subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, April 16, 2014

देणे देवगंधर्वांचे..

या आहेत देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले यांच्या नात सून..सौ. शैला दातार..बुवांच्या सा-या आठवणीतून त्यांनी देवगंधर्व सारखा एक ग्रंथ लिहिला आणि त्या सा-या शास्त्रीय संगीतांच्या अभ्यासकांना एक गायकीचा इतिहास उपलब्ध करुन दिला.
गेल्या रविवारी म्हणजे १३ एप्रिल ला भास्करबुवा बखले यांनी स्थापन केलेल्या भारत गायन समाजात बुवांच्या मूळ चीजा गाऊन त्यातून नाथ हा माझा हे स्वयंवर मधले पद कसे साकारले ते सोदाहरण सादर करुन दाखवित आहेत..

देणे देवगंधर्वांचे हा कार्यक्रम ऐकणारा हा श्रोतृवर्ग..शनिपारच्या समाजाच्या सभागृहात या थोर संगाताचार्यांची अभ्यासपूर्ण माहिती ऐकताना सारे सभागृह गच्च भरले होते..वारंवार पुढे सरका म्हणजे इतरांना कार्यक्रम ऐकता येईल असी विनंती निवेदक अरुण नूलकर यांना करावी लागत होती..


 


चहूबाजुला असलेल्या गायकांच्या तसबीरीच्या संगतीने मैफलीतील सारे श्रोते मनोभावे ह्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते.











पं. भास्करबूवा बखले यांनी दिलेल्या अनेक चाली या विविध रागातल्या बंदीशीवरुन घेतल्या आहेत..त्या मूळ बंदिशींची आणि त्या पदांची रचना तेवढ्याच तयारीने शील्पा पुणतांबेकर आणि सावनी कुलकर्णी या सादर करीत होत्या तेव्हा दादही तेवढीच उत्स्फूर्त मिळत होती.. शैला दातार यांनी आपली कन्या शिल्पा आणि  दिरांची कन्या सावनी यांचेकडून मेहनतीने पदांना आणि बंदिशींना आकार दिला..त्यातूनच देवगंधर्व..इथे उमगले..दोघीही कलावंतांनी आपल्या सादरीकरणातून अभ्यासपूर्ण गायकीचे दर्शन घडविले.










 सावनी कुलकर्णी यांनीही सुहास दातार यांच्याकडून भास्करबुवांचे गाणं किती तयारीने आपल्या गळ्यातून मांडले यांचे उदाहरणच इथे दिसत होते..
दोघांनाही तबल्याची साथ समीर पुणतांबेकर आणि राहूल गोळे यांनी ऑर्गनवर तेवढीच समर्पक दिली..
शैला दातार यांच्या गायनाला प्रसाद जोशी  जे संगीत नाटकाला साथ करतात त्यांनी सुयोग्य तबला संगत करुन पदांना आणि बंदिशींना अधिकाधिक नटविले हे मान्यच करायला हवे..


भास्करबुवांच्या तेजस्वी, बुध्दीप्रधान आणि ओजस्वी  परंपरेचे दर्शन घडविले..यातून आणि अरुण नूलकर ..तसेच शैला दातार यांनी आपल्या निवेदनातून त्यांनी कसे संगीताचे शिक्षण घेतले..आणि...गायनाचार्य म्हणून नाव मिळवितानाच संगीत नाटकात पदातून बालगंधर्वांसारख्या नटांना स्वतःची ओळख मिळवून दिली...सारे काही रसिकांपर्य़त पोहोचले.
भारत गायन समाज शास्त्रीय संगीताला पारंपारिक अभ्यासाची जोड देऊन नवे कलावंत घडविण्याचे कार्य गेली १०० वर्ष करते आहे..ती परंपरा आहे ती या पं. भास्करबुवा बखले यांच्या या लयदार परंपरेची आणि त्यांच्या
कसदार सांस्कृतिची देन आहे..
  

- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 11, 2014

गीतरामायणाची निष्ठेने सेवा ..

