‘स्वरगंध प्रतिष्ठान’ या नावाने आज गुरुपुष्याच्या मुहूर्तावर संगीत क्षेत्रात आपली कारकीर्द घडविणा-या कलावंताला पं. प्रभाकर जोग यांनी ट्रस्टची स्थापना करून आपले समाजासाठीचे योगदान दिले. प्रभात कंपनीच्या मालकांच्या बंगल्यानजीक असलेल्या सुरेश रानडे यांच्या घरी या ट्रस्टची अधिकृत घोषणा केली गेली.. यावेळी स्वतः प्रभाकर जोग आणि इतर ट्रस्टी मंडळींसह. स्वरांनदचे प्रा. प्रकाश भोंडे, शास्त्रीय गायिका शैला दातार आदी मान्यवर उपस्थित होते. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतात (करिअर करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना या ट्रस्टतर्फे यंदापासून वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात
येणार आहे.
त्यासाठी राज्यभरातून उचित विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. ट्रस्टमध्ये जोग यांच्यासह सुरेश रानडे, शिरीषकुमार उपाध्ये, विनोद बापट (वकील) आणि रवींद्र आपटे या विश्वस्तांचा समावेश असणार आहे. हे सारे याप्रसंगी उपस्थित होते.
समाजाने अनेक वर्षे आपल्या कलेला उरीशिरी घेत प्रेम केलं. आता त्याची परतफेड करता यावी आणि संगीतात काही करू पाहणाऱ्या तरुणांना केवळ पैशाच्या अडचणींनी मागे परतावे लागू नये, म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे जोग यांनीघेतला आहे.. ‘अनेक गुणी कलाकारांना केवळ पैशाच्या समस्येमुळे आपली कला पुढे नेता येणे कठीण होते. अशा गुणी विद्यार्थ्यांच्या कलेला आर्थिक हातभार लावण्याचे काम हा ट्रस्ट करणार आहे.
.ते सांगतात‘‘आज मी ज्या टप्प्यावर पोचू शकलो, त्यामागे बबनराव नावडीकर यांनी मला केलेल्या मदतीचा मोठा वाटा आहे. आमच्या घरची आर्थिक परिस्थिती माझ्या तरुणपणी बेताचीच होती. मात्र, नावडीकरांनी मला आर्थिक मदतीचा हात दिला. त्यामुळे मला माझा संगीताभ्यास सुरू ठेवता आला. आज मीही नावडीकरांप्रमाणेच इतरांच्या मदतीला उभा राहू पाहत आहे. त्यातून नवे ‘प्रभाकर जोग’ भविष्यात उभे राहिल्यास मला आनंद होईल.’
वयाच्या १२व्या वर्षी पुण्यातील वाड्यांमधून सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करणारे जोग हे पुढे संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहायक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. त्यांनी गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना साथ दिली. ‘लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले. स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी ‘गुरुदेवदत्त’ या १९५१ सालच्या चित्रपटात व्हायोलिन वादनाचे काम केले. जोग यांनी नोटेशन कलेत प्रावीण्य मिळवले. त्यांनी मराठी चित्रसृष्टीतील संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पं. हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम व वसंत प्रभू यांच्यासोबत काम केले. ‘जावई माझा भला’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट असून, त्यांनी २२ चित्रपटांना संगीत दिले आहे.