या साथीने लक्षात राहणारा आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला.
 
दुसरा दिवस केदार मोरे यांचा वाद्यवृन्द जुन्या नव्या हिंदी गीतांचा रंगारंग नजराणा "जल्लोष २०१३" गायक हिम्मत कुमार पंडया, सुजित सोमण ,मंजुषा देशपांडे, ह्यांच्या  गायनाने व केदार मोरे,मंदार देव , अभिषेक काटे ह्यांच्या वादनाने गाजवला . 

तिसरा दिवस हा सदानंद चांदेकर ह्यांच्या "हसरी उठाठेव " ह्या अप्रतिम एकपात्री प्रयोगाने साजरा झाला.

चवथा दिवस सौ .चारुशीला गोसावी यांचा "व्हायोलिन गाते तेव्हा " हा कार्यक्रम होता. तबला –रविराज गोसावी, सिंथेथायजर -अमृता ठाकुर देसाई तालवाद्य - राजेंद्र साळुंखे व निवेदन सुभाष इनामदार यांच्या साथीने लक्षात राहणारा अप्रतिम आविष्कार रसिकांना भुरळ पाडून गेला .

पाचवा  दिवशी "स्वरांजली" हा मराठी भावगीते, भक्तिगीते, ग़जल गीतांचा कार्यक्रम होता. सौ.सई पारखे,उमेश साळुंखे ,कल्याणी  शेटे यांचे दमदार गायन तबला-महेश साळुंखे ,सिंथेथायजर- किशोर कांबळे देसाई,बासरी - अजरुद्दीन शेख यांची बहारदार वादन साथ यामुळे रंगत गेला.
 
सहावा दिवस शिल्पा  नृत्यालय ट्रस्ट यांचा कथक  नृत्य अविष्कार  "परिक्रमा " हा देखणा कार्यक्रमास  रसिकांनी प्रचंड दाद दिली  त्यानंतर रत्नाकर शेळ्के डान्स अकादमीचा वेस्टर्न डान्स परर्फोर्मन्सेस सादर  करण्यात आले  
 
सातवा दिवस महिलांचे पारंपरिक खेळ शर्वरी दाते व १५ महिला सहकारी यांचा " जागर चैत्रागौरीचा " अतिशय पारंपरिक महिलांच्या खेळाची माहिती करून देणारा  देखणा नृत्य अविष्कार .
 
आठवा दिवस ख्यातनाम जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेला संत रामदासांच्या जिवनावर आधारित रचनांचा " रामदास गुणगान " हा कार्यक्रम सादर झाला.  लवकुश रामायण गाती ह्या गीतानी कार्यक्रमाची सुरवात झालि या कार्यक्रमात कानडा राजा पंढरीचा, खेळ मांडियेला, दशरथा घे हे पायसदान,पायोजी मॆने, रामा रघुनंदना त्याचप्रमाणे यासारखी एकापेक्षा एक सुमधुर गीते व डॉ.राहुल देशपांडे यांनि स्वरबद्ध केलेल्या व जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केलेल्या " रामदास गुणगान " या सिडी मधील गीते श्री राहुल घोरपडे, सौ धनश्री गणात्रा, श्रीपाद भावे यांनी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ.राहुल देशपांडे यांनी केले .

याच कार्यक्रमात "रामदास गुणगान" या सिडिचा प्रकाशन समारंभ  "मनोरंजन पुणे" चे श्री मनोहर कुलकर्णी यांचे शुभह्स्ते संपन्न झाला. यातील गीते डॉ.राहुल देशपांडे यांची असुन याला जेष्ठ संगीतकार राहुल घोरपडे यांनी संगीतबद्ध केले आहे व या सीडीमधील १० गाणी असुन ह्या गाण्यांना गायक रविन्द्र साठे ,सौ धनश्री गणात्रा,श्रीपाद भावे यांनी स्वरसाज चढविला आहे . संगीत संयोजन योगेश तपस्वी यांनी केले असून निवेदन राहुल सोलापूरकर यांचे आहे.

गुढी पाडव्यापासून पुण्यात मार्केट य़ार्ड भागातल्या युवा संदेश मित्र मंडळाने पाडवा ते रामनवमी असा दहा दिवसांचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता.

रामनवमीला या "संगीत ,नाट्य,नृत्य " सांस्कृतिक महोत्सवाची सांगता स्थानिक  कलावंताच्या  कला -प्रदर्शनाने झाला यामध्ये की-बोर्ड वादन,गायन यामधे सौ .ललिता  मुळे, सौ.रेखा धंदरे कु.समृद्धि सोलंकी,कु निहारिका कदम,प्रीटी देशपांडे  ह्यांनी गायन व कु. याना निबजिया ,कु मिली  निबजिया,शॊनक देव ,यश धोका ,यांनी  की बोर्ड वादन  प्रकारात आपले कौशल्य दाखिवले  यानंतर  लहान  मुलांच्या    "झाली काय गम्मत"   या सई परांजपे लिखित नाटकाचा प्रयोग  समावेश होता.यामधे कु. सिद्धि पारखे,कु.अंजोर खोपड़े  ,कु. रुतुजा मोरे , कोमल डिकोळे,श्रुष्टि जगताप ,रिया चव्हाण ,कश्मीरा कोपरे,प्रीटी देशपांडे, शॊनक देव ,देवयानी तोष्णिवाल,नरेंद्र डिकोळे ,पद्मजा डिकोळे,शंतनू कदम,नंदिनी तोष्णिवाल,दुर्वा चोपड़े,अंतरा महाजन या बालकलाकाराचा सहभाग होता या नाटकाचे दिग्दर्शन सौ.प्रतिभा पारखे  व संगीत  सौरभ पारखे यांनी केले होते.

या कलाकाराना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय नगरसेवक श्री. श्रीनाथ भिमाले व चित्रपट अभिनेते श्री. सुनील देव उपस्थित होते . या प्रसंगी  युवा संदेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप पारखे यानी आभार मानले . हा  महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रशांत डिकोळे,ओमप्रकाश जैन ,पंकज कुलकर्णी , अविनाश चोपडे , अभिजित रानडे , भालचंद्र जोशी,प्रियदर्शी नरंजे, सतीश काळे,प्रमोद मोहिते ,महेश लादे ,कृष्णा मेहकरे ,विठ्ठल संगमे या कार्यकर्त्यांनी  विशेष परिश्रम घेतले.