भव्य ऑडिटोरीयम ... ३०० पेटिंग्ज लावता येतील अशी आर्ट गॅलरी ... चार लाखांच्यावर संग्रह असणारी म्युझिक गॅलरी ... अशा वैशिष्ट्यांसह सहकारनगर येथील वसंतराव बागूल उद्यानात उभारण्यात आलेल्या ' भारतरत्न पं . भीमसेन जोशी कलादालना ' चे उद्घाटन पंडितजींच्या ९० व्या जयंती दिवशी १० फेब्रुवारीला करण्यात येणार आहे .
पंडितजींच्या उपस्थितीत ९०व्या वाढदिवशी कलादालनाचे उद्घाटन करण्याचा महानगरपालिकेचा संकल्प होता . मात्र , ते नियतीला मान्य नव्हते , अशी खंत महापौर मोहनसिंग राजपाल यांनी व्यक्त केली . पालिकेचे विरोधी पक्षनेते आबा बागूल यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प राबवण्यात आला आहे . या प्रकल्पात मिनी थिएटर , म्युझिक आणि आर्ट गॅलरी , डॉक्युमेंटरी पहाण्याची व्यवस्थाही कलादालनात करण्यात आली आहे , असे राजपाल यांनी सांगितले . भारतीय संगीताचा गेल्या अनेक वर्षातला प्रवास , पुणे शहराचे संगीत क्षेत्रातले योगदान , कलाकार आणि त्यांच्या कारकिदीर्ची माहिती कलादालनात मिळेल . तसेच छोटे सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्याची सोय इथे करण्यात आली असल्याचे ते म्हणाले .
शहरातल्या शौकिनांना इथे हवे ते संगीत ऐकता येईल . मराठी , हिंदी , इंग्लिश सिनेमांची गाणी , भावगीते , पॉप , रॉक , शास्त्रीय संगीताचा खजिना म्युझिक गॅलरीच्या माध्यमातून पुणेकरांसाठी उघडत असल्याचे बागुल यांनी नमूद केले . या म्युझिक गॅलरीत २८ क्युबिकल्स करण्यात आली आहेत . प्रत्येक क्युबिकलमधे कम्प्युटर आणि हेडफोन्स आहेत . याच कम्प्युटरवर पुस्तकेही डाऊनलोड करण्याची योजना आहे . रसिकांना संगीताचा आस्वाद घेताघेता आवडीची पुस्तके वाचण्याची सोयही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले .
कलादालनाच्या प्रवेशद्वारावर पंडितजींचे विठ्ठल आणि संत तुकारामांसमवेत भव्य शिल्प साकारण्यात आले आहे . १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्यानाचे उद्घाटन होईल . यावेळी पुण्याचे सर्व खासदार , आमदार आणि पालिकेचे कर्मचारी उपस्थित रहाणार आहेत . उद्घाटनानंतर कलादालन सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत सर्वांसाठी नाममात्र शुल्कात खुले होईल .
ऐका , दुमिर्ळ ग्रामोफोन रेकॉर्डस्ही !
दुमिर्ळ शास्त्रीय संगीताच्या मैफली , जुन्या गाण्यांचा ९ हजार ५०० ग्रामोफोन रेकॉर्डस्चा वैयक्तिक संग्रह रमेश गणेश देव यांनी पुणेकरांसाठी खुला केला आहे . या कलादालनात ग्रामोफोन ऐकण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे . या रेकॉर्ड्स ऐकण्यासाठी मात्र अगाऊ नोंदणी करावी लागेल .

No comments:
Post a Comment