subhash inamdar
subhash inamdar
Friday, March 23, 2012
`व्हायोलीन गाते तेव्हा...`आता कोल्हापूरात
लोकबिरीदरी प्रकल्पास ५८ हजारांची मदत
प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांच्या `व्हायोलीन गाते तेव्हा...` या कार्यक्रमातून जमा झालेला ५८ हजार रुपयांचा निधी हेमलकसा इथल्या डॉ. मंदा आणि प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या निधी साठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने पाठविला गेला. हाच कार्यक्रम कोल्हापूरच्या कोशवराव भोसले नाट्यगृहात ८ एप्रिल २०१२ ला रात्री ९ वाजता आयोजित केला आहे. लोकबिरादरीच्या कार्यासाठी तो आयोजित केला आहे. त्यालाही असाच प्रतिसाद मिळेल अशी खात्री सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांना वाटते.
फेब्रुवारीच्या १२ तारखेला पुण्यात व्हायोलीन वरील मराठी-हिंदी गीतांचा सौ. चारुशीला गोसावी यांचा `व्हायोलीन गाते तेव्हा... `हा शुभारंभाचा कार्यक्रम लोकबिरादरीच्या निधीसाठी सांस्कृतिक पुणेच्या वतीने आयोजित केला होता. त्यातून खर्च वजा जाता राहिलेला ५८,३०६ रुपयांचा निधी लोरबिरादरीसाठी जमा झाला.
कार्यक्रमास मिळालेला प्रतिसाद आणि समाजिक कार्यसाठी केलेल्य़ा कलासेवेचे काही प्रमाणात का होईना चिज झाल्याचे समाधान चारुशीला गोसावी व आयोजक सुभाष इनामदारांना वाटते. कोल्हापूर शहरातील जाणकार व मदत करु इच्छीणा-यांनी आर्थिक सहभाग द्यावा असो आवाहन सुभाष इनामदार यांनी केले आहे.
पुण्यातल्या पहिल्या १२ फैब्रुवारी २०१२ च्या कार्यक्रमाचा ऑडियो एकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा....
http://soundcloud.com/subhash-vishwanath-inamdar/violin-gaate-tenvha-now-in?fb_action_ids=10150656465448172&fb_action_types=soundcloud%3Alisten&fb_source=recent_activity&code=AQChzPT-2tcWbSATv0fQs1hE71WSpNeCQoim5MrJ3pyGaaAje_Ruk4mL8nMg4kSl9Yuy__lvkLgLN2L6M5il8LsUxMVe1qDQda8KP9ofkH1ckrxYICXu3IMJPBwNsZYbeyOUOJSg-DGB4Nwhe_KWy1FWGBsey5gNEZPkGnVPZEI7zd3fFv8S5C6URfyLpBZFlaA#_=_
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment