वय वर्षे. ८५. डॉ.
नारायण वामन दिवाण. संगीत क्षेत्रात त्यांना पं. ना.वा. दिवाण म्हणून ओळखळे जाते.
आज (बुधवारी) सकाळीही याही वयात त्यांनी दोन विद्यार्थ्य़ांना संगीत शिक्षण दिले.
त्यानंतर अचानक त्यांना अस्वश्थ वाटले. आणि पहाता पहाता त्यांचे त्यातच दुःखद निधन
झाले.
आय़ुष्यभर संगीतदान
हेच आपले काम. ते त्यांनी अतिशय तळमळीने केले. पुण्य़ात या तोडीचे आनेक गुरु आहेत.
जे दान अनेक वर्ष करताहेत. मात्र पं. पिंपळखरे गावात आणि बिबवेवाडीत पं. दिवाण.
आज त्यांच्या अचानक
जाण्याने संगीत क्षेत्रात आपलेपणानी अनेकांना सल्ला देणारा गुरु हरपल्याची भावना
आहे. पुण्याच्या संगीत क्षेत्रातील अनेक गुरू, मार्गदर्शक त्यांच्या अखेरच्या
दर्शनासाठी उपस्थित होते. पं. मुकुंद मराठे. विजय दास्ताने. संजय करंदीकर.
पांडुरंग मुखडे. माजी आमदार विश्वास गांगुंर्डे ही त्यातलीच काही प्रमुख नावे. कितीतरी
संगीत श्रेत्रातील विद्यार्थी यावेळी अश्रुपूर्ण नेत्रांना त्यांचे अखेरचे दर्शन
घेत होते.
तसा पं. दिवाण
यांच्या कारकीर्दीचा धावता आढावा घेतला तर सारे आयुष्यच त्यांनी संगीताची सेवादान
करण्यात घालविले. त्यांचेकडे संगीत विशारद झालेल्यांची संख्य़ा १००० आहे. तर संगीत
अलंकार झालेले ८०० आहेत. तर ३ जण संगीताचार्य म्हणून उत्तीर्ण झाले आहेत. ते.
स्वतः संगीताचार्य आहेत. नुकत्याच होत असलेल्या गांधर्व महाविद्यालयाच्या परिक्षा
केंद्रात त्यांचेही एक महत्वाचे केंद्र होते..त्यांच्या सरस्वती संगीत
विद्यालयामार्फत पुणे, सासवड, बारामती, भोर, पिंपरी-चिंचवड या केंद्रावरुन २०००
विद्यार्थी परिक्षेला बसत असत. १९५७ सालापासून अ.भा.गांधर्व मंडळाशी संलग्न मंडळाचे
पेट्रन म्हणून ते काम पहात होते.
स्पर्धेच्या घोषणेच्या दरम्यान मधोमध पं. दिवाणही प्रिया बेर्डे यांच्या बाजुला हरॉजर होते.यात संगीत क्षेत्रातील मंडळीही आणि आयोजकही दिसत आहेत.
मास्टर इव्हेंटस्
आणि कै. लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनच्या वतीने होत असलेल्या राज्यस्तरीय गायन,
वादन आणि नृत्य स्पर्धेचे ते प्रमुख सल्लागारही होते.
१९५७ ते १९७५ या
काळात पुण्याच्या एस एन डी डी कन्याशाळेत ते संगीत शिक्षक म्हणून सेवाही केली आहे.
डिसेंबर १३, १९२७ ला
बुवाचं वाठार (कोल्हापूर) इथे किर्तनकारांच्या घराण्यात दत्तजयंतीला त्यांचा जन्म
झाला. १९४० ते १९५० या कालावधीत इचलकरंजी इथे दरबारगवई पं, केशवबुवा इंगळे
यांचेकडे त्यांनी गुरुकुल पध्दतीने शिक्षण घेतले. १९५१ पासून ते पुण्यात आले. माधव
संगीत विद्यालयात संगीत शिक्षक म्हणू आपला पहिला परिचय त्यांनी पुणेकरांना करुन
दिला.
१९५२ पासून आपले
स्वतःचे सरस्वती संगीत विद्यालय संचलित केले..ते आजतागायत..पहिल्यांदा ते
नारायणपेठेत होते आता ते बिबवेवाडीत आहे.
आर्य संगीत प्रसारक
मंडळ, गांधर्व महाविद्यालय, भारत गायन समाज या संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध
होता.
आपले स्वतःचे
स्वतंत्र कलाकार म्हणून नाव करण्यापेक्षा त्यांनी संगीतसाधक घडविण्याचे केलेले काम
हेच त्यांच्या त्यागाचे प्रतिक मानावे लागेल. आज असे गुरु आणि गुरुकुल परंपरा
जपणारे संगीत मार्गदर्शक दोनही विरळा. त्यांच्या कामाचे मोल अनमोल आहे. त्यांचे
मोल त्यांचे संगीतसाधकच आपल्या कृतितून दाखवतील. त्यांच्या जाण्याने अखंड
चाललेल्या संगीत सेवेला खिळ बसली आहे हे नक्की.
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596726