subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 13, 2014

आवाज कुणाचा..भावे काकांचा...पडद्यावरही



`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे इप्टाच्या माहितीपटातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचले...आणि सातारच्या घरातली आपली पारंपारिक कला घेऊन ते आता रंगभाषेच्या माध्यमातून देशाच्या नाट्यपरंपरेतले चेहरे सजविणारे कलावंत म्हणून सुपरिचित झाले ...

 पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांसोबतच "इप्टा‘, "पीडीए‘, थिएटर ऍकॅडमीसारख्या अनेक नाट्य संस्थांच्या प्रयोगांमधून त्यांनी रंगभूषेची किमया केली आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका या नावानेच ओळखले जातात. रुपेरी पडद्यावर जेव्हा हा माहितीपट झळकला तेव्हाही उपस्थित तरुण कलावंतांनी पुन्हा एकदा..आव्वाज कुणाचा..भावे काकांचा..म्हणत एकच गजर करत त्यांच्या प्रेमाचे पुरते दर्शन घडविले..

आपण जे काही आहोत..ते वडिलांच्या कलागुंणांच्या शिकवणुकीने..आणि रंगभूषेतल्या कलेचा ध्यास घेऊन जगलो ..परमेश्वराने आपल्याला यासाठीच जन्माला घातले..ह्या धारणेने...मात्र मी आज प्रेम पाहून काय बोलावे..तेच कळत नाही...माझ्या काकांनी (मुकुंद भावे) तर मला साक्षात दंडवत घालून मला लाजविले...याउपर मी काय बोलावे..हेच कळत नाही....प्रभाकर भावे आज इथे मात्र खरोखरच निशब्द झाले..

गुरुवार संध्याकाळी सारे तरुण रंगकर्मी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या चित्रपटगृहात एकत्र होऊन..भावेमय रंगून गेले होते..इप्टाच्या पुणे शाखेच्या या माहितीपटाचे कोतूक करण्यासाठी मुंबईहून  व इप्टाचे माजी उपाध्यक्ष व अभिनेते अंजन श्रीवास्तव  , अभिनेते मोहन आगाशे,ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्यासह अनेक जण अमृत सामक यांनी बनविलेला पाहण्यासाठी आणि प्रभाकर भावेंच्या कार्याची तोंडभरून स्तुती करण्यासाठी हजर होते...
हरहुन्नरी कलावंत..काय काय करु शिकतो...ते त्यांच्या रंगभूषेच्या प्रदिर्घ कारकीर्दीने समजते...शिवाय त्यांचे मुखवटे आणि रंगभूषेविषयीचे पुस्तकही तेवढेच उत्तम साकारले गेले आहे...कलाकारातला माणूसही तेवढाच जागा आहे...भावे काकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे..ते माणसातल्या कालकाराला बाहेर काढतात..त्यांनी चेहरा रंगविला की तो तो रहात नाही तो नट बनतो..आणि आपली  भूमिका उत्तम रिच्या वठविण्याचा आत्मविश्वास आपल्यात सहजपणे प्राप्त होतो..असा तरुण रंगकर्मिंचा विश्वास आहे.

अनेक कलावंत आणि पुरुषोत्तम गाजविणारे..गाजविलेले कलाकार भावेंविषयी काय सांगतात..ते ऐकणे फार मोलाचे आहे...फ्रभाकतर भावे यांचा सन्मानही इथे केला गेला...मोहन आगाशे यांनी तो केला..एका रंगकर्मिला असा रसिकांचा लोभ मिळणे हे आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे..ती त्यांना त्यांच्या रुजू बोलण्यातून..कामाच्या निष्ठेतून मिळाली..हेच यातून दिसते....त्यांच्या या क्षेत्रातल्या लेखनकार्यालाही नाट्यकर्मिच्या लेखी एक प्रयत्नातून सिध्द झालेला ठेवा प्राप्त होत आहे..तो जपून ठेवावा आणि त्यांच्या लेखनाला महत्व प्राप्त व्हावे अशीच सा-यांची इच्छा आहे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Sunday, March 2, 2014

पुन्हा ज्योत्स्ना भोळेंचे स्वर आळवले गेले..



