subhash inamdar

subhash inamdar

Monday, October 21, 2013

कथेत जीवन शोधतो


- गिरीष कुलकर्णी

 एखाद्या कलाकृतीचा समाजावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे
चित्रपटाच्या कथेत मी माझं जगणं शोधण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या
चित्रपटांमधून काय संदेश जातो याविषयी मी तत्पर असतो, अशी भावना
दिग्दर्शक-अभिनेता गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या युवक विभागातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी स. प. महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवा
विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संदीप जगधने या 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. 

शिल्पा पोफळे यांनी मुलाखत घेताना गिरीष कुलकर्णी यांच्या आयुष्यातील विविध पैलूं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सहकार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन,  पुष्पाताई नडे, विलास कुलकर्णी, प्रा. संजय तांबट, श्रीकांत यादव, मयूर कर्जतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीष कुलकर्णी म्हणाले, की शालेय जीवनपासूनच सगळ्या
कलांचा समुच्चय असलेलं क्षेत्र निवडायचं ठरवलं होतं त्यामुळे नाटकाकडे
वळायचा निर्णय घेतला. संस्कारभारतीनं मला एक स्वप्न आणि विश्वास दिला.
वाचनातून  मानवी मनाचे वेगवेगळे पैलू समोर आले, त्यांची अनुभूती
घेण्यासाठी लोकांना भेटलो आणि माणसं वाचायची, त्यांच्यावर प्रेम करायची
सवय लागली. माझ्या कथेत अनेक पात्रं दिसतात त्याचं कारण हेच आहे. वळू,
देऊळ, मसाला नवीन येणारा हायवे या चित्रपटांमध्ये तुम्हाला तुम्ही जे
जगता त्याचं प्रतिबिंब पहायला मिळेल. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार मयूर कर्जतकर यांनी मानले.

Saturday, October 5, 2013

हिंदू महिला सभेच्या नवरात्रोत्सवास आरंभ

गेली ६२ वर्षे सदाशिव पेठेतल्या शिवाजी मंदिर इथे होणारा नवरात्र महोत्सव ती सारी जागा विकासकाला दिल्याने त्यावर बहुमजली इमारत उभी रहात असल्याने पुण्यातच पण केसरी वाड्यासमोरच्या गुप्ते मंगल कार्यालयात प्रतिष्टापित झाला..हिंदू महिला सभा, पुणे यांच्या वतीने यंदाच्या म्हणजे ६३ व्या वर्षीच्या नवरात्रींचे कार्यक्रमही सुरु झाले..
पुन्हा त्या जागेत कधी सुरु होणार याची साशंकता कार्यकर्त्या महिलांच्या मनात आहे.
असो..तर आता नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी..

हिरव्या साडीतल्या व्हायोलीनवादिका सौ. चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलीन गाते तेव्हा..या कार्यक्रमाने उत्सवातील पहिल्या सुरेल आणि स्त्रीच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणा-या या एका कलावंत , सक्षम आणि नोकरी करुन कला जपणा-या या कलावंत महिलेची स्वराशी असलेले नाते यामुळे पुन्हा उजेडात आले.
विविध हिंदी मराठी गीतांनी त्यांनी तो सादर केला..तो रंगला हे काही सांगायची गरज नाही. त्यांची वाद्यावरची हुकमत आणि त्यांना  मिळालेली मोजक्याच साथीदारांची साथ..यामुळे गाण्यांना पुन्हा होऊन जाऊ दे (वन्समोअर) ची दाद मिळाली.
हे शारदे वागेश्वरी..ने सुरवात करून..लागा चुनरीमे दाग या भैरवीने व्हायोलीन गात राहिले.. महिला आणि रसिक ते ऐकत रहाले..ते तल्लीन झाले होते..टाळ्यांना प्रकिसाद मिळत होता.
निवेदक राजय गोसावी यांनी माफक पण आवश्यक माहिती सांगून अनेकांच्या मनात गाण्याबद्दलची ओढ निर्माण केली.

अभिजित जायदे यांची तबला साथ..तर राजेंद्र साळुंखे यांची तालवाद्यातून मिळालेली रंगत यामुळे गीते मोहक होत गेली. नचिकेत संत यांच्या की-बोर्डवरच्या नजाकतीने व्हायोलीनवरच्या गीतांमधले सुरेल पीसेस मनसोक्त आणि तंतोतंत ऐकता आले.







चारुशीला गोसावी यांचा सत्कार हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांच्या हस्ते केला गेला.
उद्यापासून शनिवारपर्यंत रोज कलावंत महिला, आणि विविधअंगी गुण असलेल्या स्त्रीला इथल्या स्ंस्थेत पाचारण केले गेले आहे.


पुण्याच्या शिवाजी मंदिराच्या परिसरात आत्तापर्यंत असलेल्या या संस्थेला आता नव्या दिशा आणि नवा मार्ग मिळेल..स्त्रीची प्रगती आणि स्त्रीचा विकास साधायची असेल विविध क्षेत्रात काम आणि कार्य करणा-या महिलांना नव्याने लोकांसमोर आणण्याचे काम करायला हवे..ते ही संस्था करत आहे.


- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, October 3, 2013

संतदर्शन मंडळाने ठेवली म.गांधींची आठवण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कालच्या जयंती निमित्ताने श्री. राम साठे अध्यक्ष असलेल्या संतदर्शन मंडळाने ख्यातनाम आणि बुजुर्ग असा पुण्याच्याच संगीत प्रांतातले एक नाव म्हणजे फैय्याज हुसेन खान याचा सत्कार निवारा सभागृहात आयोजित केलेल्या पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन्ही श्रेष्ठ कलावंतांच्या रचनांचा कार्यक्रम सादर केला..त्यावेळी केला गेला.

स्वतः श्रीराम साठे यांनी पंडितजींच्या मागे तंबोरा साथ करुन एकलव्यासारखे त्यांची गायकी आत्मसात केली..त्याची एक झलक वयाच्या ८० व्या वर्षाही इथे सादर करुन टाळ्या मिळविल्या.


आज माहित नसलेल्या माणसांच्या वाढदिवसाचे पोस्टर चौका चौकात झळकते..पण महात्मा गांधी यांचे साधे चित्रही गांधी जयंती दिवशी दिसत नाही याची खंत फैय्याज हुसेन खान यांनी बोलून दाखविली.
यावेळी व्यासपीठावर रवींद्र दुर्वे, आणि शरदचंद्र पाटणकर, तरुण संगीतकार हर्षद अभिराज आणि स्वतः श्रीराम साठे तसेच सत्कारमूर्ती फैय्याज हुसेन खान होते..


यावेळी `मिले सूर मेरा तुम्हारा` हा संगीताचा कार्यक्रमही रंगतदार असाच झाला. यात या दोन महान कलाकारांनी गायलेल्या रचना सारद झाल्या. श्रीपाद भावे, राजेश दातार, जयश्री कुलकर्णी आणि वाकनीस या गायकांचा तर साथीला पद्माकर गुजर, राजेंद्र दूरकर, साने आणि चारुशीला गोसावी यांची साथ मिळाली. 

मंगेश वाघमारे यांच्या आगळ्या निवेदनातू कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली. 
विविध सामाजिक आणि सांस्कतिक दिवसांचे महत्व लक्षात घेऊन..ही संस्था रसिक भावीकांनी संगीताचा आनंद देत असते.

-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, October 2, 2013

अजून गदिमा...थोरवीची गाथा


गदिमांच्या ९४ व्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या थोरवीची गाथा ऐकण्याचे भाग्य..
आम्हा पुणेकरांना लाभले ते त्यांच्या अप्रकाशित कवीतांचे पुस्तक त्यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांनी लिहले आणि ते प्रकाशित केलेल कॉन्टिनेंटलच्या  देवयानी अभंय्कर यांत्या वतीने...  अजून गदिमा...या पुस्तकाच्या निमित्तानि पुन्हा एकदा गदिमांची थोरवी रसिकांच्या कानी घातली गेली..खरे पाहता पुन्हा एकदा माडगूळकर पुन्हा जीवंत झाल्यासारख्या वाटले.. 


तरुण पिढिचे लोकमान्य कवी..संदीप खरे ..यांनी माडगूळकरांच्या सहवासात यानिमित्ताने आपल्याला रहाता आले..याचा अधिक आनंद झाल्याचे सांगून आमची पिढी त्यांच्या कवीतांवर आणि गीतांचा आजही किती चाहती आहे हे स्पष्ट केले.

कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.

गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले.


श्रीधर माडगूळकरांनी जयंतीच्या दिवशीच गदिमांच्या जन्माची कथी जी ऐकविली..तेव्हा ड़ोळ्यातून पाणी आले..मृतसमान असलेल्या मांसाच्या गोळ्याला जेव्हा विस्तवाचा स्पर्श झाला आणि जेव्हा पहिला कौहमचा उद्गार आला तेव्हाच हा मोठा होणार याची कल्पना आली...पुरण्याची तयारी असताना सुईणीने केलेल्या या प्रयत्नातून हा महातवी उदयाला आल्याची भावना..फार निराळी आणि चटकालावून जाणारी होती..


आपल्या आईेने बबनराव नावडीकरांच्या १०८ वेळा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला बेलबागेत आपल्याला नेले..तिथेच गदिमांची महती लक्षात आली..मात्र ती गेली त्यानंतर चारच दिवसांनी गदिमा गेले..ह्या दोन्ही घटना आयुष्यात चटका लावणा-या होत्या असेही निफाडकरांनी सांगितले.  ३५ उर्दु शायरांचा परिचय करुन देणारे मै शायर हेपुस्तक आज प्रकाशित होते याबद्दल समाधान व्यक्त करुन माडगूळकरांच्या पुस्तकाशेजारी बसणायचे भाग्य म्हणजे त्यांच्या तरणाजवळ बसण्याचा हा मान आहे..असे समजतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

देवयानी अभ्येकरांच्या निवडीचेही अनेकांनी कौतूक केले. ७५ वर्षीची परंपरा असलेल्या प्रकाशन संस्थेचे आजोबा.अनंतराव, वडील. अनिरुध्द आणि आता काका.रत्नाकर कोणीही नाहित.याची वेदनाही देवयानी यांनी बोलून आपल्या भावना वाचकांसमोर उघड्या केल्या..



-सुभाष इनामदार, पुणे



subhashinamdar@gmail.com
9552596276