subhash inamdar

subhash inamdar

Thursday, April 14, 2011

दमां चा ८५ व वाढदिवस -नवे संकल्प

 



आज १४ अप्रैल द.मा . मिरासदार यांचा ८५ व वाढदिवस . त्याना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो असताना नवे संकल्प मिरासदार सांगत होते . विनोदी साहित्य विषयी बोलणे निघाले . हा त्यातलाच कही भाग .....

-आज उत्तम विनोद दुर्मिळ झाला आहे .चिं. वि .जोशी, गडकरी , अत्रे , दत्तु बांदेकर असे उत्तम दर्जाचे विनोदी साहित्य दुर्मिळ झाले आहे .
विनोदी साहित्य लिहले जाते ..दिवाळी अंकातून हे लेखन होते पण ते वाचले तेर समाधान होत नाही .
उत्तम विनोदी लेखन करायला निरिक्षण शक्ति हवी. अवलोकन हवे आणि वाचन भरपूर असणे आवश्यक आहे .

अश्लीलतेकड़े विनोदी साहित्य झुकलेले दिसते .त्यातली चित्रही अश्लील असतात . आजचा तरुण वर्ग याकडे लगेच अक्रुष्ट होतो . हा विनोदाचा पराभव आहे असे माला वाटते .
चांगले विनोद निर्माण करता येत नाहीत असे त्याचा अर्थ होतो .
-अनेक उत्तम कथाकार . उदाहरण म्हणजे चिं. वि .जोशी , दी . बा . मोकाशी
उत्तम विनोदी कथा लिहायचे ..पण ते कथाकथन करू सकत नव्हते ..
कथाकाथनाला थोडेफार वक्तृत्व अंगी असले पाहिजे ..शब्दात नाट्य हवे ..
शाब्दिक अभिनय यायला हवा आहे .

-८४ संपून आज मी ८५ वर्षात पदार्पण केले . प्रकृति अद्याप चांगली आहे .
त्याचे श्रेय आई वडिलांना जाते .अजुन आवाज ठनठणित आहे .
माइक नसला तरी आवाज सर्वांपर्यंत पोचतो .
-एक उत्तम विनोदी नाटक लिहायचे आहे .
आणि मराठीत उत्तम विनोदी कादंबरी नाही ..
ती लिहावी असा संकल्प आहे .


सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
www.subhashinamdar.blogspot.com

1 comment:

  1. अत्तिशय सुंदर आणि योग्य असेच विचार आहेत.... द, मा. आम्ही तुमच्या नव्या विनोदी साहित्याची वाट पहाट आहोत..... तुम्हाला वाढ दिवसाच्या शुभेच्छा .असेच उत्तम आरोग्य ,,आणि दीर्घायू मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ...!!

    धनश्री तुळपुळे

    ReplyDelete