subhash inamdar

subhash inamdar

Sunday, April 29, 2012

तुमची प्रसन्नता इतरांना प्रसन्न् करेल


मन करा रे प्रसन्न!

लोकबिरादरीच्या मदतनिधीसाठी रविवारी आयोजिलेल्या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे रसिले साक्षात्कार ऐकणे. मनोहर मंगल कार्यालयात जमलेल्या तीनशेएक लोकांना दीड तास हा माणूस माणसात राहून अनेक माणसांना हसवित होता..त्यात गंभीरता होती. त्यात स्वतःला शोधण्याचा मार्ग होता. आहे त्या परिस्थितीत आनंदी कसे रहावे याचे ते ओजस्वी भाषेतले स्वैर चिंतनच होते.

स्वतःबद्दचा अंदाज चुकणे...थोडक्यात स्वतःला ओळखायला शिका..
मन कुणाजवळ तरी प्रकट करणे..
विरोधाभासमय जीवनाचा विचार सोडून द्या..
मनाविरुध्द घडणा-या गोष्टीसाठी निराश होणे..
पैसा हे ही निराशाचे मोठे कारण..
नको त्या गोष्टीची अनावश्यक प्रसिध्दी देणारी वर्तमानपत्रे..
देशाचा राजकिय प्रवास चांगला झालेला नाही...
म्हणूनच व्यक्तिपासून राजकारणापर्यंत सगळीकडे अप्रसन्नता आहे..


मन प्रसन्न कसे करता येईल...
व्यक्तित बदल घडवायचा असेल..तर...आधी सर्वात उत्तम आरोग्य हवे..
मनमोकळं हसा...
स्वतः सकाळी उठल्यावर आरशात स्वत-ला पहा...इतरांना पाण्यात पाहणे.. सुटेल
विचारसरणी गोलाकार ठेवा..सर्वांनाच तुमचे बरोबर म्हणा. त्यांचेही ऐका..
आपल्या जागेत बदल करा... म्हणजे विचारात..अहंपणात..
आपाआपच वाटेल सारे जग गजाआड आहे मी मुक्त आहे..
क्रोध स्वतःच्या ताब्यात ठेवायला शिका..
आनंदाने तृत्पीने जगा..
मन कमळासारखे फुलायला हवे..
तुमची प्रसन्नता इतरांना प्रसन्न् करेल....
मन मोठं करुन जगाकडे विशेषत. स्वतःच्या कुटुंबाकडे पहायला शिका...
अनेक मुद्दे त्यांनी मांडले.. त्याची रोजच्या जिवनातील उदाहरणे दिली... बारीक गोष्टीतून आनंद कसा घ्यावा दुखः विसरुन आनंदाला कसे सामोरे जा..ह्याचा धडाच त्यांना दिला...तोही सामूहिक पध्ततीच्या या वेगळ्या व्याख्यानातून..
त्यासाठी गाणी, कविता आणि स्वतः छोट्या छोट्या गोष्टीतून धडे कसे घेतले घ्यावेत..हे ही सांगून टाळ्यांनी त्यानी दाद घेतली...

अपंगाच्या कल्याणाकरीता संजय उपाध्ये यांनी आत्तापर्यंत २२ लाख रुपयांचा निधी त्यांच्या कार्यक्रमातून मिळवून दिला. याही कार्यक्रमाचे मानधन त्यांनी डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतनिधीसाठी समर्पण केले. कार्यक्रमातून जमलेला निधीही त्या कार्यासाठी दिला जाणार आहे.

अनेकविध अनुभवांचे विश्व सांगणारी या प्रकल्पाची माहिती असलेली चित्रफित उपस्थितांना दाखवून त्या कार्याचे मोल बोलते केले.

अखेरच्या टप्प्यात अनिकेत प्रकाश आमटे ह्यांनीही हेमलकसातल्या अनुभवाविषयी संवाद साधला. त्यांना बोलते केले ते लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचे पुंडलिक वाघ यांनी.


