subhash inamdar

subhash inamdar

Sunday, October 28, 2012

राज्यस्तरीय गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धा





कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशन आणि मास्टर ईव्हेंट व पब्लिसिटी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्टार बॅटल्स या गायन, वादन आणि नृत्यविषयक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आरंभ १६ ते १८ नोव्हेंबर २०१२ पासून पुणे, कोल्हापूर, सोलापूर नवी मुंबई, नाशिक, ओरंगाबाद आणि नागपूर शहरात सुरु होत असल्याची माहिती कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या संचालिका अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.


कोणत्याही कलेचा प्रसार आणि प्रचार नेहमीच लहान मुलांपासून सुरु होतो. म्हणूनच गायन, वादन आणि नृत्य या कलेत प्रविण असलेल्या राज्यातल्या लहान गावातल्या कलाकारांसाठी ही अभिनव स्पर्धा स्टार बॅटल्स या बॅनरखाली घेण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या कलेला दाद आणि त्यांना नवे व्यासपिठ मिळवून देताना त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उद्देश आहे. ही स्पर्धा या क्षेत्रातल्या कलाकारांच्या दृष्टीने एक नवे आव्हान ठरणार आहे.



कलेच्या विविध क्षेत्रात आज स्पर्धा मोठी आहे. मात्र आरंभापासून कलेला खतपाणी घालून जर योग्य मार्गदर्शन लाभले तर पुढे तो चांगला कलावंत म्हणून नाव-किर्ती आणि प्रसिध्दी मिळवू शकतो..यासाठी त्याच्या कलेतील प्रगती अजमावून त्याला शाबासकीची थाप देणे आणि ती कला पुढे नेण्यासाठी आर्थिक मदत करु योग्य गुरुकडे जाण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या स्पर्धमागचा संयोजकांचा उद्देश असल्याचे या स्पर्धेचे समन्वयक सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी सांगितले.

मास्टर ईव्हेंट व पब्लिसिटी आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने ही राज्यस्तरीय स्पर्धेची घोषमा करण्यात आली. डिसेंबरच्या मध्याच्या सुमारास याची अंतिम फेरी घेण्यात येईल. य़ासाठी ७ व्या वर्षांपासून पुढे असलेल्या कोणत्याही कलाकाराला भाग घेता येईल. प्राथमिक फेरीत त्याच्या गुंणांचे मुल्यपापन त्याक्षेत्रातल्या अनुभवी परिक्षक मंडळाकडून केल्यानंतर त्याला अंतिम फेरीत निवड होईल. 

या परिक्षक मंडळात संगीताचार्य पं. ना.वा .दिवाण, पं. विजय बक्षी, संतूरवादक धनंजय दैठणकर, गुरू व नृत्यांगना स्वाती दैठणकर, गझल गायक अन्वर कुरेशी, तबला वादक संजय करंदीकर आणि नृत्यकुशल अभिनेत्री शर्वरी जेमिनीस या मान्यवर परिक्षकांची सल्लागार समिती काम करणार आहे.
स्टार बॅटल्स या स्पर्धचे मुख्य प्रायोजक मास्टर टूर ऑर्गनायझेशन प्रा. लि. हे आहेत.
नुकतीच पुण्यात स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणून काम करणा-या संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवी कलावंतांचा मेळावा आणि त्यांची याबाबतची मते अजमावण्यात आली. यात मधुवंती दांडेकर, मंजिरी आलेगावकर, निर्मलाताई गोगटे, ह्षीकेश बडवे, मिलिंद पोटे, प्रशांत फाटक, विजय दास्ताने, मिलिंद डोंगरे, सुरेश फडतरे, तेजस्विनी साठे, चारुशीला गोसावी, कौमुदी कुलकर्णी,. अपर्णा रास्ते, विजय कोटस्थाने, कृष्णा जोशी, चित्रा आपटे, मधुवंती बोरगावकर, अझुरीद्दीन शेख यांचा समावेश होता.


अधिकाधिक निकोप स्पर्धा पार पडावी यासाठी स्थानिक पातळीवरचे काही संस्थांने कलावंत याचा आयोजनात सहभाग घेण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment