subhash inamdar

subhash inamdar

Saturday, June 29, 2013

नाट्यसंगीताचा बहारदार नजराणा....

पुण्याच्या ऐतिहासिक अशा हिराबागेतल्या टाऊन हॉल कमिटीच्या पेशवाई दिवाणखान्यात शुक्रवारी संध्याकाळी पावसाळी वातावरणाचा साज बाहेर सजत असतानाच नाट्यसंगीताच्या सुरावटींचा बहर एकामागोमाग  रंगत होता...ज्या वास्तुने अतिशय वेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची व्याख्याने..ऐकली ..समाजातल्या धुरंदर मंडळींचे कौडकौतूक केले..त्या या वास्तुत रंगलेल्या मैफलीची आठवण आजही ताजी आहे..संगीत नाटकांच्या वैभवशाली पंरंपरेचा भरजरी नजराणा दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या वतीने पूर्वी भावे यांच्या सुरेल निवेदनातून पुणेकरांच्या पसंतीस पडला...त्यांनी वन्समोअरच्या आणि टाळ्यांच्या निनादात नाट्यसंगीताच्या या पदांना दिलखुलास दाद दिली.


१८८० सालच्या `संगीत शाकुंतल` या संगीत रंगभूमीचा आरंभ समजल्या जाणा-या नाटकातल्या `पंचतुंड नर रुंड मालधर..`  या नांदीने कार्यक्रमाची सुरवात केली.. 


श्रीरंग भावे, धनंजय म्हसकर, गौतमी चिपळूणकर आणि ऋतूजा लाड या चार तरुण कलाकारांनी नाट्यसंगीताच्या सादरीकरणातून आजही समर्थपणे ही युवापिढी किती तयारीने नाट्यसंगीताची ही परंपरा सांभाळते आहे याचे उदाहरण मिळते.


 
`नांदी ते भेरवी`... असा सतरा गीतांचा हा प्रवास या कलावंतांनी आपल्या ओजस्वी आवाजातून रंगतदारपणे सादर केला...यातही अमोल पटवर्धन या मुळातल्या सांगलीच्या पण सद्या पुण्यात राहणा-या कलाकाराने सादर केलेले ययाती-देवयानी या नाटकातले `प्रेम वरदान हे पद...`   तसेच सावनी दातार-कुलकर्णी यांनी भावगीत आणि नाट्यसंगीत यांचे एकत्रित मिश्रण असलेले ज्योत्स्ना भोळे यांनी कुलवधूसाठी गायलेले पद `खेळेल का देव माझा माझीया अंतरी...`आणि गायत्री वैरागकर-जोशी यांनी आवाजातली ..... दमदार तयारीतून सादर केलेले `आज सुगंध आला लहरत `...यातून आपली नाट्यसंगीतातली पकड सिध्द केली. 

`मंदारमाला` नाटकातली `बसंत की बहार आयी... `या श्रीरंग भावे आणि धनंजय म्हसकर यांच्या बहारदार सादरीकरणाने  दोन्ही कलावंताने आपली छाप पाडली.



`हे सूरांनो चंद्र व्हा..`हे ऋजूता लाड हिने गायलेले पद तर फारच आकर्षक होते..
त्यातला भाव आणि त्यातली आर्तता सारेच तिच्या सुरांमधून आतप्रोतपणे व्यकत झाले..यातून तिची तयारी आणि सादरीकरणातला दिमाखदारपणा साराच सूरांतून पाझरतो..
 




श्रीरंग भावे यांचे कट्यार मधले `घेई छंद...`आणि धनंजय म्हसकर यांचे `श्रीरंगा कमला कांता..`ही दोन्ही पदे रसिकांनी डोक्यावर घेतली...म्हणजे त्यांच्या पसंतीची पावती वन्समोअरच्या निनिदात मिळाली...दोघांचीही स्वरांची हुकमत आणि नाटयसंगीत गाण्यासाटी पुरेशी तयारी ..सारेच उत्तम...

ऋजूता लाड हिने अखेरीस सादर केलेले `कट्यार`मधील `लागी कलेजवा कट्यार`....चा परफॉमन्स तर खरोखरीच लाजवाज होता...

 `बालगंर्धव `चित्रपटातल्या ...`चिन्मया सकल ह्दया ..`या भेरवीने जेव्हा श्रीरंग भावे यांने मैफलीची सांगता केली  तेव्हा असा कार्यक्रम अजुन चालावा अशी चुटपूट लागून राहिली..

 

एकूणच नाट्यसंगीताचा हा बहारदार नजराणा इथे रसिकांसमोर सामोरा आला...त्यातली मैफलीची रंगत वाढविणारे पूर्वी भावे हिचे निवेदन होते..त्यात माहिती तर होतीच पण याविषयाची मांडणी आणि नाटकातल्या संगीत परंपरेचा असलेला अभ्यासही आर्वजून दिसत होता...सहजता आणि माधुर्यता याचीही यात तेवढीच ताकद होती..





ही मैफल रंगण्यापाठीमागे आहेत आणखी दोन कलावंत..खरे तर हे चारही गायक कलाकार मुंबईचे..पण त्यांना साथ करणारे आमचे पुण्याचे राजीव परांजपे यांचा ओर्गनवरचा बोलका हात जेव्हा स्वरांवर हळुवार फिरतो 







........
आणि प्रसाद जोशी यांचा तबला बोलाप्रमाणे नाद काढतो..तेव्हा रंगत अधिक वाढते...हे मान्यच करायला हवे.




एकूणच ज्यांनी या नाट्यसंगीत मैफलीचा आनंद घेतला ते रसिक भाग्यवान ठरले....असे कार्यक्रम करून दादार माटुंगा कल्चरल सेंटर आपल्या दिमाखदार परंपरेचा सार्थ अभिमान बाळगत ती जोपासत ठेवण्याचे व्रत अंगीकारत आहेत...याचा अभिमान आहे..





- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276









Saturday, June 22, 2013

व्यंगचित्रही जिव्हारी लागते तेव्हा...

व्यंगचित्रात जो कुत्रा दाखविला आहे तो पिसाळलेला आहे..शिवसेनेकडे पाळलेला कुत्रा असल्यामुळे तो भुंकत नाही आणि कुणाला विनाकारण चावत नाही....मंगेश तेंडूलकरांच्या ७०व्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना संजय राऊत यांनी राष्टवादीचे आमदार अंकूश काकडे यांना अशा कोपरखळी देऊन व्यंगचित्रही राजकीय नेत्यांना कसे लागते आणि किती खुपते याचे दर्शनच घडविले..

ही घटना घडली ती बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात...जिथे राष्ट्रवादीचे अंकूश काकडे यांनी एका व्यंगचित्राचा उल्लेख करुन यात राष्ट्रवादीचा कुत्रा तीन वेळा भुंकतो..मनसेचा नुसतीच कोल्हेकुई करतो...असे विविध राजकीय पक्षांवर काढलेल्या व्यंचित्रात शिवसेनेचा यात उल्लेखही केलेला नसल्याचे दाखवून दिले...याचा दाखला देत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपल्या भाषणात अशी शाब्दिक खेळी करत उत्तर दिले..

हे राजकीय लोक व्यंचित्रातला आनंद घेतानाही आपले राजकीय व्यासपीठ बिलकूल सोडत नाहीत..आम्ही तेंडूलकरांच्या व्यंगचित्राकडे पहाताना त्यातल्या आशयाकडे वेगळ्या पध्दतीने पाहतो...आम्ही ते सारे हसत हसत पचवितो असे म्हणतो..पण प्रत्यक्षात मात्र तसे व्यंग दाखविले की तुटूनही पडतो..कुठेतरी ते चित्र डोक्यात पक्के घेतो..आणि वेळ आल्यावर त्याचाही समाचार घेतो..हेच सिध्द केले.

खुद्द शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे ही सांगत ...अनेक लेखातून जे व्यक्त होऊ शकत नाही ते व्यगचित्र एका चित्रात करते...व्यंगचित्रात हिच परंपरा संभाळणारे आता केवळ मंगेश तेंडूलकरच शेवटचे शिलेदार उरले आहेत...त्यांच्या व्यंगचित्रातून अनेक विषय माडतात...त्यांच्या कलेला सा-यां रसिकांनी असाच प्रतिसाद देऊन त्यांची कला याही वयात बहरत रहो असा आशावादी सूर आळविला..

शनिवारी सकाळी या उदघाटन कार्यक्रमाला अनेक मान्यवर रसिक या क्षेत्रातले जाणकार उपस्थित होते..आपल्या हातून ही चित्रे काढली जातात..पण मी ती काढत नाही...आता चहा घेण्यासाठीही हात थरथरतो..पण ब्रश हाती घेतला की चित्र रेखाटना तो स्थिर रहातो...जोपर्यंत ती काढली जातात तोपर्यंत मी काढतच रहाणार...असे म्हणत...मंगेश तेंडूलकरांनी आत्तापर्यंत वाचकांनी केलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचे ते सांगतात.

वयाची एंशी पूर्णकरूनही अतिशय उत्साहाने  प्रदर्शन भरवितात...रसिक-वाचकही त्याला तेवढाच दिलखुलास प्रतिसाद देतात...त्यांची याही वयातली ही उमेद तरूणांना आणि नवीन कलावंतांना याकडे आकृष्ट करेल यात शंका नाही...

पुण्यात आजही खड्डे कायम आहेत...मी त्याबाबत व्यंगचित्रकार आणि जागरूक करदाता म्हणून प्रयत्न करतो...पण पुण्याचे हे चित्र महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आणि महापालिकेच्या अधिका-यांनी बदलण्याची गरज असल्याचे सांगत व्यगचित्रातून व्यंग दाखविले..पण ते समाजहिताचे काम व्हावे असाच उद्देश असतो...यात अनेक ठिकाणी अनेक विषयावर मी चित्राच्या भाषेतून मते व्यक्त केली आहेत...पण ती दूर व्हावीत आणि समाजहिताचे काम व्हावे ही आशादायक बाब घडावी ही तेंडूलकरांची विनंती आहे...


- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276