दव धुक्याचे पानावरी
रंग तुझे मनावरी
मनमंदिरी साकारली
आठवणींची शब्दवारी...
असं सागून सुरवात करणारा नऊ नवीन गाण्यांचा
संगीतकार राहूल आपटे यांचा ...आठवणीतली शब्दवारी ...हा अल्बम गुरूवारी ७ जानेवारीला टिळक स्मारक मंदिरात
तरुणाईला प्रोत्साहन देणारे आघाडीचे लोकप्रिय संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या
हस्ते प्रकाशित होत आहे.
संगणक इंजिनीअर असलेले राहूल आपटे यांनी आपले
आजोबा संगीत सुधाकर पं. वि.दे अंभईकर यांना हा समर्पित केला आहे..आजच्या तरूणांना आवडतील
अशी नवीन गीतकार-कवी अनिल बोरोले यांची गीते निवडून त्याला कवीतेच्या भावानुसार
चाल बांधून हा आल्बम मराठी रसिकांसमोर ठेवलाआहे.
राहुल आपटेंना आधी शब्दाचे वेड होते..त्यात ते स्वतः उत्तम पेटीवादन करतात .नवीन कवीतांना चाली लावून त्या रचना संगीतबध्द करण्याचा त्यांचा छंद जुनाच आहे. त्यातच या नव्या कवीची ओळख वाढली व सहवास लाभला, यातून दोघांनी याच नावाचा कार्यक्रम आपल्या खाजगी मैफलीत सादर करून त्याची पसंती आजमावली आणि आता आपटे यांनी स्वतः लिहिलेली ४ व अनिल बोरोलेंची ५ अशी या अल्बम मध्ये वेगवेगळ्या रसातील गीते घेऊन हा "एक वेगळा प्रयोग" करण्याचे धाडस केले आहे.
अल्बम प्रकाशनाचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य
असून तो गुरुवारी रात्री ९ वाजता टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षगृहात आयोजित केला
आहे. रसिकांना उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती आहे.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



Best Luck
ReplyDelete