subhash inamdar

subhash inamdar

Monday, December 16, 2013

छाप भीमसेन जोशींची उरतेच..


गेले चार दिवस पुणेकरांनी थंडीही अऩुभवली आणि स्वरांचे तारांगणही पाहिले...१२ ते १५ डिसेंबरच्या पाच सत्रातील स्वरांचा हा यज्ञ थांबला तो किराणा घराण्याच्या गायिका आणि गायनातील सौंदर्यस्थळाची ओळख करुन देणा-या डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी आवाजाच्या स्वराने.
वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने  पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.


अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्‍या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन्‌ "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली. 
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग  साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली. 

खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते  पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आमि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.





- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 14, 2013

संतूरचे सूर माधुर्य



 संतूरचे सूर माधुर्य हे कायमच प्रत्येकालाच मोहोळ घालतात. मात्र, याला प्रयोगांची जोड व वैविध्याचे नावीन्य हे या मैफलीचे वैशिष्ट्य ठरले. पंडित उल्हास बापट यांनी संतूर या वाद्याच्या र्मयादा असूनही  त्यावर मात करून, नव्या रागांचीही निर्मिती केली आहे.
 यंदा १४ वर्षांनंतर या स्वरमंचावर संतूर वादनाची किमया त्यांनी रसिकांना दाखविली. राग पूर्वा कल्याणने त्यांनी वादनाला सुरुवात केली. वातावरणात प्रसन्नतेची लहर पसरवत त्यांनी आलाप सादर केला. जो, झाला यानंत विलंबित झपतालातील रचना सादर करत त्यांनी सुरांची बरसात केली. त्यानंतर दृत तीनतालातील रचना सादर केली.


 'क्रोमॅटिक ट्युनिंग' याविषयी रसिकांना समजवताना ते म्हणाले, ''१२ स्वर संतूरवर असले, तरी जो राग वाजवायचा तो सतत ट्यून करावा लागतो. परंतु, क्रोमॅटिक ट्युनिंगमध्ये १२ स्वर ट्यून करून, त्यानुसार ते वाजविण्यात येतात. म्हणजे प्रत्येकवेळी ट्यून करण्याची वेळ येत नाही. अत्यंत सतर्क राहून चुकून दुसरा स्वर वाजू नये याची काळजी घ्यावी लागते.'' हे त्यांनी विविध रागांची सरगम वाजवून सहोदारण समजून सांगितले.
आसमंतात भरून राहणारी वैशिष्ट्यपूर्ण मिंड ही त्यांच्या वादनाची खासियत. यासाठी वेगळी स्टीक व तंत्र त्यांनी विकसित केल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या वादनाच्या वैविध्याचा अजून एक नमुना दाखवत मिश्रकाफी रागातील टप्पा त्यांनी सादर केला. 'आम्ही केवळ सूर व तालाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतो. शब्द फक्त दिलेला पाळतो.' असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी सुरांचा एक अनमोल नजराणा त्यांनी पेश केला. त्यानंतर 'देवा घरचे ज्ञात कुणाला' हे नाट्यपद सादर करून एक सुखद धक्का देणारा आविष्कार सादर करून त्यांनी मैफलीचा समारोप केला.
त्यांना रामदास पळसुले (तबला), गौरी लिमये (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