अनेकविध स्तरातील तरुण आणि उत्साही कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने यासाठी शिल्पा तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून झटत होते. यात नचिकेत बापट, क्षितीज खटावकर, तनुजा कुलकर्णी.अनघा भावे असे अनेकजण आहेत..








सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

रोजचीच जगण्याची लढाई, रोजचेच आहे ते काम,
क्षणाचीही नाही उसंत, आणि हरवला माणूसाकीतला राम,
घटकाभर काढूनिया वेळ, जाणूयात आपल्या गोष्टी भिन्न-भिन्न,
.......मन करा रे प्रसन्न......मन करा-रा रे प्रसन्न......!!

... कलियुगात ह्या मोबईल, इंटरनेट जगण्यासाठी आवश्यक,
मुलभूत गरजा राहिल्या पुस्तकात.......वस्त्र, निवारा आणि अन्न,
विज्ञानाचे युग अवतरले, आधुनिकीकरणाचे वारे वाहिले,
तारेल का रे त्याला देव, उकल करूयात याची......
म्हणा............मन करा रे प्रसन्न.....मन करा-रा रे प्रसन्न......!!

कुणी केले राजकारण, तर कुणी आणतोय परिवर्तन,
नुसतीच आश्वासने, नुसत्याच घोषणा आणि समाजाचे अध:पतन:,
सामान्यांची व्यथा वेगळी, महागाईने झालेत सर्व खिन्न,
विसरुनिया थोडा वेळ सगळे, …..मन करा रे प्रसन्न..मन करा रे प्रसन्न....!!

--क्षितीज
Kshitij Khatavkar
email- xitijk@gmail.com

Wednesday, April 18, 2012

भार्गवीच्या साधनेच्या गुजगोष्टी ऐकताना....

मालिकांमध्ये सतत दिसणारी एक मराठी कलाकार. तिच्या सोशिकपणाच्या भूमिकांना अधिक प्रतिसाद मिळतो. तीला तिची आजी विचारते तू त्या पाच महिन्याच्या पोटात मूल असलेल्या मुलीला घराबाहेर काढतेस..हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मी तुझ्यावर रागावले आहे.


भाग्यविधाता, वहिनीसाहेब आणि अनुबंध या मालिकामधून दिसणारी आणि तेवढाच प्रभावी नृत्यविष्कार करुन नंबर वन ठरलेली ही नृत्यनिपुण कलावंत...तिला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी डहाणुकर परिसरातलेच नाही तर कोथरुडवासीय लोक ..विशेष गर्दी केली ती महिलावर्गाने..


भार्गवी चिरमुले आणि आताची सौ. भार्गवी पंकज एकबोटे...साधना कलामंचाचा सारा सभागृह ओथंबून वहात आणि ऐकायला बाहेरच्या खूर्च्यातूनही लोक दाटी करुन होते...

अरुण नूलकरांच्या प्रश्नांमधून तिने तिचे सारे करियर लोकांसमोर उलगडले...जरा सबुरीनेच पण रसिकांनी विषेशतः महिलावर्गाने तिला टाळ्यातून शाबासकी दिली.. वार्षिक व्याख्यानमालेची सुरवात भार्गवीच्या लोकप्रियतेमुळे छान अनुभवता आली.


मूळची मुंबईच्या रुपारेल आणि किंग्ज जॉर्जमध्ये शिकलेली ही भार्गवी...आता डहाणूकर निवासिनी झाली आहे...घरात अभिनयाचा वारसा नसताना आधी भरत नाट्य शिकली . बालनाट्याचून कामे केली आणि नंतर सहजपणे करुन बघू म्हणून कॅमेरा फेसकरुन मालिंकामध्ये स्वतःचे अस्तित्व सिध्द करुन घराघरात पोचली...

तिच्या मते आम्ही मेहनत खूप करतो पण नशीब उघडायला एक क्षणही पुरेसा असतो.... वहिनीसाहेब मधील निगेटीव्ह रोल मला मिळाला आणि सारे सारे..मिळाले..प्रेम..जिव्हाळा..आणि लोकप्रियताही..

मालिकांमुळे ब-याच सासू, आजी-आजोबा भेटतात..चोकशीही करतात...आजी विचारतात..स्वयंपाक येतो का...आजोबा...शिकलीस किती.... आणि हो भार्गवीला स्वयंपाक करायला आजीबात आवडत नाही... तीनचं आज सांगितले..


नेहमी दिसणारी साधी तर सोशिक आणि छळ सोसणारी सून... जेव्हा `एकापेक्षा एक` मध्ये नृत्य कौशल्याने वेगळेपण सिध्द करुन गेली ..आणि तेवढ्याच सहजपणे `फू बाई फू`च्या मंचावर नेहमी गंभीर भूमिकांसाठीचा हा चेहरा विनोदी भूमिकांत दिसू लागला तेव्हा...भार्गवीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनच बदलला.

एकूणच तिच्या बोलण्यात प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास ठासून भरलेला होता..एकबोटेंकडे अनुरुप या विवाह संस्थेत नाव नोंदवून रितसर पाहून भार्गवी सून म्हणून गेली..तरी तिच्या अभिनयाला खंड पडला नाही...तसाच जोडीडार तिला हवा होता..एवढेच काय पण एकापेक्षा एक मध्ये एका पायावर नाचणा-या या सूनेची नृत्य किमया सासबाईंनीही पाहिली नव्हती...त्यांच्या घरातल्यांनी ही मुलगी सिरियलमध्ये लोकप्रिय आहे ह्याचा ठावठिकाणाही नव्हता...

सुबक अर्थात सुनिव बर्वे कलाकृतीच्या झॉपी गेलेला जागा झाला मध्ये काम करुन नाटकात काम करण्याचा अनुभव तिच्या पदरी आला..तिच्या मते नाटकात काम केल्याने हातवारे. बॉडिलॅंग्वेज, उभं कसं रहायचं. चालायचं कसं आणि मुख्य म्हणजे आवाज कसा वापरायचा हे कळल...

`चार दिवस सासूचे`च्या कलावंतांना आता सिरियल केव्हा बंद होणार हा प्रश्न विचारला जातो...हे सांगताना ती म्हणते...थोडी रागवून..कलावंताला मालिका बंद केव्हा होणार हा प्रश्न विचारणे त्याच्यावर अन्याय आहे..डॉक्टरला विचारता दवाखाना कधी बंद करणार....तुम्हाला नाही आवडली तर पाहू नका..टीआरपी आपोआपच खाली येते मालिका बंद होते.
तशी मी लगेच रागावते...तो राग शात व्हावा म्हणून हातात मोत्याची अंगठी घातली आहे...मात्र मी आहे तशीच आहे.. हातातल्या अंगठ्या वरुन प्रेक्षकातून आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ती सांगत होती...

एक बातमी मात्र तिने नाटकांच्या रसिकांना दिली...ती म्हणजे...सुबक लवकरच `हमिदाबाईची कोठी,` `सूर्याची पिल्ले` आणि `झोपी गेलेला जागा झाला` या नाटकांचे आणखी वीस प्रयोग करणार आहे....तेव्हा भार्गवीच्या झोपी मधल्या भूमिका पहाण्याचा योग येणार आहे....

सेलेब्रीटी स्टेटस आलेल्या भार्गवी चिरमुलेनी आपले शुटिंगचे. मालिकेतले आणि रसिकांचे अनुभव सांगून मनोरंजनाबरोबरच आपला दृष्टीकोनही स्पषट केला...संवादातून ती साधक म्हणून कशी आहे..आणि
लोकप्रिय असूनही साधेपणा असणा-या सोशिक कलावंताला पाहण्याचा योग या निमित्ताने कोथरुडला आला...
पुणेरी रसिक..तिला पाहून भरुन पावले....


