subhash inamdar

subhash inamdar

Saturday, December 10, 2011

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव -२०११

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातल्या २०११ कांही यूट्यूबवरच्या लिंक्स...यात शंकर महादेवन यांचे भजन


सवाई गंधर्व २०११ महोत्सवात सगळ्या त टॊपला होता तो शंकर महादेवन...त्याच्याच काही यूट्युब लिंक्स







यात पुण्याचे तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे वादन...



अमजदअली खान यांना वेळ कमी मिळाला..पण त्यांनी कमाल केली...

भारतीय संगीताबद्दल विशेष आस्था असणाऱ्या पाश्‍चिमात्यांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचीही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच दर वर्षीप्रमाणे या वर्षीही महोत्सवात परदेशी पाहुण्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरत आहे. संगीताच्या अभ्यासकापासून कानसेनांपर्यंत अनेक पाहुणे भारतीय संगीताने तृप्त होत आहेत.

फ्रान्सहून आलेल्या कॅपियन संगीतातील प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या म्हणाल्या, 'मी थोडेफार गाणे, पियानो शिकले आहे. पण व्यवसायाने किंवा रूढ अर्थाने मी कलाकार नाही. पण मला संगीत ऐकण्यास खूप आवडते. पुण्यात एका मित्राच्या लग्नासाठी आले होते. तेव्हा मला या महोत्सवाबद्दल कळले. महोत्सवाची महती ऐकून येथे येण्याचे ठरवले आणि या संगीताच्या प्रेमातच पडले. गायक सुरवातीला जी आलापी करतात, ती खूप शांत, सुखद असते. त्यामुळे ऐकणारा स्वत:च्या मनात डोकावू शकतो. किंबहुना मला भारतीय संगीताचे हेच वैशिष्ट्य वाटले. ते मनाच्या खोलवर पोचले. मला जमिनीवर बसायची सवय नाही; पण महोत्सवात संगीत ऐकताना माझे पाय दुखत आहेत किंवा अशाप्रकारे बसणे मला अवघड जात आहे, हे जाणवतही नाही आणि हीच मला भारतीय संगीताची ताकद वाटते. तुमचे दु:खही तुम्हाला विसरायला लावते.''

पुण्यात आल्यापासून इथले लोक खूप घाईत, धावपळीत असल्यासारखे वाटतात; पण महोत्सवात त्यांना इतक्‍या शांत चित्ताने बसलेले पाहून खूप आश्‍चर्य वाटले. त्याचबरोबर इथे सर्व स्तरांतील रसिक एकत्र बसून गाणे ऐकतात. श्रीमंतासाठी वेगळी सोय, गरिबांसाठी वेगळी, असा प्रकार नाही हे पाहूनही खूप आनंद झाला, असेही कॅपियन यांनी नमूद केले.

मूळचे कॅनडाचे, पण आता सिंगापूर येथे राहणारे व पुणेकर तबलावादक नवाझ मिरजकर यांच्याकडून शिक्षण घेणारे ब्लेअर मिलर या कार्यक्रमांकडे अभ्यासक दृष्टीने पाहतात.

तबल्याचे शिक्षण नऊ वर्षे घेतल्यामुळे, तसेच दिल्लीत काही वर्षे राहिल्याने त्यांचे कान भारतीय संगीतासाठी तयार झाले आहेत. ते म्हणाले, ""इथला रसिक मला जास्त आवडतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन भारतीय संगीत ऐकणे, हा अनुभव खूपच छान आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या अनेक ध्वनिफिती मी ऐकल्या आहेत. त्यांच्या आवाजात जबरदस्त ताकद होती. महोत्सवातील वाद्यसंगीत मला अधिक भावले.''
पुण्यात मिरजकर यांच्या घरी जाऊन आपले गुरू नवाझ मिरजकर यांच्या आई-वडिलांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

कॅनडात भारतीय संगीत शिकणाऱ्या रॉबिन कॅरिगन या खास महोत्सवासाठी पुण्यात आल्या आहेत. पुणेकर नीरजा आपटेकर या त्यांच्या कॅनडातील गुरू आहेत. कॅरिगन म्हणाल्या, ""मी गाण्याबरोबर पियानो, ऑर्किडियनही शिकते. या महोत्सवात मला अश्‍विनी भिडे देशपांडे, शैला दातार यांचे गाणे अधिक भावले. सॅक्‍सोफोनवर भारतीय संगीत ऐकण्याचा अनुभव खूप वेगळा होता. मी जॅझही शिकते. त्यामुळे हा प्रयोग मला अधिक भावला. कॅनडात विविध देशांतील संगीत क्षेत्रातील लोक राहतात. त्यामुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला मिळते.''