ज्योत्स्ना भोळे...यांच्या गायकीचा स्पर्श झालेल्या अनेक गीतांना..नाट्यपदांना आज पुण्यात पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली..ती त्यांच्या गाण्यांच्या स्पर्धेच्या दिवशी..पुण्याच्या पत्रकार संघात.`स्वरवंदना प्रतिष्ठान`च्यावतीने रविवारी १८ ते ८० वयोगटातल्या विविध वयातल्या स्पर्धकांनी भाग घेतला..यात मोठ्या गटात लीना राजवाडे आणि कनिष्ठ गटात किमया लोवलेकर यांना पहिले बक्षिस मिळाले...
निर्मला गोगटे, सुमती टिकेकर आणि गायक श्रीकांत पारगावकर यांच्या परिक्षक समितीसमोर स्पर्धकांनी आपापली तयारी सादर केली..लगेचच याबाबतचा निर्णय दिला गेला आणि परिक्षकांच्या हस्तेच विजेत्यांची नावे जाहिर करुन त्यांना पुरस्कार दिले गेले.
`गाणे हे अवघड गोष्ट आणि ती सोपी गोष्ट नाही..तेव्हा तुम्ही प्रयत्न करीत आहात याबद्दल आनंद वाटतो..पण ती एक शब्द-सुरांची अनोखी कला आहे..त्यात मेहनत आहे..ती सहजी येणारी सोपी गोष्ट नाही.`.असे..जाहिर चिंतन निर्मला गोगटे यांनी याप्रसंगी सांगून स्पर्धकांची पाठही थोपटली आणि गाणे ही किती गंभीर गोष्ट आहे..ते पटवून दिले.


अरुण नूलकरांनी संपूर्ण स्पर्धेचे संचालन केले..त्यांनीच यशस्वी स्पर्धकांची नावे जाहिर केली..
यात ३५ ते ८० या वरीष्ट गटात
लीना राजवाडे, संगीता कुलकर्णी, संगीता भिडे या तिघांशिवाय उर्मिला मराठे यांना उत्तेजनार्थ म्हणून जाहिर केले..याशिवाय  १८ ते ३५ या वयोगटात किमया लोवलेकर, ऋतूजा जोशी, भक्ति पिळणकर आणि उत्तेजनार्थ - योगदा देशपांडे याची निवड केली.. 




या निमित्ताने या सभागृहात ज्योस्त्ना भोळे यांची सतत आठवण येत होती..त्यांची कन्या वंदना खांडेकतर यांनी या बाबत पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजली होती..
त्यांच्या गाण्यातले सहजपणही किती अवघड होते..हे प्रत्येक गीताबरोबर कळत होते..त्यांच्या जन्मशताब्दीच्या या खुणा आता वर्षभर विविध कारणाने उमटणार आहेत..त्यांच्या स्मृतीला अभिवादन...



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, February 7, 2014

भक्तिमय भावीकतेत रसिक चिंब



स्वरभास्कर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीनिमित्ताने पुण्यातले त्यांचे शिष्य राजेंद्र दिक्षित यांनी जय जय राम कृष्ण हरी..चा गजर सुरु केला आणि उद्यान कार्यालयातल्या सभागृहातील वातावरणच बदलून गेले. एका मागोमाग अशा रचना तिथे स्वर आणि शब्दातून जसजशा गायक सादर करु लागले तसा हा सारा भक्तिमय भावीकतेने रसिक चिंब भिजून गेला...आणि दोन तास सुरु झालेला हा स्वरोत्सव त्या ज्येष्ठ गुरुंना खरी भावांजली ठरली.


संगीतासह सर्व कलांचा प्रसार व्हावा आणि गुरुंच्या स्वरातील चार स्वर रसिकांच्या कानी पडावेत यासाठी साधना करुन त्याचे विविध माध्यमातून सादरीकरण करण्याच्या उद्देशाने भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे अनेक काळ शिष्य असलेले राजेद्र दिक्षित यांनी आपल्या श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाची स्थापना केली. संस्थेच्या उद्दंशांपैकी असलेल्या पं. भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने म्हणजेच तिथीप्रमाणे रथसप्तमीला स्वरोत्सवाचे आयोजन केले होते.
केवळ पंडीतजींवरची असीम श्रध्दा आणि त्यांच्यासोबतीने मिळालेला ठेवा रसिकांसमोर देताना त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देणे हाच केवळ उद्देश मनी बाळगून त्यांनी हा कार्यक्रम गुरुवारी सहा फेब्रुवारी २०१४ ला संध्याकाळ साजरी केली स्वरांच्या पुजेने.