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

व्हायोलीन गायले रसिक तृप्त पावले

लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतनिधीसाठी आयोजित व्हायोलीन गाते तेव्हा... ८ एप्रिल २०१२- कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात सौ. चारुशीला गोसावी या पुण्याच्या प्रसिध्द व्हायोलीन वादक यांनी सादर केला. त्यातलेच एक गाणे ऐका... ही ती लिंक

'

साथसंगत- रविराज गोसावी (तबला), अमृता दिवेकर( सिंथेसायझर) राजेंद्र साळुंके (तालवाद्ये)
निवेदक -आनंद देशमुख
निर्मिती www.culturalpune.blogspot.com


कोल्हापूरात व्हायोलीन गायले

मोठ्या आशेने सांस्कृतिक पुणेच्या वतीने स्व. बाबा आमटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणा-या डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातल्या प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांचा व्हायोलीन गाते तेव्हा...चा कार्यक्रम ८ एपिल २०१२ ला केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केला...
मात्र खेदाने सांगावेसे वाटते ..रसिकांनी आणि लोकबिरादरीच्या मदतनिधीसाठी आवाहनाला प्रतिसाद न मिळता मोकळ्या खिशाने..उलट असलेला अर्थ देणे दिल्यासारखा देऊन पुण्याला परतावे लागले...
यातून एक मात्र झाले..जे रसिक मायबाप आले त्यांनी तो आनंद घेतला....जे आले नाहीत ते कमनशीबी ठरले...
कारण एकच हा मोजक्या श्रोत्यांच्या आनंदासाठी झाला आणि तो प्रचंड रंगला... सौ. चारुशीला गोसावी यांनी तो इतका रंगविला की अनेक संस्थांनी हा कार्यक्रम घेऊन पुहा कोल्हापूरात या..आम्ही मदत करु..नव्हे आणि आर्थिक भार उचलू असे आश्वासन दिले...
असो..
व्हायोलीनवर गाणी तीही वेगवगळ्या थाटाची. बाजाची.. सादर झाली.. तेवढीच रंगतदार झाली..ते तुम्ही याच्या सोबत दिलेल्या नऊ व्हिडीओ लिंकमधून पाहणारच आहात.
आम्ही हाताश नाही झालो..पण आश्वासन देणारे...
आदार वाटणारे सारे कुठे गेले..
गायब झाले..
कलापूरात कलेची सेवा करण्यासाठी योजलेल्या श्रमावर पाणी फिरले..
यापुढे काळजी घेऊ..तुम्हीही हा कार्यक्रम कुठेही असला तरी इतरांना सांगाल यांची खात्री आहे...
निवेदक आनंद देशमनुख सांगतात त्याप्रमाणे भारतरत्न पं. भीमसेन जोशी सांगत बीदागी २५ रुरये मिळाली तरी गाणे १०० टक्केच दिले गेले पाहिजे....
कलावंतांनी तेच केले..म्हणून तर
व्हायोलीन गाऊ लागले...
मायबाप ऐकता धन्य जाहले..
सांगू लागले..
इथे तर व्हायोलीन गाऊ लागले...

subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, April 16, 2012

कोल्हापूरात व्हायोलीन गायले आणि ...

रसिक सारे तृप्त पावले


मोठ्या आशेने सांस्कृतिक पुणेच्या वतीने स्व. बाबा आमटे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणा-या डॉ.मंदा व प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातल्या प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांचा व्हायोलीन गाते तेव्हा...चा कार्यक्रम ८ एपिल २०१२ ला केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केला...

मात्र खेदाने सांगावेसे वाटते ..रसिकांनी आणि लोकबिरादरीच्या मदतनिधीसाठी आवाहनाला प्रतिसाद न मिळता मोकळ्या खिशाने..उलट असलेला अर्थ देणे दिल्यासारखा देऊन पुण्याला परतावे लागले...