http://www.esakal.com/esakal/20111211/5733657263938939740.htm

आनंदपंढरीचा विठ्ठल
















भारतरत्न, स्वरभास्कर, कलासम्राट स्व. भीमसेन जोशी यांचे चरणी
सविनय, अर्पण.
आपल्या गायनक्षेत्रातील असामान्य पराक्रमाने भारतवर्षाची कीर्ति वाढविणा-या व अभिमानपूर्वक निर्देश करण्यायोग्य अशा ज्या व्यक्ति प्रभूकृपेने आम्हला लाभल्या त्यापैकी आपण एक आहात.
श्रेष्ठ विभूतीप्रमाणे संगीतक्षेत्रातील आपले स्थान एकमेव आहे.पुणे नगरी आपल्या ऐन उमेदीतील कार्यक्षेत्र झाले व येथील दीर्घकाळ वास्तव्यामुळे पुणेवासियांना आपल्याविषयी पराकाष्ठेचा अभिमान व आत्मभाव वाटत आला आहे.
संपऩ्न होण्याचे अनेक योग टाळून त्यात मोहवश न होता दूर सारले, ही आपली पुणेकरांवरील एकनिष्ठता व प्रेम आपल्या लौकिकाला ऊज्वलता आणित आहे.


आपण गायन कलेत सम्राट व संगीत क्षेत्रात महर्षी झालात. अनेक अनिष्ट योग उतारवयात सहन करुन
, आपण रसिकांसाठी, संगीताचे ज्ञानसत्र, `सवाई गंधर्व संगीत महोत्सवा`च्या रुपाने वयाच्या ८८व्या वर्षापर्यंत चालू ठेवले..याहुन अधिक स्थितप्रज्ञतेचे उदाहरण क्वचितच सापडेल.
सतत ६५ वर्षे आपल्या अभिजात अतुलनीय गायकीचे स्वरुप कोणत्याही लौकिक मोहाला वश न होता आपण निर्भेळ व सोज्वळ ठेवले आणि अनेकप्रकारच्या विरोधी वातावरणाला न जुमानता आपण परंपरेच्या कलोपासनेचा कर्मयोग अखंड चालू ठवला , हा आपला आदर्श रसिकांना स्फूर्तिदायक व कलाकारांना मार्गदर्शक झालेला आहे.

आपल्या विशिष्ट गायनकलेचे वर्णन करणे शब्दाच्या सामर्थ्याबाहेरचे आहे. आपल्या कलेचे स्वरुप तसे हिमालयाएवढे भव्य आहे.आपल्या गायनप्रकारात नृत्याचे लालित्य, शमशेरीची फेक, मल्लाचे डावपेच, नदीप्रवाहातले गांभीर्य व सागराची अथांगता आढळून येते. शिवाय आपली अगाध बुध्दीमत्ता व योजनाचातूर्य इत्यादी असामान्य गुणविषेशामुळे `स्वरभास्कर`, `भारतरत्न` या पदांवरुन द्रष्टा या दिव्य ध्रृवपदाला आपण पोहोचला आहात.

`सवाई गंधर्व संगीत माहोत्सवा`मुळे, तसेच महाराष्ट्रातील व विशेषतः पुण्यातील आपल्या सूदीर्घ वास्तव्यामुळे संगीत कलामंदीराची अनेक नविन दालने जिज्ञासू कलाव्यसंगी लोकांना ज्ञात होऊ लागली व त्यामुळे तरुण पिढीच्या गायनवेलीवर विविधता येऊ लागली.संगीतक्षेत्रातील आपली ही प्रभावी सत्ता संस्मरणीय होणारी व चिरकाल स्मरणात राहणारी आहे.

गायनकलेच्या स्वरसम्राट पदावर दीर्घकाळ असूनही आपल्या ठिकाणी अहंभाव अणुमात्र नव्हता. या आपल्या गुणाचा उल्लेख केल्यावाचून राहवत नाही. या आपल्या राहणीतील प्रतिष्ठीतपणा, भाषेतील तटस्थपणा, समतोल गुणग्राहकता, अल्पज्ञाविषयी वत्सलता इत्यादी गुण आदर्शवत् होते.
भारतीय संगीत कलेचे एक असामान्य वैभवशाली प्रतिक या भावनेने नम्र होण्यायोग्य एक महान विभुती आपल्या रुपाने आम्हास दीर्घकाल लाभली यातच पुणेकरांना अभिमान वाटतो.
ईश्वर आपल्या आत्म्यास शांती , हीच श्रीचरणी प्रार्थना...

साश्रुनयनांनी....

आपले पुणेकर रसिक.



शब्दांकन- मनोहर देशमुख ,पुणे
9850371464