ही स्वरपूजा बांधताना केवळ आपले गुरु न समोर ठेवता पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. शरद गोखले अशा दोन गुरुंच्या शिष्यांना हा स्रमंच उपलब्ध करुन दिला..ही मोठी गोष्ट असल्याचे स्वतः  डॉ. मोहन दरेकर यांनी आपल्या मनोगतात स्पष्टही केले. म्हणून या कार्यक्रमाचे मूल्य अमूल्य आहे..
तबला, पखवाज, टाळ, व्हायोलीन आणि हार्मोनियम यांच्या साथीने सारा परिसर दुमदुमून गेला त्यात मिळाली ही सुंदर स्वरांची सुरेल साथ....एकूणच वातावरणात  ते भाव सहजीपणे उतरले होते.
पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य स्वतः राजेंद्र दिक्षित. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य डॉ. मोहन दरेकर आणि पं. शरद गोखले यांच्या कन्या आणि शिष्या भक्ति पागे-गोखले यांचा सहभाग असलेली ही संध्याकाळ अभंग, भक्तिगीत आणि नाट्यगीतांने रंगली.

राजेंद्र दिक्षीत- 
राजस सुकुमार, इंद्रायणी काठी,
 माझे माहेर पंढरी,
कान्होबा तुझी घोंगडी चांगली,
ध्यान करु जाता मन हरपले आणि
अगा वैकुंठीचा राया..
 



 




डॉ. मोहन दरेकर- 
संत भार पंढरी,
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल,
सावळे सुंदर..









भक्ति पागे-गोखले-
अवघाची संसार सुखाचा करेन
उगवला चंद्र पुनवेचा,
शंकरा भरणम्,

...शेवटी पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजीतल भजनाने कार्यक्रमाची सांगता.. जो भजे हरि को  सदा, सोही परम पद पावना...

राजेंद्र दिक्षीत यांच्या माझे माहेर पंढरी आणि कान्होबाने दाद तर मिळविवीच पण गाण्यात तो पंडीतजींचा स्पर्शही उतरल्याचे जाणविले.

संतभार पंढरी आणि सावळा सुंदर या दोन रचनातून मोहन दरेकरांचे पांडित्य .त्यांची स्वरावरची हुकूमत आणि आवाजाला साजेशी फिरत ऐकताना मन त्प्त झाल्याचे समाधान मिळाले.

या दोन गायकांच्या तुलनेत भक्ति पागे-गोखले यांची पदे कमजोर पडली. त्यात जीवंतपणा होता पण भारदस्तता आणि आवाजाचा पातळ पोत यामुळे पदांना आणि अभंगाची रंगत थोडी कमी नटली.

ह्या लेखनाचा उद्देश हा टिकात्मक नसला तरी या घटनेचा उद्देश साध्य झाला की नाही हे सांगण्याचा आहे. स्वरभास्कराच्या नावाने श्री गुरु संगीत प्रसारक मंडळाने आपले कर्तव्य चोक बजावले..पण त्यातली रंगत आणि उंची गाठायची आवश्यकता आहे. केवळ हे स्वरांचे आणि शब्दांचे बुडबुडे न रहाता संगीत विषयक काम केल्याचे ठोस पुरावे इथे दिसायला हवे होते.मग या व्यासपीठाला एक अभ्यासापूर्णतेचे वलय निर्माण होईल.मात्र राजेंदर् दिक्षीत यांचा प्रामाणिक प्रयत्न होता..हे मान्यच करायला हवे..त्यांची ही तळमळ त्यांच्याकडून अधिक काम करवून घेईल यात शंका नाही.