अभिजित पंचभाई यांचे दहा वर्षे रामनवमीला सादरीकरण

 

गीतरामायण ..गदिमा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून जनतेच्या दरबारात सादर केले...आज त्याला साठ वर्षे उलटली पण ती मोहिनी मराठी मनावर राज्य करुन आहे..याचा प्रत्यय गेले दोन दिवस मी घेत आहे. वाल्किकींचे रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..

तसाच संकल्प गेली सुमारे दहा वर्ष पुण्यात अभिजित पंचभाई आणि त्यांचे कलाकार मंडळी करताहेत. त्यासाठी स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.
मीरा ठकार या ज्येष्ठ निवंदिका अतिशय मनापासून याची महती ..त्याचा गोडवा सांगतात.
रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकदा..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके ते समर्थपणे सादर होते.

कुणा एकाचे नाव घेतले तर ते बरोबर नाही..स्वतः पंचभाई, राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो), देवयानी सहस्त्रबुध्दे, माधवी तळणीकर आणि अमिता घुगरी..सारेच गायक कालवंत ..तर निखिल महामुनी( उद्याचा संगीतकार),राजेद्र हसबनीस, दिप्ती कुलकर्णी, चारुशीला गोसावी, अमित काकडे, आदित्य आपटे....या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे दिली पाहिजेत.

गुढीपाडवा ते रामनवमी असा संगीत, गीत आणि नृत्यांचे कार्यक्रम महाराष्ट्रात विविध कलावंत करत असतात...यातलाच हा एक..
पण स्वत्ः कसलाही आविर्भीव न आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतातययाला दाद ही दिलीच पाहिजे..म्हणूनच हे टिपण लिहले..नव्हे लिहावेसे वाटले..
यांच्यावर लिहले दुस-यांवर नाही..असे होता कामा नये.. सारेच जण आपापली सेवा प्रामाणिकतेने सादर करतात..पण ज्यांच्याविषयी मुद्दाम लिहावे वाटले असा हा कार्यक्रम होता हे नक्की..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 7, 2014

नाट्यपदांची रंगत वाढत गेली..

 विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठान निर्मित कार्य़क्रम



नाट्यसंगीत गाणारे तीस चेहरे जेव्हा एकापाठोपाठ पुण्यातल्या गांधर्व महाविद्यालयातल्या  पं. विष्णू दिगंबर पलुस्कर मंचावर सलग सोळा पदं सादर करतात तेव्हा नक्कीच मराटी संगीत नाटक अजुनही पुढच्या पिढीपर्यत नाट्यसंगीताच्या माध्यमातून का होईना पोहोचले आहे याचे समाधान होऊन मन पुन्हा एकदा त्या जुन्या धुप आणि नादीनं सुरु होणा-या  संगीत नाटकांकडे धाव घेते.


रविवारी, ६ एप्रिल १४ ला विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या वतीने  पुण्यात नाट्यसंगीत पदविका अभ्यासक्रमाच्या कलाकारांनी आपला नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर केला..शुभदा दादरकर, श्रीकांत दादरकर आणि मधुवंती दांडेकर यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते..त्यांच्या नाटयसंगीतातल्या तयारीने पुणेकर रसिक भरावला गेला नाही तरच नवल. 
विद्याधर गोखले यांनी १४ संगीत नाटके लिहून त्यातून मराठी संगीत नाटकांची परंपरा पुढे झेपावत नेली..

आता संगीत नाटके फारशी होत नाहीत. मात्र नाट्यसंगीताला रसिकांच्या मनात अजुनही अढळ आणि अतूट  स्थान आहे...हे जाणून या प्रतिष्टानमार्फत नाट्य संगीताचे दोन वर्षाचे पदविका शिक्षण दादर (मुंबई), ठाणे आणि  पुण्यात दिले जाते..ठाणे वगळता इतर ठिकाणी  येणा-या कलावंतांत पुरुषांचा सहभाग जेमतेम असतो अशी खंत श्रीकांत दादरकर व्यक्त करतात..इथेही महिलांचा अधिक ओढा आणि चिकाटी दिसते.

