गीतरामायण
..गदिमा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून
रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून
जनतेच्या दरबारात सादर केले...आज त्याला साठ वर्षे उलटली पण ती मोहिनी
मराठी मनावर राज्य करुन आहे..याचा प्रत्यय गेले दोन दिवस मी घेत आहे.
वाल्किकींचे रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक
काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक
गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते
शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक
रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..
तसाच संकल्प गेली सुमारे दहा वर्ष पुण्यात अभिजित पंचभाई आणि त्यांचे कलाकार मंडळी करताहेत. त्यासाठी स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.
मीरा ठकार या ज्येष्ठ निवंदिका अतिशय मनापासून याची महती ..त्याचा गोडवा सांगतात.
रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकदा..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके ते समर्थपणे सादर होते.
कुणा एकाचे नाव घेतले तर ते बरोबर नाही..स्वतः पंचभाई, राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो), देवयानी सहस्त्रबुध्दे, माधवी तळणीकर आणि अमिता घुगरी..सारेच गायक कालवंत ..तर निखिल महामुनी( उद्याचा संगीतकार),राजेद्र हसबनीस, दिप्ती कुलकर्णी, चारुशीला गोसावी, अमित काकडे, आदित्य आपटे....या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे दिली पाहिजेत.
गुढीपाडवा ते रामनवमी असा संगीत, गीत आणि नृत्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात विविध कलावंत करत असतात...यातलाच हा एक..
पण स्वत्ः कसलाही आविर्भीव न आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतातययाला दाद ही दिलीच पाहिजे..म्हणूनच हे टिपण लिहले..नव्हे लिहावेसे वाटले..
यांच्यावर लिहले दुस-यांवर नाही..असे होता कामा नये.. सारेच जण आपापली सेवा प्रामाणिकतेने सादर करतात..पण ज्यांच्याविषयी मुद्दाम लिहावे वाटले असा हा कार्यक्रम होता हे नक्की..
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:
Post a Comment