ही मैफल पांडुरंग मुखडे (तबला), संजय गोगटे आणि प्रवीण कासलीकर (हार्मानियम), चारूशीला गोसावी (व्हायोलीन), पंढरीनाथ दरेकर, गणेश टाके, निखिल ताकभाते ( पखवाज आणि तालवाद्य), ,  यांच्या साथसंगीत रंगली. कार्यक्रमाचे निवेदन अनिल स्वकूळ यांनी केले पण त्यात जोश कमी आमि आवेश अधिक होता..याला अदिक निवेदनाची उत्तम साथ लाभली असती तर कार्यक्रमाची सफाई अधिक वाढली असती.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276



Saturday, December 28, 2013

डॉ. अर्चना गोडबोले-पर्यावरणतज्ज्ञ

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं वाचवणं याचबरोबर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं या आव्हानात्मक कामासाठी ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) या संस्थेची स्थापना करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले..

तीव्र इच्छेचा परिस हातात असला आणि त्याला अथक, मन:पूर्वक प्रयत्नांची जोड मिळाली तर एखादी अनवट वाटसुद्धा कशी लखलखीत होऊन उजळून निघते याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे डॉ. अर्चना गोडबोले, ‘अप्लाइड एन्व्हायर्न्मेंटल रिसर्च फाऊंडेशन’च्या (AERF) संस्थापिका... पण अधिक सोप्या भाषेत सांगायचे तर कोकणातील देवराया आणि पर्यायाने पर्यावरण उद्ध्वस्त होण्यापूर्वीच सावरावे म्हणून अखंड काम करणारी स्त्री...

महाराष्ट्रातील देवरायांचा अभ्यास १९७० च्या दशकात प्रा. वा. द. वर्तक व डॉ. माधवराव गाडगीळ यांनी सुरू केला. त्यांची ही परंपरा डॉ. कुंभोजकर, डॉ. संजय देशमुख, डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अर्चना गोडबोले आदींनी पुढे नेली. महाराष्ट्रात एकूण ३५०० देवराया आणि त्यात तब्बल ७०० पेक्षा अधिक वनस्पती असल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. असंख्य जीव- जिवाणू, वन्यजीव व विशेष करून ‘मलबार धनेश’ हा पक्षी सह्य़ाद्रीतील देवरायातच आढळतो. आज कोकणातील देवरायांचा हा प्रश्न केवळ ‘लोकल’ नाही, तर ‘ग्लोबल’ पातळीवर होणारी तापमानवाढ, बदलणारे ऋतुचक्र, नैसर्गिक संसाधनांची अमाप वेगाने होणारी हानी अशा सगळ्या प्रश्नांशी त्याचे नाते आहे.

या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अर्चना कधी सावंतवाडी, कुडाळजवळच्या अगदी दुर्गम अशा छोटय़ा गावांमध्ये असतात तर कधी दोन-अडीच महिने अमेरिकेत मात्र दोन्ही ठिकाणचा अजेंडा एकच. समविचारी लोकांच्या भेटीगाठी. पर्यावरणाचा एखादा प्रश्न सोडवण्यासाठी लोकसहभागातून काय प्रयत्न करता येईल याची आखणी आणि असेच काही.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अर्चनाच्या घरात पैशाची श्रीमंती फार नव्हती, पण पुस्तक, वाचन, चर्चा अशी वैचारिक समृद्धी भरपूर होती. मोठी स्वप्नं बघण्यासाठी लागणारी हिंमत तिला तिच्या वडिलांनी दिली, अर्चना यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ ही उपाधी लागलेली बघायची होती तेच स्वप्न पूर्ण करण्याकरिता अर्चना यांनी वनस्पती नामकरणशास्त्रात एम. एस्सी. केली मग मानव वनस्पतीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. शिक्षण चालू असतानाचा काळ हा त्यांच्यासाठी जणू झपाटलेला कालखंड होता. मनापासून आवडणाऱ्या विषयाचा अभ्यास करण्याचा आनंद तर होताच, पण पश्चिम घाट बचाव चळवळीच्या संपर्कात आल्याने आवडत्या विषयात प्रत्यक्ष काम करण्याचे धडेही त्याच वेळी मिळत होते. चळवळीतील सहकारी असलेले आणि पर्यावरणासंबंधात मराठी पत्रकारिता करणारे जगदीश गोडबोलेने शंभर दिवसांच्या या मोहिमेत संपूर्ण पश्चिम घाट पालथा घालण्याचे ठरवले होते. पर्यावरण संरक्षणाच्या कामाची दिशा अर्चना यांना या मोहिमेतून मिळाली आणि स्वत:मधील सामथ्र्य, कौशल्य याची ओळखही स्पष्टपणे झाली. या मोहिमेनंतर त्यांनी भारतीय वनस्पती सर्वेक्षण खात्यात नोकरीत केली, पण त्या कामाचे समाधान फारसे मिळाले नाही, पण जंगल संरक्षण आणि संवर्धन या कामासाठी आवश्यक असलेली अभ्यास व संशोधनाची पाश्र्वभूमी मात्र तयार झाली.