यातून एक मात्र झाले..जे रसिक मायबाप आले त्यांनी तो आनंद घेतला....जे आले नाहीत ते कमनशीबी ठरले...

कारण एकच हा मोजक्या श्रोत्यांच्या आनंदासाठी झाला आणि तो प्रचंड रंगला... सौ. चारुशीला गोसावी यांनी तो इतका रंगविला की अनेक संस्थांनी हा कार्यक्रम घेऊन पुहा कोल्हापूरात या..आम्ही मदत करु..नव्हे आणि आर्थिक भार उचलू असे आश्वासन दिले...

असो..

व्हायोलीनवर गाणी तीही वेगवगळ्या थाटाची. बाजाची.. सादर झाली.. तेवढीच रंगतदार झाली..ते तुम्ही याच्या सोबत दिलेल्या नऊ व्हिडीओ लिंकमधून पाहणारच आहात.

आम्ही हाताश नाही झालो..पण आश्वासन देणारे...
आदार वाटणारे सारे कुठे गेले..
गायब झाले..

कलापूरात कलेची सेवा करण्यासाठी योजलेल्या श्रमावर पाणी फिरले..
यापुढे काळजी घेऊ..तुम्हीही हा कार्यक्रम कुठेही असला तरी इतरांना सांगाल यांची खात्री आहे...

निवेदक आनंद देशमनुख सांगतात त्याप्रमाणे भारतरत्न पं. भीमसेन जोशी सांगत बीदागी २५ रुरये मिळाली तरी गाणे १०० टक्केच दिले गेले पाहिजे....
कलावंतांनी तेच केले..म्हणून तर


व्हायोलीन गाऊ लागले...
मायबाप ऐकता धन्य जाहले..
सांगू लागले..
इथे तर व्हायोलीन गाऊ लागले...


subhash inamdar, pune
subhashinamdar@gmail.com
9552596276





















सांस्कृतिक पुणे आयोजित ..व्हायोलीन गाते तेव्हा....कोल्हापूरातील शुभारंभ...८ एप्रिल २०१२ केशवराव भोसले नाट्यगृहात सादर झाला...
पुण्याच्या प्रसिध्द व्हायोलीन वादक सौ. चारुशीला गोसावी यांनी आपल्या वाद्यावरची हुकमत अशी काही दाखविली की सारे श्रोते प्रसन्न होऊन टाळ्यांनी दाद देत होते..

तवला- रविराज गोसावी,
साईड रिदम- राजेंद्र साळुंके,
सिंथेसायझर- अमृता दिवेकर
आणि निवेदक होते पुण्याचे आनंद देशमुख

Tuesday, April 3, 2012

अजुनही काम करण्याची जिद्द असणारे डॉ. लागू

मसालात तिन दिग्गज एकत्र

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचे श्रेष्ठत्व सिध्द करणारे तीन दिग्गज कलाकार मसाला चित्रपटाच्या बॅनवर झळकणार आहेत. डॉ..श्रीराम लागू, डॉ. मोहन आगाशे आणि दिलिप प्रभावळकर.

२० एप्रिलपासून महाराष्ट्रात प्रदर्शीत होणा-या मसाला या प्रविण मसालेवाल्यांची निर्मिती असलेल्या आणि संदेश कुलकर्णी यांनी प्रथमच दिग्दर्शन शक्षेत्रात पाऊल टाकलेल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी आयोजित केलेल्या संवादाच्या निमित्ताने एकत्र एकाच व्यासपीठावर झळकले.

ह्या तिन्ही थोर कलाकारांनी चित्रपटात असणं हेच आमच्या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श भारावलेला आणि मोहारलेला आहे. त्यांच्या असण्यानं आम्ही पुवकित झालोय असं गिरीश कुलकर्णी यांना वाटतं.


