subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, November 15, 2017

नादरूपच्या नृत्याविष्काराने रसिक भारावले



अनेकदा कलाकारांच्या सत्कार समारंभानंतर त्यांचे कलेतील स्थान आणि त्यांनी केलेले कर्तुत्व दाखविण्यासाठी रंगमंचीय आविष्करण केले जाते..पण मिडीयामध्ये सत्कार समारंभाची दखल घेतली जाते..पण ज्या कलावंतांनी मेहनत घेऊन नंतर केलेले सादरीकरणाचा फक्त एका वाक्यात उल्लेख होतो..ते त्या कलावंताच्या कलागुणांना काही प्रमाणात मारक ठरते..तारक नाही..





रविवारी टिळक स्मारक मंदिरात गानवर्धनच्या वतीने ख्यातनाम कथ्थक गुरू शमा भाटे यांना डॉ. विजया भालेराव पुरस्कार नृत्यगुरू सुचेता नातू यांच्या हस्ते दिला गेला..सन्मान समारंभानंतर  `नादरूप `,या शमा भाटे यांच्या नृत्यालयामार्फत त्यांच्या शिष्यवर्गाने जो अविस्मरणीय आनंद दिला त्याची नोंद एक रसिक म्हणून घ्यावीशी वाटली.





पंडिता रोहिणी भाटे यांच्या शमा भाटे ह्या नात्याने सून. पण मला रोहिणी भाटे य़ांच्या पहिल्यापासूनच्या शिष्यात गणल्या जातात. डेक्कनवर पूर्वीच्या कॉफि हाऊसच्या मागे रोहिणी भाटे यांचा नृत्यवर्ग.तर टिळक रोडवर शमा भाटे यांची `नादरूप `ही संस्था कथ्थक थडे देणारी संस्था..काळओघाप्रमाणे रोहिणीताई गेल्या आणि त्यांचे अस्तत्व नादरूपने मनोमन जपले..ते आपल्या शिष्यवर्गाच्या उत्तम सादरीकरणाने काल पुन्हा एकदा सिध्द झाले.

त्या बोलतात त्या आपल्या कलेतून आणि विद्यार्थ्यांच्या कलेतून..
काल प्रेक्षागृहात दर पाच मिनिटांनी टाळ्यांचा नाद घुमत होता..याचे सारे श्रेय जाते.ते शमा भाटे यांना आणि त्यांच्या उत्तम तयारीने सादर केलेल्या शिष्यवर्गाला.



नादरूपच्या वतीने अर्पिता पाटणकर यांनी सुजाता नातू, शमा भाटे आणि उपस्थित सर्व रसिकांचे स्वागत करताना जी मने जिंकली..ती पुढच्या सर्व कार्यक्रमाची नांदीच होती. नृत्यकार्यक्रमाची सुरवात भगवान शंकरांचे वर्णन असणारा शिववंदना सादर करून..



रंगमंचावर उत्तम रित्या दर्शन घडवून खिळवून ठेवणारी हालचाल करत रसिकांची मने जिंकली. सादर केलेल्या सगळ्याच मोहक रचना..त्याचा सामूहिक आविष्कार आणि आपल्या उत्तम आणि प्रसन्न आविष्काराने रसिकांची पावती मिळविली.


पुढे ताल रुपक..नंतर केदार चतरंग...कालिया थाडे आवे मोहन..अर्थात कालिया मर्दन सर्व नर्तकांचा सुंदर आविष्कार पहाणे एक मन प्रसन्न करणारी गोष्ट होती.



द्रुत तिनतालात काही शिष्यांनी  आपल्या तरल अशा नृत्याविष्कारातून केलेली नृत्य आराधना किती प्रगल्भ होत गेली आहे याचे प्रतिक देत होती. हाताची मोहक हालचाल..गिरक्या, पदन्यास आणि केवळ  पायातल्या घुंगरातून साधलेली तपळाई.. सारचे कौशल्य दाखवित होती.


समुद्रमंथन  करणारा सर्व कलावंताचा आविष्कार केवळ अनुभवणे महत्वाचे होते. एकमेकांच्या उत्तम संगतीने तो सादर होताना..त्याला लाभलेली संगीत आणि  गायनाची साथ अंगावर रोमांच ऊभे करीत होती.


शेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील लालित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते.





अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, शिवानी करमरकर, कृपा तेंडूलकर, भार्गवी सरदेसाई, इषा नानल, निखिल परमार, निकिती कराळे, गिरीश मनोहर


या नृत्यनिपुण कलाकारांचा सहभाग होता. यात प्रत्येक कलाकाराचे योगदान तेवढेच मोलाचे होते.


त्यांच्या उत्तम गुणग्राहक कालाविष्काला प्रत्यक्षात आणणारे शमा भाटे यांच्या सारखे गुरू हे आपल्या सांस्कृतिक परंपरेचे खरे पाईक..त्यांनी आपली सांस्कृतिक परंपरेची विरासत आपल्या खांद्यावर मोठ्या हुकमतीने पेलली आहे..हा कार्यक्रम याचेच ठळक उदाहरण होताशेवटच्या भैरवीतून साकार केलेले  निरंकर, निराकार,निरामय असे भजन..त्यातील सासित्य..संथ पण सतत धावणारा संगीताचा प्रवाह आणि त्यात नादरूपच्या शिष्यवर्गाने रंगमचावर केलेली कमाल.. सारेच मोहक होते.