देवरायांचे संरक्षण-संवर्धन करणारी संस्था स्थापण्याच्या खटाटोपाऐवजी पर्यावरण विषयातील एखादे झुळझुळीत आंतरराष्ट्रीय पातळीवरील पद, नोकरी मिळवणे हे त्यांच्यासाठी फारसे अवघड नव्हते. पण त्यांनी जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली, खडतर पण शाश्वत विकासाचे आश्वासन देणारी. जैविक विविधतेच्या संदर्भात संशोधन, या विविधतेचे रक्षण आणि संवर्धन आणि त्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन हे सूत्र घेऊन(AERF) या त्यांच्या संस्थेने काम सुरू केले. पुढे पर्यावरणासाठी इतके मूलभूत काम करणाऱ्या संस्थेला आणि माणसांना कोकणच्या जंगलाने आमंत्रण दिले...!

कोकणात शेकडोच्या संख्येने अस्तित्वात असलेल्या देवराया म्हणजे निव्वळ वृक्षसमूह आणि त्यावरील प्राणी-पक्षी जीवन नाही. ती एक संपूर्ण अशी पर्यावरण व्यवस्था आहे. परस्परांना जगवणारी आणि त्यामुळे परस्परांवर अवलंबून असणारी. त्याच्या आसपास जगणाऱ्या माणसांच्या जीवनाला सर्वार्थाने आधार देणारी ही व्यवस्था... या व्यवस्थेला मूठभर लोभी माणसांपासून वाचवायची गरज आहे तर त्यासाठी लोकांचा पाठिंबा हवा, मदत हवी, लोकजागृती आणि त्यातून स्वयंस्फूर्तीने लोकसहभाग आवश्यक असल्यामुळे त्यांचे सगळे कामच लोकसहभागाभोवती गुंफले आहे.

सध्या देवराई संरक्षणाबरोबर, खाणकाम उद्योग हे ही एक कडवं आव्हान बनतं आहे. पण त्याच्याशी लढण्यासाठीही मोर्चे काढण्यापेक्षा, नारेबाजी करण्यापेक्षा ‘अभ्यासोनि प्रकटावे’ हे धोरण अर्चनाने अनुसरले आहे कारण मोर्चे काढून, आंदोलन करून, सरकारवर जबाबदारी टाकून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ते पूर्ण पणे थांबणार नाहीत. फार तर सरकारी आदेश निघतील हे त्यांना देवरई संरक्षणाच्या अनुभवातून कळून चुकले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील असनिये गावातील खाणकाम थांबवण्यासाठी या परिसरातील जैवविविधतेचा एक वर्ष सखोल अभ्यास करून तपशीलवार अहवाल तयार केला गेला आणि गावातील लोहखनिज प्रकल्पाच्या जनसुनवाईमध्ये या अहवालाच्या आधारे प्रत्येक मुद्दा खोडून काढण्यात आला. समाजातील सत्ताधीश, पैशाची अमाप सत्ता बाळगत निर्णय आपल्या बाजूने वळवणाऱ्यांचा विरोध पत्कारत ज्या भूमीच्या पोटात तुम्ही खणत खोल उतरता तिचे आणि तिच्या आधारे जगणाऱ्या माणसांची काही बाजू आहे व ती त्या हिरिरीने मांडते आहेत.

कोकणातील देवराया आणि खासगी जमिनीवर असलेली जंगलं निव्वळ वाचवणं हे अर्चना यांच्या पुढील आव्हान नाही तर नव्याने जंगलं वाढवणं, पर्यावरण रक्षणासाठी अनुरूप अशी झाडं लावणं, त्यासाठी स्थानिक आणि बाहेरील लोकांना प्रेरित करणं हे त्यांच्यासाठी तेवढेच महत्त्वाचे काम आहे आणि त्यासाठी My Forest नावाचा उपक्रम त्यांनी वं त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतला आहे. जैवविविधतेच्या प्रश्नी ज्यांना आस्था आहे त्यांनी एक एकर जमीन पाच वर्षांसाठी, पाच हजार रुपये देऊन दत्तक घ्यायची. हे पैसे जंगले तोडून पैसे कमवू इच्छिणाऱ्या जमीन मालकाला दिले जातात आणि जंगल वाचवले जाते. एक जंगल वाचते तेव्हा त्याच्या अंगा-खांद्यावर जगणारे प्राणी, पक्षी, कीटक तर वाचतातच, पण हवेचे प्रदूषण काही अंशाने कमी होते आणि पावसाचे चार काळे ढग त्या जंगलाच्या माथ्यावर येण्याच्या शक्यता वाढतात.

अर्चना यांच्या आयुष्याचा साथीदार जगदीश त्यांचा हात सोडून गेल्यावर आता निसर्ग हाच त्यांचा आप्त, मित्र सर्व काही आहे. भटकंती करीत निसर्गाची तऱ्हेतऱ्हेची रूपे बघायला आवडणाऱ्या अर्चना यांना या भटकंतीतच विविधरंगी, अद्भुत निसर्ग, त्याची अनंत रूपे बघायला मिळाली.

आत्तापर्यंत जागतिकीकरणाचे वारे येण्यापूर्वीपर्यंत सामान्य माणसांचे निसर्गाशी काहीतरी नाते होते. घरातील प्रत्येकाला किमान चार झाडांची नावे ठाऊक होती. अंगणा-परसातील झाडे ओळखता येत होती. निसर्गातील शांतता त्याला हवीशी वाटत होती. या ना त्या निमित्ताने तो निसर्गाशी जोडलेला होता. त्यामुळे ‘निसर्गाला सांभाळा’ हे सामान्य माणसाला सांगणे-पटवून देणे सोपे होते. मात्र आता जागतिकीकरणाच्या रेटय़ाने माहिती, उपभोगाची साधने याचा जो एक महापूर आपल्याकडे आला आहे, त्यात हे नाते, मूल्यविवेक फार वाहून गेला आहे. आता निसर्गाचा आदर करणे माणसं विसरलीच आहेत. सर्वसामान्य माणसांमध्ये निसर्गाबद्दलची, त्यातील संसाधनांबद्दलची कमालीची वाढलेली बेफिकिरी आणि अलिप्तपणा त्यामुळे निसर्गाशी त्यांचे नाते आहे ते फक्त ओरबाडून घेण्यापुरतेच. अशा या आव्हानांशी आता पर्यावरणासाठी लढणाऱ्या अर्चनासारख्या कार्यकर्त्यांना लढावे लागते आहे. २०११ ला डॉ. अर्चना गोडबोले आणि कोल्हापूरच्या ‘निसर्ग मित्र'चे डॉ. मधुकर बाचुळकर यांनी पुढाकार घेऊन पश्‍चिम घाटाचा भाग असणाऱ्या राज्यांच्या संस्थां, पर्यावरणाचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट्स, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम करण्याचे ठरविले आहे.

हिरवाईच्या हाकेला ‘ओ’ देऊन, हिरव्या वाटेवरचा ह्या वेगळ्या प्रवासावर असणाऱ्या अर्चना सारख्या अनेकांना त्यांच्या भविष्यातील स्वप्नांकारिता आणि पर्यावरण संवार्धानाकरिता अनेक अनेक शुभेच्छा...!!!


साभार- लोकसत्ता...



पहावा..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यासाठी



 एखादी मराठी मुलगी परदेशात राहून परत आपल्या घरी आल्यावर जसे मराठी बोलेल तसाच काहीसा संवाद इशा कोप्पिकर हिच्यामार्फत मात या चित्रपटात ऐकावा लागेल. पण तीने काम मनापासून केले आहे.व्यवसायने मॉडेल अशी ती आणि तो स्ट्रक्चरल इंजीनिअर..दोघेही आदी प्रेमात मग लग्नाच्या चौकटीत अडकतात.पुढे एक मुलगी होते आणि ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आवाजाचा मुलीवर काहीच परिणाम दिसत नाही..मग आई-वडीलांच्या लक्षात येते. ही कर्णबधीर आहे ते.

