subhash inamdar

subhash inamdar

Sunday, August 21, 2011

गंधर्व गायकीचा स्पर्श झालेला..

तो राजहंस एक

ऑगस्ट २१ वर्ष २०११ चा मुहूर्त घेऊन पुण्याच्या तरूण आणि दमदार गायकाने बालगंर्धवांच्या सांगेतिक प्रवासाची वाटचाल पुणेकर रसिक मायबापांसमोर सादर केली आणि साक्षात गंर्धवयुगाचा आभास तयार केला. अतुल खांडेकर या एकलव्यासारख्या शिष्याने हे शिवधनुष्य पेलायचा प्रयत्न केला. पण नू.म.वि. शाळेतल्या संपत इंगळे याच्या स्मृतीला वंदन करून.

सुमारे तीन तासांचा `तो राजहंस एक`.. कार्यक्रम

म्हणजे बालगंधर्व युगाची पुरती ओळख. त्यांनी लोकप्रिय केलेली पदे. त्यांचा जीवनपट उलगडत त्यांच्या काळातल्या आठवणी आणि त्यांच्या नाटकांची, त्यांच्या वैशिष्ठ्याची , पदांच्यावेळची कथा कीर्ती शिलेदार आणि शेला दातार यांच्या पडद्यावर दाखविलेल्या चित्रफितीमधून थेट सांगत ह्या राजहंसी नटाच्या नाट्याची मेहिनी प्रेक्षकांवर पडत होती. भावनिक, भाऊक आणि स्वरांनी, तानांनी लगडलेला हा प्रवास ऐकताना कांही काळ त्यांच्या काळात नेण्याचा हा प्रयत्न होता.


शांकुतलच्या नांदीपासून सरू झालेला हा प्रवास जोहार मायबाप पर्यंत माना डोलवत, टाळ्यांची दाद घेत अतुल खांडेकरांनी आपल्या गाण्यातून सादर केला. भास्करबुवांच्या शिकवणीतून रागांचे मर्म बालगंधर्वांनी समजून घेतले. तेच मर्म अतुलने जयमालाबाई शिलेदार आणि नंतर कीर्ती शिलेदाराकडून कळवून घेतले. त्याचा रियाज आळविला आणि ते तेवढ्याच श्रध्देने रसिकांपर्यंत पोचविले. त्यात भक्ति, भाव आणि सुंदर नादमयता होती. तानांची बरसात होती. शब्दातली स्पष्टता होती. लयीचा झंकार होता.

मग मना तळमळसी असो. की शारदातले मूर्तीमंत भीती असो. मानापमानातले खरा तो प्रेमा काय किंवा स्वयंवर मधले यदुमनी सदना असो. सावित्री नाटकातले सनातन नाद हा भगवाना सारखे सहसा न ऐकू येणारे पद असो..कान्होपात्रातला पतित तू पावना हा अभंग असो.... सारेच संगीताच्या साथीतून रसिकांनी अनुभवले. खरे तर हे त्याला जोडीला गायिका असती तर त्यांच्यावरचा भार हलका झाला असता. पण जे कांही व्रत म्हणून घेतले ते अखेरपर्यंत सुसंगत माडण्यांत अतुल नक्कीच यशस्वी झालेला दिसतो.



मात्र एक खरे मास्टर कृष्णरावांच्या भजनात आणि अभंगात त्याची मास्टरी आहे. पखवाज आणि टाळांच्या नादात सादर केलेली भजने वन्समोअरची पावती देऊन गेली.. वन्समोअर मिळाला की बालगंधर्व जसे नव्याने गायल्यासारखे पद सादर करायचे तसेच अतुलने पतित तो पावना चा वन्समोअर घेताना दाखवून दिले.

वर्षा जोगळेकरांनी आपल्या नेमक्या शब्दातून गंधर्व गीयकीची वैशिष्ठ्ये ठसवून दिली. त्यात त्यांची गुरूभक्ती. आवाजातला आर्जव. भावनेने शब्द नटविण्याची पध्दती. आणि त्यातही वाक्य संपून पद सुरू करण्याचा तो क्षण ते कसे घ्यायचे ते ..मजवरी तयांचे पदाच्या उदाहरणाने पटवून दिले.
बालगंधर्व गायकीच्या पदांना न्याय देताना अतुल खांडेकर यांनी घेतलेली मेहनत पदो-पदी जाणवत गेली. त्यात विविधता होती. वेगळ्या स्वरांचा समुच्चय होती. नितांत सुंदर निर्मळ स्वर होता. भक्तिची सिध्दता होती. जे शब्दात सांगता येत नाही त्यासाठी तुम्ही तो प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

आज हा अनुभव घेताना त्याच्या या प्रयोगाला दाद देण्यासाठी आलेल्यात जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार, शैला दातार, वंदना खांडेकर, आनंद भाटे, डॉ. बाबा आढाव, उल्हासदादा पवार आणि उल्लेख करण्यासारखे असंख्य जण..

`कलाद्वयी`च्या संजय गोगटे यांची ऑर्गन साथ, विद्यानंद देशपांडे यांची तबला साथ आणि वर्षी जोगळेकरांची निवेदन यातून तो साध्य झाले. डॉ. मंदार परांजपे, रवि सिधये ( व्हायोलिन), पखवाजवरील आभय माटे आणि टाळांसाठी सौ. मानसी खांडेकर यांची साथ तेवढीच मोलाची.

जीनवनिष्ठा बाळगणारे बालगंधर्व आजही विज्ञानयुगात राजहंसाच्या दिमाखदार रूपात आपल्या स्वर्गीय गाण्यातून भेटत आहेत.
ही तरूण पिढी जी विज्ञानवादी दृष्टीकोन स्विकारून जगते आहे.. त्याही पिढीत अशी भक्ति ओतप्रात भरल्याचे अशा प्रयोगातून सिध्द होते..
असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दिसणे महत्वाचे आहे. ती जबाबदरी मायबाप रसिकांची आहे.


सुभाष इनामदार, पुणे

9552596276
subhashinamdar@gmail.com

No comments:

Post a Comment