गानवर्धन संगीत , संगीतावरची चर्चा आणि नृत्यकलेलाही किती महत्व देते ते अशा कार्यक्रमातून ठळकपणे सिध्द होते.



- सुभाष इनामदार, पुणे
9552596276


Wednesday, November 8, 2017

नवोदितांचे पथदर्शक प्रा. प्रकाश भोंडे



मित्रवर्य प्रकाश भोंडे,

आपल्या सत्तरीच्या निमित्ताने शनिवार अकरा नोव्हेंबरचे स्नेहमय आमंत्रण मिळाले आणि माझ्या मनातील आपल्या विषयीच्या विचारांचे मंथन सुरू झाले.. आपल्या तरतरीत आणि लोभस व्यक्तिमत्वाने पुण्यातील सांस्कृतिक मंच नेहमीच उजळून निघाला आहे..

स्वरांनंद...या संगीत क्षेत्रातल्या नवोदित कलावंतांना आपल्या संस्थेच्या मंचावरून अनेक वार आपली कला सादर करता आली..करताहेत..

हौसेतून हा छंद आपण जपला.. स्वरांनंद उभी केलीत..जोपासली..वाढविली..आणि वेळोवेळी नव्या विचारांचे मार्गदर्शक मिळविलेत..त्यांची गाणी ..त्यांच्या कविता..रसिकांना ऐकविल्यात..मोहून तृप्त केलेत..आपल्या सत्तरीच्या पर्दापणाबरोबरच स्वरांनंदचा सुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे..हे आपले सौभाग्य आणि रसिकांचे भाग्य..



ऐन उमेदिच्या काळात भरपून मेहनत घेउन स्वरांनंदची टूर महाराष्ट्रभर काढलित..त्यांचे नियोजन आणि संयोजन उत्तम केलेत. नेवे गायक..वादक..संगीतकार..कवी हेरून त्यांच्या गीतांना आपल्या संस्थेमार्फत मराठी रसिकांसमोर सुंरेलपणे पोहचवलेत..आपली आवड, मंतरेलेल्या चैत्रबनात, बाबुजी, गदिमा, पुल, पाडगावकर, खळे काका, यशवंत देव..अशा संगीतकारांची गाणी नव्या पिढीकरून घोकून घेउन रसिकांना हा सुरेल नजराणा अनेक ठिकाणी बहाल केलात..

आपण केवळ स्वरांनंदचा संसार मांडलात, थाटलात..आणि सजविलात. आपले हे कर्तृत्व मराठी रसिक विसरू शकणार नाही..हे ही तितकेच खरे..

खरेतर आपण वाणिज्य विषयाचे अध्यापक..पण बी एम सी सी च्या नोकरीत रस घेऊन..मुलांना धडे दिलेत..पण चाकरी बजावतानाबी मनातला ताल कायम सांभाळलात.. प्राध्यापकी करताना विद्यार्थी घडविलेत.. त्यांना सुयोग्य मा्रगदर्शन केलेत..

आपण नकालाकार भोंडे यांचे नातू..त्यांची नकला करण्याची पंरपराही आपण जपलीत.. साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या आवाजातील नकला करण्याचे कौशल्य आम्ही जाणून आहोत..



आपण गात नाही..काही वाद्यही वाजवित नाहीत..पण आपण संगीताची सेवा करणारी स्वरांनंद ही संस्था चालविता..आधी बिज एकले..सारखे आधी सारे पुण्यात सादर करायाचे मग त्यात सुधारणा करून ते इतर शहरात न्यायचे.. ही किमया स्वरांनंदच्या मार्फत आपण केलीत.




आपल्या व्यवस्थापनातून..स्वरांनंदचे नाव..बोलते केलेत..आणि अनेक उपक्रमांना आपण आपले मोलाचे सहकार्य करता..अनेकांचे आपण सल्लागार बनता..त्यांचे उपक्रम अधिक रुजावेत..त्यांची दखल घेऊन अनेकांना ते सादर करण्यासाठी उपकृत करता..

भोंडे कॉलनीतले आपले अस्तित्व आज उणीपुरी सत्तर वर्ष टिकवून ठेवलेत..आपल्या स्वभावाने अनेक कलावंतांचे पहिले कार्यक्रम तुम्ही केलेत..त्यांना प्रथम मंच तुम्ही दिलात..पण कुठेही मीपणाचा वास नाही..


आमच्यासारख्या असंख्य मित्रांचे मार्गदर्शक आहात..आपल्या प्रतिसादाने आणि प्रोत्साहनाने आम्हालाही  काही नवे करण्याची उर्मी मिळते ती तुमच्यामुळे..





असाच आमचा हा मार्गदर्शक पथप्रमुख शतायुषी व्हावा..निरोगी आयुष्याची बळकट दोरी घेउन नव्या क्षितीजाकडे झेपावत जावा..हिच सदिच्छा..आपल्यासाराखे मित्र मिळविलेत हीच आमची कमाई..
अशा सगळ्यांकडून आपल्याला सत्तराव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभकामना..
शुभंभवतू....



* मंदार जोगळेकरांच्या ग्लोबल मराठी या वेबसाईटच्या निमितात्ताने प्रकाश भोंडे यांनी आचार्य अत्रे यांच्या आवाजात केलेली ही प्रस्तावना..त्या्च्या नकलांच्या प्रदर्शनाचे प्रतिक आहे..ती लिंक मुद्दाम देत आहे..**







-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276