मात या चित्रपटाची कथा इथून सुरु होते..वडील..म्हणजे उच्चशिक्षीत असणारा समीर धर्माधिकारी ..हे सारे तुझ्या वडीलांमुळे घडल्याचे दुषण लावतो आणि या लॅव्हीश कुटुंबात मीठाच खडा पडतो...समीर पुढे करीयच्या मागे परदेशातच जातो..इकडे ती इशा आपले मॉडेलिंगचे करियर सोडून मुलीच्या प्रगतीसाठी पुढे सरसावते..त्याला तिच्या सासूबाईंची साथ मिळते..त्यातून हिला समजतेतीला बुध्दीबळाची जात्याच ओळख पटते आहे.मग ती एकेकाळच्या ग्रॅंड़ मास्टर असेलल्या सुहास पळशीकरकडे जातात..तिथे मिनी आता यातच गती घेणार हे दिसते..पुढे तेच होते..

खरं म्हणजे हि कथा आहे..त्या जिद्दी आई-मुलीच्या यशस्वी संघर्षाची आणि अशक्य वाटणारे सारे काही सहजपण घडू शकते जर तुमच्यात ती ताकद असेल..आत्मबऴ असेल आणि तुमच्या मागे खंबीर भूमिका घेणारे पालकांचा तेवढा सबळ आधार असेल तर...


बुध्दीबळासारखा खेळ असूनही त्यातल्या काही खेळी जर माहित असतील तर हा मध्येतरानंतर फारच बुद्दीबळाच्या खेळींनी व्यपलेला चित्रपट तुम्हाला आवडेल.नाहीतर थो़डे बोअर व्हाल..
बुध्दीबळ आवडणा-यांनी तर पहावाच..पण अंगातल्या गुणांचे चिज करणारे छत्र मिळाले तर काय होऊ शकते याचे ते एक उत्तम उदाहरण आहे.

आजच्या काळात घडणारा एक चकचकीत घरातला हा चित्रपट..वातावरणही ते तसेच...वरवर प्रेम असलेल्या कुटुंबीयासारखे.
आजही इतक्या हल्काय विटचारांचे लोक या सोकॉल्ड श्रीमंती घरात वावरतात..हे दाखविण्यात दिग्ददर्सकाबरोबर कॅमेराही तुम्हाला सांगेल..मराठी चित्रपटात का असू नये पॉश ..झगमगीत घर

समुद्र..ते किनारे...त्या गाड्यातल्या गाण्याच्यां जागा..सारे काही यात आहे...प्रथम हे सारे वरवरचे झपाटलेपण वाटते...पण जेवन्हा मीनीच्या बुध्दीबळाचे प्यादे जसे मात करु लागतात...सुहास पळशीकरांसारखा दमदार कलावंत जेव्हा सारे प्रसंग आपल्याकडे ओढत घेऊन जातात..तेव्हा ती कहाणी बनते त्या हुशार आणि जिद्दी मुलीच्या कर्तृत्वाची कहाणी..
-चित्रपट पहावासा वाटतो..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यामुळे आणि मीनीच्या हुशारीच्या चालीने..जी चाल शिकविणारे सुहास पळशीकरांच्या आत्मविश्वासात्मक संयमीत गुरुपदेशामुळे..-

-या विषयाचा पुरेसा गृहपाठ करुनच सरवणकरांनी चित्रपट वेगळा बनविला आहे..त्यांच्या दिग्दर्शनाला कलाकारांनी आणि मुख्यतः छायाकारांनी उत्तम दाद दिली आहे.

-व्यवसाय झाला तर तो कुणाला नको आहे..पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या गीत- संगीतकाराच्या जोडीने त्यांचा बाज इथे जपला आणि जपला आहे..शब्दातील भावनांचा चित्रबध्द उत्तम केले ते पडद्यावर.
प्रत्येकाबाबत लिहले नाही तरी चालेल..पण इशा कोप्पिकरचे निवडणे हिच मोठी गोष्ट..तिची मॉडल म्हणून रुळलेली वाट इथे स्पष्ट दिसते..तशी आई आणि प्रेमळ पत्नीही...

-बुध्दीबळातील प्रभावीपणाचा उपयोग करुन जन्मतःच कर्णबधीर मुलींच्या मनात आणि त्यांच्या माता-पित्यांच्या मनाला उभारी देण्याचे एक चांगले काम इश्शा कोप्पीकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने प्रभावीपणे केले आहे.