नाटक, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या भूमिकांची वजने सांभाळणारे हे तिन्ही कलाकार कुठल्याही भूमिकेत कसे वावरतात. त्याचा आभ्यास ते कसा करतात. हे सांगताना या चित्रपटात डॉ. लागूंनी अत्तरवाल्या दुकानदाराची भूमिका वठविली आहे. ते ज्या पध्दतीने भूमिकेचे आकलन करुन घेतात..ते आजही अनेक नट गंभीरपणे घेत नाहीत असे डॉ. आगाशे यांना वाटते.

स्वतः डॉ. लागू पॉल मुनीच्या अभिनयाने भारावलेले आहेत. मराठीत गजानन जाहगिरदार यांचेही ते नाव घेतात. कुठलिही भूमिका करताना त्या भूमिकेचे तुम्ही घटक बनता. तुम्ही ती व्यक्तिरेखा बनता. तुम्ही कोण हे विसरुन त्या व्यक्तित्वात स्वतःला पाहता. यातही एक छोटी भूमिका केली आहे. अजूनही मी माझे आतले मन जेव्हा एखाद्या भूमिकेत काम कर असा कौल देते तेव्हा मी ती स्वीकारतो. आजही आपण भूमिका करतो आणि पुढेही करणार असेच त्यांनी सांगितले.


डॉक्टरांच्या सोबत आपले नाव झळकणे आणि ते भूमिका करताना अनुभवणे हा एक चांगला अनुभव या निमित्ताने आपण घेतल्याचे मोहता या भूमिकेतू मसाला मध्ये झळकणारे डॉ. आगाशे अभिमानाने सांगतात.


दिलिप प्रभावळकर एका संशोधकाची भूमिका करताहेत. चित्रपट आनंदासाठी तयार केला आहे. जीवनाक़डे आनंदी पाहण्य़ाची वृत्ती त्यांच्याकडून प्रेक्षकांना मिळणार आहे. वेगळ्या भूमिकेचा हा रोल आहे. आम्ही तिघे या निमित्ताने प्रथमच एकत्र आलो आहोत. असेही प्रभावळकर सांगतात.

अशा कलावंतांचा स्पर्श लाभून आम्हीला प्रेरणा मिळाली. त्यांचा आशीर्वाद यानिमित्ताने मिळाल्याचे भाग्य शब्दातून उमेश कुलकर्णी प्रकट करतात.

subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276



`मसाला’ चित्रपटात डॉ. लागू `इद्रीस भाई’ नावाच्या एका `अत्तरवाल्याच्या’ भूमिकेत दिसणार आहेत. डॉ. लागू यांच्या या भूमिकेबाबत बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, की जेव्हा त्यांना आम्ही मसालातील या भूमिकेबाबत विचारले तेव्हा त्यांनी लगेच होकार तर दिलाच शिवाय या भूमिकेबाबत कमालीची उत्सुकता दर्शविली.
ज्या दिवशी त्यांचे चित्रीकरण होते त्यादिवशी या वयातही त्यांचा उत्साह पाहून सर्वजण आचंबित झाले होते. दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांनी त्यांना त्यांची भूमिका समजावून सांगितल्यानंतर त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांनी शॉट्स दिले. त्यांची कामाची शिस्त आणि कामावर असलेली निष्ठा खूपच प्रेरणा देणारी होती. त्यामुळे सेटवरील त्यांची उपस्थिती ही आमच्या दृष्टीने अतिशय प्रसन्नदायी ठरली.
`मसाला’मध्ये गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषीकेश जोशी, ज्योती सुभाष, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे आदी कलाकारांसोबत डॉ. लागूचे दर्शन चित्रपट रसिकांना घडणार आहे.
मसाल्याची सिनेमॅटोग्राफी राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर एच.एम. रामचंद्र यांची असून संकलक अभिजीत देशपांडे यांचे तर संगीत आनंद मोडक यांनी दिले आहे.

