ज्योत्स्ना भोळे...यांच्या गायकीचा स्पर्श झालेल्या अनेक गीतांना..नाट्यपदांना आज पुण्यात पुन्हा त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐकण्याची संधी आज पुणेकरांना मिळाली..ती त्यांच्या गाण्यांच्या स्पर्धेच्या दिवशी..पुण्याच्या पत्रकार संघात.`स्वरवंदना प्रतिष्ठान`च्यावतीने रविवारी १८ ते ८० वयोगटातल्या विविध वयातल्या स्पर्धकांनी भाग घेतला..यात मोठ्या गटात लीना राजवाडे आणि कनिष्ठ गटात किमया लोवलेकर यांना पहिले बक्षिस मिळाले...
निर्मला गोगटे, सुमती टिकेकर आणि गायक श्रीकांत पारगावकर यांच्या परिक्षक समितीसमोर स्पर्धकांनी आपापली तयारी सादर केली..लगेचच याबाबतचा निर्णय दिला गेला आणि परिक्षकांच्या हस्तेच विजेत्यांची नावे जाहिर करुन त्यांना पुरस्कार दिले गेले.
`गाणे हे अवघड गोष्ट आणि ती सोपी गोष्ट नाही..तेव्हा तुम्ही प्रयत्न करीत आहात याबद्दल आनंद वाटतो..पण ती एक शब्द-सुरांची अनोखी कला आहे..त्यात मेहनत आहे..ती सहजी येणारी सोपी गोष्ट नाही.`.असे..जाहिर चिंतन निर्मला गोगटे यांनी याप्रसंगी सांगून स्पर्धकांची पाठही थोपटली आणि गाणे ही किती गंभीर गोष्ट आहे..ते पटवून दिले.
अरुण नूलकरांनी संपूर्ण स्पर्धेचे संचालन केले..त्यांनीच यशस्वी स्पर्धकांची नावे जाहिर केली..
यात ३५ ते ८० या वरीष्ट गटात
लीना राजवाडे, संगीता कुलकर्णी, संगीता भिडे या तिघांशिवाय उर्मिला मराठे यांना उत्तेजनार्थ म्हणून जाहिर केले..याशिवाय १८ ते ३५ या वयोगटात किमया लोवलेकर, ऋतूजा जोशी, भक्ति पिळणकर आणि उत्तेजनार्थ - योगदा देशपांडे याची निवड केली..
या निमित्ताने या सभागृहात ज्योस्त्ना भोळे यांची सतत आठवण येत होती..त्यांची कन्या वंदना खांडेकतर यांनी या बाबत पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजली होती..
त्यांच्या गाण्यातले सहजपणही किती अवघड होते..हे प्रत्येक गीताबरोबर कळत होते..त्यांच्या जन्मशताब्दीच्या या खुणा आता वर्षभर विविध कारणाने उमटणार आहेत..त्यांच्या स्मृतीला अभिवादन...
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment