स्वरानंदच्या या सुवर्णमहोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत क्षेत्रातल्या ता-यांना माझ्या हस्ते पुरस्कार दिला गेल्याने मी आज खूप श्रीमंत झाल्याचा अनुभव घेत असल्याचे मत मराठी रंगभूमिवर विविध नाटकातून गेली एकसष्ट वर्षे काम करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री - गायिका आशालता वाबगावकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील चार कलावंतांना शुक्रवारी २९ नोव्हेंबरला गौरविण्यात आले. यावेळी पुरस्कार विजेत्यांसोबत संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रा.प्रकाश भोंडे आणि वंदना खांडेकर रंगमंचावर होत्या.
आपले गुरू गोपिनाथ सावकार यांनी रंगमंचावर उभे कसे रहायचे या पासून बोलायचे कसे हे शिकविले..म्हणून मी रंगमंचावर ६१ वर्षे आपण उभे राहू शकले..मात्र ते सोपे नव्हते..त्यासाठी खूप मेहनत घेतली..आपणही आपल्या क्षेत्रात टिकून रहाण्यासाठी खूप मेहनत घ्या ,असे पुरस्कार विजेत्यांनाआशालता वाबगावकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी केशवराव भोळे पुरस्कार- संगीतकार उदय चितळे, माणिक वर्मा पुरस्कार- गायक पुष्कर लेले, उषा अत्रे-वाघ पुरस्कार मृदुला दाढे- जोशी यांना तर विजया गदगकर पुरस्कार गिटारवादक मुकेश देढिया यांना दिला गेला.
याशिवाय सनबीम साउंडचे संजय बेंंद्रे यांना त्यांच्या ध्वनिसिस्ठिम व्यवस्थापनाविषयी खास सन्मान आशालता वाबगावकर यांच्या हस्ते यावेळी करण्य़ात आला.
पुणेकर कलावंताकडे बारकाईने पहात असतात. दाद द्यायची घाई करीत नाहीत. पण उत्तम काम केल्यावर पहिली शावासकी द्यायला ते कधीही मागेपुढे पहात नाही ते पुणेकर..असे मनोगत आजच्या पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या वतीने मूळच्या पुणेकर आणि सध्या डोंबिवली येथे स्थायिक असलेल्या मृदुला दाढे- जोशी यांनी व्यक्त केले.
पुरस्कार वितरण समारंभानंतर त्या चारही कलावंतांनी आपली कला रसिकांसमोर सादर करून त्यांची शाबासकी मिळविली. यांत रंजना पेठे आणि विनायक जोशी यागायकांचा खास सहभाग होता.
या सर्वच संगीताच्या कार्यक्रमाला साथ केली ती राजेंद्र हसबनिस, आनंद घोगरे, सौमित्र क्षीरसागर आणि सुभाष देशपांडे या तयार वादकांनी.
य़शवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वरांनदच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरूण नूलकर यांनी तर आभार शैला मुकुंद यांनी मानले. आशालता वाबगावकर यांची ओळख वंदना खांडेकर यांनी करून दिली. भावगीताच्या वाटचालीवरचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आसून. स्वरांनदचा इतिहास आपण लिहित असल्याचे प्रकाश भोंडे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
२९ नोव्हेंबर २०१९
No comments:
Post a Comment