Monday, April 2, 2012

`व्हायोलिन गाते तेव्हा...`चा शुभारंभ ८ ला कोल्हापूरात

लोकबिरादरीच्या नीधीसाठी खास आयोजन
कोल्हापूर,१ एप्रिल- हेमलकसा इथल्या डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या मदतीसाठी पुण्यातील प्रसिध्द व्हायोलिन वादक सौ. चारुशीला गोसावी आपला कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाटय्गृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. यात मराठी व हिंदी लोकप्रिय गाणी सादर केला जाणार आहेत. या कर्यक्रमाचा शुभारंभ कोल्हापूरातील ज्येष्ठ व्हायोलीन कलावंत आदरणीय श्री. डी. एन .जोशी यांच्या हस्ते होत आहे.

याबाबतची माहिती सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी कोल्हापूरात आज पत्रकार परिषदेत दिली.
हेमलकसा इथल्या आदिवासी भागात आरोग्य आणि त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी डॉ. मंदा व प्रकाश आमटे यांनी चालविलेल्या कार्याला आपण कलेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावावा या हेतूने सो. चारुशीला गोसावी यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
व्हायोलिन वादन क्षेत्रात सौ. गोसावी गेली ३२ वर्षे विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला पोचविली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनइल) मध्ये त्या कार्यरत असून त्यांना खात्या अंतर्गत होणा-या अ.भा. स्तरावरील शास्त्रीय संगीताच्या व्हायोलीन वादनाच्या स्पर्धेत सलग २२ सुवर्णपदके प्राप्त झाली आहेत.
त्यांनी आत्तापर्यंत २५०० कार्यक्रमामधून व्हायोलीनचा साथ केली असून १०० चे वर स्वतंत्र व्हायोलीनवादनाचे कार्यक्रमही केले आहेत. आपले वडील व गुरू पं. भालचंद्र देव यांचेकडून त्यांनी हा कलेचा वारसा घेतला आसून भारभतभर विविध कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमात अभंग, नाट्य़गीत, लावणी इत्यादी प्रकारही त्या व्हायोलीनमधून सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिध्द निवेदक आनंद देशमुख यांचे असून त्याशीवाय इतर सहभागी कलावंतांमध्ये रविराज गोसावी (तबला), अमृता ठाकूरदेसाई ( सिंथेसायझर) आणि राजेंद्र साळुंके (तालवाद्ये) यांचा सहभाग असणार आहे.
कोल्हापुरातील शुभारंभाचा कार्यक्रम रविवार,८ एप्रिल २०१२ रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात रात्री ९ वाजता सादर करणार असून तो सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने आयोजित केला आहे. त्याची तिकीटे रूपये. १०० व ५० अशी असून ती शुक्रवार पासून नाट्यगृहावर उपलब्ध होतील. कोल्हापूरच्या गायन समाज देवल क्लबच्या सभासदांसाठी या कार्यक्रमासाठी विशेष सवलत दिली जाणार असून त्यांनी आपली तिकीटे देवल क्लबचा शिक्का मारुन थिएटरवरुन घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचा खर्च वजा जात सर्व रक्कम लोकबीरादरी प्रकल्पासाठी दिली जाणार आहे. ज्यांना धनादेशाद्वारे मदत करायची आहे त्यांनी तो महारोगी सेवा समिती, वरोरा (Maharogi Sewa Samiti, Warora) या नावावर काढला तर तो स्विकारण्याची व्यवस्था नाट्यगृहावर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९५५२५९६२७६ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन सांस्कृतिक पुणेचे सुभाष इनामदार यांनी केले आहे .
`सांस्कतिक पुणे`च्या वतीने महाराष्ट्रात अशा प्रकारचे विविध शहरात करण्यात येणार आहेत.त्यातलाच हा कोल्हापूरात होणारा कार्यक्रम आहे.



आपले,

सुभाष इनामदार
Mob. 9552596276
subhashinamdar@gmail.com
सौ. चारुशीला गोसावी
Mob.9241019499
charusheelagosavi@gmail.com