विद्याधर गोखले यांची कन्या आणि  संगीत नाटकातून भूमिका केलेल्या उतम संगीत कलाकार शुभदा दादरकर, पं. रामदास कामत, आर्चना कान्हेरे, ज्ञानेश पेंढारकर यांनी नाट्यसंगीताचा हा ठेवा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यात मोठीच मजल मारली आहे.





रविवारच्या या नाट्यसंगीताच्या मैफलीची रंगत आणणा-या राधाधर मधु मिलिंद, फुलला मनी वसंत बहार, एकला नयनाला, नयने लाजवीत..किंवा गौरी मनहारी, येतील कधी परतून, सुरसुख खनी किंवा श्रीरंगा कमलाकांता सारख्या पदांना आमच्या मनात पुन्हा एकदा त्या गीतांची मोहिनी गंधीत करण्यासाठी विदुला जोशी, डॉ. जयश्री बहुलीकर, हर्षदा कारेकर, धनश्री लोणकर, संहिता देशपांडे, स्वरुपा करंदीकर, शरयू कुलकर्णी, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे, नम्रता महाबळ, अपर्णा कुलकर्णी, देवेंद्र पटवर्धन, नीला किल्लेदार आणि स्वाती गणपुले या कलावंतांची पदे समोर कानावर पडत गेली..आणि एकूणच नाट्यसंगीताचा प्रवास सुरु राहिला..निवेदनातून माधवी केळकर यांनी ती पदे एकमेकात गुंफली.

दोन वर्ष पुर्ण झालेल्या कलावंतांचे स्वतंत्र पद तर ज्यांना एक वर्षच झाले आहे त्यांनाही नांदी ते भैरवी अशी मोहक पण वातावरण निर्मिती करणा-या पदांत समाविष्ट करुन एकुणात सुमारे तीस कलावंतांची हजेरी या व्यासपीठावर लागली.
आता नवीन कलावंतांची रितसर नोंदणी करण्यासाठी त्यांची तयारी २० एप्रिलला पुण्यात होऊन त्यातल्या कांहीना पुढच्या वर्षी या प्रतिष्टानच्या अभ्याक्रमात सहभागी होता येणार आहे.. यात अगदी तरुण आणि साठीच्या महिला कलावंताचा सहभाग आहे.

एकूणातच पुण्यातल्य़ा कार्य़क्रमात मला भावलेली काही नावे म्हणजे..हर्षदा कारेकर, स्वरुपा करंदीकर, किशोरी तांबोळी, राधिका ठुसे आणि नम्रता महाबळ  अशी सांगावी लागतील.
एकूणच या पारंपारिक पदांना झुलवीत प्रसंगी पुढचा सूर देणारा तरुण ऑर्गनवादक हिमाशू जोशी आणि हार्मानियमवर केदार तळणीकर तर तबल्यावर विद्यानंद देशपांडे आणि संतोष अत्रे यांची संगत मेहनत नाट्यपदांना आकार देत होती.
आपल्या गायकीने संगीत नाटकांत भुमिका करणारे ज्येष्ठ  गायक नट नारायण बोडस या कार्यक्रमाला अखेरपर्य़त. हजर होते. तर मुकुंदराज गोडबोले, संगीतकार गिरीश जोशी , गायिका कविता टिकेकर असे कलावंतही  क्रिकेट विश्वातली महत्वाची लढत सोडून खास उपस्थित होते.

विद्याधर गोखले यांच्या `बावनखणी `नाटकातल्या -प्रेमरंगामध्ये रंगलेल्या होळीच्या गीताने वेगळीच धुंदी आणत कार्यक्रमाची समाप्ती झाली.
कमीत कमी वेळात नाट्यसंगीताचा हा नजराणा देण्यासाठी घेण्यात महनतीला खरा रंग इथे आला..तेच नाटकाचे सूर आता रंगमंचावर नाटकातून प्रत्यक्ष  कधी पहायला मिळतील याची ओढ यामुळेच तर निर्माण झाली.  


-सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276