कलाकारांमध्ये उल्लेख झाला अनेकांचा पण जो राहून गेला पण आवश्यक होता तो मीनीची भूमिका पडद्यावर दाखविणा-या या बालकलाकाराचा..तेजश्री वालावलकर...रमाच्या भूमिकेचे सोने करुन तीच्या वाट्याला येतात ती सा-या भूमिकांना न्याय देते..इतेही तिची कणव आणि बुध्दीची चमक दिसते...यातले महत्वाचे म्हणजे आई-मुलीच्या खुणांच्या भाषेचे जे गुपित जमले आहे..तेही अनुभवायला हवे...आनंद अभ्यंकरांच्या छोट्या भूमिकेतही ती आनंदी वृत्ती चित्रपटाला सुसंगत असीच आहे..
मनोहर सरवणकर या दिग्दर्शकाचे या अवघड कामगीरीबद्दल मनापासून अभिनंदन.निर्माताही तेवढाच महत्वाचा अशा विषयावरचा चित्रपट इतक्या श्रीमंती थाटात तयार करुन आपली वेगळी प्रतिभाही त्यांनी दाखविली आहे..

-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 16, 2013

छाप भीमसेन जोशींची उरतेच..


गेले चार दिवस पुणेकरांनी थंडीही अऩुभवली आणि स्वरांचे तारांगणही पाहिले...१२ ते १५ डिसेंबरच्या पाच सत्रातील स्वरांचा हा यज्ञ थांबला तो किराणा घराण्याच्या गायिका आणि गायनातील सौंदर्यस्थळाची ओळख करुन देणा-या डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी आवाजाच्या स्वराने.
वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने  पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.


अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्‍या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन्‌ "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली. 
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग  साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली. 

खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते  पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आमि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.





- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 14, 2013

संतूरचे सूर माधुर्य



 संतूरचे सूर माधुर्य हे कायमच प्रत्येकालाच मोहोळ घालतात. मात्र, याला प्रयोगांची जोड व वैविध्याचे नावीन्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. पंडित उल्हास बापट यांनी संतूर या वाद्याच्या र्मयादा असूनही  त्यावर मात करून, नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.
 यंदा १४ वर्षांनंतर या स्वरमंचावर संतूर वादनाची किमया त्यांनी रसिकांना दाखविली. राग पूर्वा कल्याणने त्यांनी वादनाला सुरुवात केली. वातावरणात प्रसन्नतेची लहर पसरवत त्यांनी आलाप सादर केला. जो, झाला यानंत विलंबित झपतालातील रचना सादर करत त्यांनी सुरांची बरसात केली. त्यानंतर दृत तीनतालातील रचना सादर केली.


 'क्रोमॅटिक ट्युनिंग' याविषयी रसिकांना समजवताना ते म्हणाले, ''१२ स्वर संतूरवर असले, तरी जो राग वाजवायचा तो सतत ट्यून करावा लागतो. परंतु, क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये १२ स्वर ट्यून करून, त्यानुसार ते वाजविण्यात येतात. म्हणजे प्रत्येकवेळी ट्यून करण्याची वेळ येत नाही. अत्यंत सतर्क राहून चुकून दुसरा स्वर वाजू नये याची काळजी घ्यावी लागते.'' हे त्यांनी विविध रागांची सरगम वाजवून सहोदारण समजून सांगितले.
आसमंतात भरून राहणारी वैशिष्ट्यपूर्ण मिंड ही त्यांच्या वादनाची खासियत. यासाठी वेगळी स्टीक व तंत्र त्यांनी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या वादनाच्या वैविध्याचा अजून एक नमुना दाखवत मिश्रकाफी रागातील टप्पा त्यांनी सादर केला. 'आम्ही केवळ सूर व तालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. शब्द फक्त दिलेला पाळतो.' असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी सुरांचा एक अनमोल नजराणा त्यांनी पेश केला. त्यानंतर 'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यपद सादर करून एक सुखद धक्का देणारा आविष्कार सादर करून त्यांनी मैफलीचा समारोप केला.
त्यांना रामदास पळसुले (तबला), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली.