subhash inamdar

subhash inamdar

Thursday, March 13, 2014

आवाज कुणाचा..भावे काकांचा...पडद्यावरही



`रंगभाषाकार`...प्रभाकर भावे इप्टाच्या माहितीपटातून थेट रसिकांच्या ह्दयापर्यंत पोहोचले...आणि सातारच्या घरातली आपली पारंपारिक कला घेऊन ते आता रंगभाषेच्या माध्यमातून देशाच्या नाट्यपरंपरेतले चेहरे सजविणारे कलावंत म्हणून सुपरिचित झाले ...

 पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक या एकांकिका स्पर्धांसोबतच "इप्टा‘, "पीडीए‘, थिएटर ऍकॅडमीसारख्या अनेक नाट्य संस्थांच्या प्रयोगांमधून त्यांनी रंगभूषेची किमया केली आहे. महाविद्यालयीन तरुणांमध्ये ते भावेकाका या नावानेच ओळखले जातात. रुपेरी पडद्यावर जेव्हा हा माहितीपट झळकला तेव्हाही उपस्थित तरुण कलावंतांनी पुन्हा एकदा..आव्वाज कुणाचा..भावे काकांचा..म्हणत एकच गजर करत त्यांच्या प्रेमाचे पुरते दर्शन घडविले..

आपण जे काही आहोत..ते वडिलांच्या कलागुंणांच्या शिकवणुकीने..आणि रंगभूषेतल्या कलेचा ध्यास घेऊन जगलो ..परमेश्वराने आपल्याला यासाठीच जन्माला घातले..ह्या धारणेने...मात्र मी आज प्रेम पाहून काय बोलावे..तेच कळत नाही...माझ्या काकांनी (मुकुंद भावे) तर मला साक्षात दंडवत घालून मला लाजविले...याउपर मी काय बोलावे..हेच कळत नाही....प्रभाकर भावे आज इथे मात्र खरोखरच निशब्द झाले..

गुरुवार संध्याकाळी सारे तरुण रंगकर्मी राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या चित्रपटगृहात एकत्र होऊन..भावेमय रंगून गेले होते..इप्टाच्या पुणे शाखेच्या या माहितीपटाचे कोतूक करण्यासाठी मुंबईहून  व इप्टाचे माजी उपाध्यक्ष व अभिनेते अंजन श्रीवास्तव  , अभिनेते मोहन आगाशे,ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांच्यासह अनेक जण अमृत सामक यांनी बनविलेला पाहण्यासाठी आणि प्रभाकर भावेंच्या कार्याची तोंडभरून स्तुती करण्यासाठी हजर होते...
हरहुन्नरी कलावंत..काय काय करु शिकतो...ते त्यांच्या रंगभूषेच्या प्रदिर्घ कारकीर्दीने समजते...शिवाय त्यांचे मुखवटे आणि रंगभूषेविषयीचे पुस्तकही तेवढेच उत्तम साकारले गेले आहे...कलाकारातला माणूसही तेवढाच जागा आहे...भावे काकांचे एक वैशिष्ठ्य म्हणजे..ते माणसातल्या कालकाराला बाहेर काढतात..त्यांनी चेहरा रंगविला की तो तो रहात नाही तो नट बनतो..आणि आपली  भूमिका उत्तम रिच्या वठविण्याचा आत्मविश्वास आपल्यात सहजपणे प्राप्त होतो..असा तरुण रंगकर्मिंचा विश्वास आहे.

अनेक कलावंत आणि पुरुषोत्तम गाजविणारे..गाजविलेले कलाकार भावेंविषयी काय सांगतात..ते ऐकणे फार मोलाचे आहे...फ्रभाकतर भावे यांचा सन्मानही इथे केला गेला...मोहन आगाशे यांनी तो केला..एका रंगकर्मिला असा रसिकांचा लोभ मिळणे हे आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे..ती त्यांना त्यांच्या रुजू बोलण्यातून..कामाच्या निष्ठेतून मिळाली..हेच यातून दिसते....त्यांच्या या क्षेत्रातल्या लेखनकार्यालाही नाट्यकर्मिच्या लेखी एक प्रयत्नातून सिध्द झालेला ठेवा प्राप्त होत आहे..तो जपून ठेवावा आणि त्यांच्या लेखनाला महत्व प्राप्त व्हावे अशीच सा-यांची इच्छा आहे.



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


No comments:

Post a Comment