शुक्रतारा...पुस्तकांच्या निमित्ताने
त्यांचे
गाणे आजही अनेक गायक आपापल्या आवाजात ते गातात..त्याला टाळ्याही पडतात...मात्र
वयाची बांधिलकी आल्याने आता वयाच्या ८३ व्या ते गाऊ शकत नाहीत..मात्र त्यांच्या
प्रत्येक गाण्याच्या असंख्य तबकड्या आणि सीडी अनेक रसिकांच्या घरात ऐकल्या जात
आहेत..४ मे १९९४ ला असाच एक साहित्य क्षेत्रातला चमत्कार घडला...शतदा प्रेम
करावे...यां नावाने अरूण दाते यांनी आपल्या आयुष्यातस्या आठवणी शब्दरूपाने
पुस्तकातून मांडल्य़ा...हेही पुस्तक त्यांच्या गाण्य़ाइतकेच सुरेल झाले होते..त्याचे
प्रकाशन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले..
त्याला आता २१ वर्ष
झाली...आजही तीच आवृत्ती फिरते आहे...आता मात्र ते पुस्तक बाजारात मिळत
नाही...म्हणूनच मोरया प्रकाशनाने ते शुक्रतारा ..या नावाने..अरुण दाते यांच्या सुगम
संगीताच्या गाण्याला ५५ वर्षे पुरी झाली ..या निमित्ताने तेच पुस्तक प्रकाशित
केले..
पुण्यात यशवंतराव
चव्हाण नाट्यगृह २६ मे रोजी रसिकांनी
तुडूंब भरले होते..अतुल दाते यांच्यामुळे या गितांचाही आस्वाद रसिकांना घेता
आला...ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते हे पुस्तक पुन्हा रसिंकाच्या
चरणी रूजू झाले..सुलभा तेरणीर आणि धनश्री लेले यांच्यामुळे ते लिखित स्वरूपात
साकार झाले...समर्थ रामदासांचा जीवनपट खुलवून सांगणारे अभ्यासू संतसाहित्याचे
अब्यासक सुनिल चिंचोळकर हेही इथे ङजर होते..
स्वतः
अरूण दाते सारे अनुभवत रंगमंचावर दिलखुलासपणे दाद देत होते..रंगमंचावर शुक्रतारा
पुस्तकाचे मुखपृश्ठ झळकत होते..रसिकांना अरुण दाते यांच्या
गाण्यांचा ‘स्वरगंगा’ हा कार्यक्रम ऐकण्याची.
उत्सुकता होती..ती गाणी आज मंदार आपटे, श्रीरंग भावे, शरयू दाते, रेवा तिजारे हे
कलाकार ती सादर करणार होती..
मात्र या पुस्तकांची दुसरी आवृत्ती निघायला २१
व्रषी लागावी ही खंत अनेकांच्या भाषणातून व्य़क्त होत होती.. दाते साहेबांच्या दोन
मैफली असतात..एक गाण्याची मैफल आणि एक गप्पांची मैफल..विजय कुवळेकरांनी यातल्या
काही आठवणीही इथे सांगितल्या..टेक्स्टाईल इंजियरची परिक्षा नापास होऊनही नापासाची
तार जेव्हा इंदूरला बाबांच्या..रामुभौय्यांच्या हाती पोहोटली तेव्हा बाबांनी
सर्वांना बोलावून पार्टी द्यायचे ठरले..तेव्हा बाबा म्हणाले होते..
`टेक्स्टाईल इंजिनियरिंगमध्ये पास होणारे
संख्य लोक असतील पण नापास झाला तरी उत्तम गाणारा दुस-या कुणाचा मुलगा आहे का..``..ह्या वडीलांनी
मुलाला दिलेला आत्मविश्वास आजही ठळकपणे सांगितला पाहिजे..प्रतिभावंताचे काम हे
चंद्रासारखे असले पाहिजे..हे बा.भ. बोरकारांचे सांगणे कुवळेकरांनी इथे आवर्जुन
सांगितले..अरू भेय्यानी आपल्याला आलेल्या असंख्य दाहक गोष्टींचे चांदण्यामध्ये
रूपांतर करून लोकांना दिले.. शुक्रता-याला जे तेज लाभले ते या चांदण्याचे तेज आहे.
ते कधीही ढळणे शक्य नाही...असेही कुवळेकरांनी स्पष्ट केले..
ज्यांनी
हे पुस्तक शब्दांकित केले त्यांनी सांगितले की ते जेवढे उत्तम गातात..तेवढेच ते
उत्तम बोलतातही..ते बोलणे टिपण्याची संधी मिळाल्याचे समाधान सुलभा तेरणीकरांनी
आपल्या संवादात सांगितले..
सा-या कार्यक्रमाचे संचालन ऋचा थत्ते यांनी अनके निवेदक रंगमंचावर आणि मान्यवर स्टेजवर असताना धाडसाने..उत्तम केले
सा-या कार्यक्रमाचे संचालन ऋचा थत्ते यांनी अनके निवेदक रंगमंचावर आणि मान्यवर स्टेजवर असताना धाडसाने..उत्तम केले
‘शुक्रतारा’ या गाण्याला नुकतीच पूर्ण झालेली ५५ वर्षे, देशात आणि परदेशात ‘शुक्रतारा’चे झालेले २ हजार
६०० प्रयोग, अरुण दाते यांचे ८३ व्या वर्षांतील पदार्पण या निमित्ताने मराठी
भावसंगीतातील ‘शुक्रतारा’ असणाऱ्या अरुण दाते यांचा जीवनप्रवास नव्या स्वरूपात रसिकांपर्यत..वाचकांपर्य़त
पोहोचले याचा आनंद इथे व्यक्त होत होता..
- सुभाष इनामदार, पुणे
9552596276