
`स्वरबहार`, या संस्थेच्या
वतीने गायन वादनाचार्य
पं. गजाननबुवा जोशी
यांच्या १०७व्या स्मृतीप्रित्यर्थ्य
पुण्यातल्या सात व्हायोलिनवादकांनी
आपल्या सादरीकरणातून पं. गजाननबुवा जोशी यांना स्वरांजली
अर्पण करण्यासाठी दोन
दिवसांची बहारदार मैफल आयोजित
केली होती.
गजाननबुवांचे
शिष्य पं. भालचंद्र
देव आणि त्यांच्या
कन्या सौ. चारूशीला
गोसावी यांनी ही मैफल
`सांस्कृतिक पुणे`च्या सहकार्याने पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात खास रसिकांसाठी आयोजित केली होती.
`सांस्कृतिक पुणे`च्या सहकार्याने पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयाच्या सभागृहात खास रसिकांसाठी आयोजित केली होती.
या आयोजनाचे हे पंधरावे वर्ष होते.या कार्यक्रमात
![]() |
वैष्णवी काळे.... राग बागेश्री
आणि धुन
|
वैष्णवी काळे,
![]() |
रजत नंदनवाडकर.. राग छायानट
आणि धुन
|
रजत नंदनवाडकर,
![]() |
डॉ. सौ. निलिमा
राडकर.. मारूबिहाग आणि शंकराभरणम्
|
डॉ. सौ. निलिमा राडकर,
![]() |
वसंत देव..राग
बिहाग
|
वसंत देव,
![]() |
देवेंद्र जोशी.. राग बागेश्री
आणि नरवर कृष्णासमान
हे नाट्यपद
|
देवेंद्र जोशी,
![]() |
अभय आगाशे.. राग रागेश्री
आणि एक
हिंदी चित्रपट गित
|
अभय आगाशे यांनी आपले स्वतंत्र शास्त्रीय वादन केले.
![]() |
सौ. चारुशीला गोसावी.. राग
गावती आणि किरवाणी
धुन
|
आणि पहिल्या दिवशीच्या समारोपाचे
वादन सरताना पं.
भालचंद्र देव यांच्या
कन्या आणि शिष्या
सौ. चारूशीला गोसावी यांनी
राग गावती आणि
त्यांनीच तयार केलेली
किरवाणी धून सादर
करून आपल्या उत्तम
व्हायोलीनवादनाची साक्ष पटविली.
पं. गजाननबुवांच्या काही रचनांचे
एकत्रीतपणे व्हायोलीनवर
वादन करून अभय आगाशे,
रजत नंदनवाडकर, वसंत
देव, देवेंद्र जोशी,
संजय चांदेकर, निलिमा
राडकर, चारुशीला गोसावी आणि
पं. भालचंद्र देव
यांनी रसिकांना त्यांची
शैली कशी होती
ते विविध
गतीतून यातून ऐकविली.
रविवारी पं. गजाननबुवांच्या
काही आठवणी आणि
त्यांच्या जुन्या कार्यक्रमातील आणि
मुलाखतीतील भाग यावर
आधारित चित्रफित मुद्दाम तयार करून
ती रसिकांसमोर दाखविली
गेली. त्यासाठी
सुभाष इनामदार यांचा
सहभाग मोलाचा होता.
नविन व्हायोलीन वादकांमध्ये पं.
भालचंद्र देव
यांचेकडे शिकत असलेला
रजत नंदनवाडकर याच्या
वादनामध्ये चमक आहे..वाजविण्यीची पध्दतही अधिक
आकर्षक आहे..आणि
वादनातले बारकावे त्याने सहजपणे
साध्य केल्याचे दिसते.
अभय आगाशे यांनी सादर
केलेला राग रागेश्री
आणि निलिमा राडकर
यांचा मारुबिहाग अधिक
पसंतीस उतरला
.
शेवटी पं. गजाननबुवा
जोशी यांचे शिष्य
पं. भालचंद्र देव
( वय अवघे ८३
) यांनी आपले बहारदार
वादन करून रसिकांना
मंत्रमुध्द केले. त्यांनी
राग पूरिया आणि
काही नाट्यपदे आपल्या
वादनातून एकविली. आजही त्यांचा
स्थिर हात रसिकांना
मोहवून गेला.
दोनही दिवस तबला
साथ केली ती
रविराज गोसावी आणि मोहन
पारसनिस यांनी.
निवेदनाची धुरा राजय
गोसावी यांनी सांभाळली.
No comments:
Post a Comment