गदीमांच्या पायवाटेवरून चालण्याचा प्रयत्न



हजारो जणांच्या मनावर राज्य करतो तो खरा कवी. गदिमा तसे होते. त्यांनी कविता आणि गाण्यातील अंतर मिटवले आणि लोकसाहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली, हे त्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्यासारखे लिहिणे कठीण असले, तरी त्यांनी निर्माण केलेल्या पायवाटेवरून मी आणि माझ्यासारखे कवी चालायचा प्रयत्न करीत आहोत,अशा भावना ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केल्या.
'गदिमा प्रतिष्ठान'तर्फे दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे आज महानोर यांच्या हस्ते वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीकांत मोघे यांना गदिमा पुरस्कार देण्यात आला, तर 'गृहिणी -सखी-सचिव पुरस्कार' मधुरा जसराज यांना प्रदान करण्यात आला. कवी आणि लेखक गुरू ठाकूर यांना 'चैत्रबन पुरस्कार', तर गायिका विभावरी आपटे-जोशी हिला 'विद्या-प्रज्ञा पुरस्काराने' गौरवण्यात आले. मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कवलापूरचा प्रतीक फाळके यालाही गदिमा पारितोषिक देण्यात आले.

महानोर म्हणाले, ''गदिमा जातिवंत शेतकरी, अतिशय प्रतिभावान पण साधा माणूस होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत जसे आणि जितके काम केले, तसे करणारे फार कमी असतील. लावणीला खरी प्रतिष्ठा त्यांनी दिली.'' आपली आणि माडगूळकरांची पहिली भेट ६८मध्ये मराठवाडा साहित्य संमेलनात झाली, त्या वेळी आपल्यासारख्या नवोदित कवीला प्रोत्साहन दिल्याच्या आठवणी महानोर यांनी जागवल्या. 

इंद्राणी मुखर्जी


बनारस घराण्याच्या युवा गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी  रसिकांना अभिवादन करून राग यमनने त्यांनी गायनाला सुरुवात केली.
खडा आवाज, सुरांमधील स्पष्टता आणि आर्तता यंमुळे त्यांनी सुरुवातीच्या काही वेळातच मैफल जिंकली. आलाप आणि तानांवरील प्रभुत्व दर वेळी रसिकांच्या 'वाहऽऽवा'चे मानकरी ठरले.
'मोरी नय्या पार करा..' या बंदिशीसह त्यांनी रागाचा विस्तार करून वातावरणनिर्मिती केली. 'गणपती गजानन देवा..' या बंदिशीद्वारे सुरांवरील पकड सिद्ध करीत वातावरणात पवित्रता भरली. त्यानंतर पेश केलेला दादरा 'हमसे ना बोलो..' यातील हरकती व मुरक्यांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

 रसिकांच्या आग्रहाला मान देत लोकभाषेतील पूर्वी दादरा 'हमे ना भावे यारीरे सावरिया..' सादर करून त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला.
त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पंडित रामदास पळसुले (तबला), आभा पुरोहित व नीला वैद्य (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

Friday, December 13, 2013

ही छायाचित्रे जरूर पहावीत..

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने वर्धापनदिनामित्ताने छायाचित्रांचे प्रदर्शन कालपासून दोन दिवस पुण्यातल्या घोले रस्त्तावरच्या कलादालनात आयोजित केले आहे.
.

पुण्यातल्या विविध वृत्तपत्रातून आणि नियतकालीकातून छायाचित्रकार म्हणून दर्जा प्राप्त केलेल्या छायाचित्रकारांनी हि संधी उपलब्ध करुन दिली आहे.











यात केवळ तेच छायाचित्रकारच नव्हे तर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नुकताच प्रारंभ केलेल्या छायाचित्रांच्या अभ्यासक्रमातील विद्र्थीही यात सहभागी होऊन आपली छायायित्रे यात सामील केली गेली आहेत...




जे क्षण बातमी अधिक ठळक करतात..पण जे स्वतः एक बातमी बनू शकतात असे हे क्षण आहेत.













एक वेगळी विषय अतिशय तरल अशा छबीतून त्यांनी टिपलेोले असतात..
अतिशय भावपूर्ण तरीही कालातीत लक्षात रहावीत यासाठी ही सारी देखणी चित्रे उद्याची संस्कृती दाखवित मिरवत असातत. त्याचे महत्व कालातीत आहे.




वेळ काढून ही छायाचित्रे जरूर पहावीत..

.

-सूभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 12, 2013

पुणेकरांच्या साक्षीने स्वरयज्ञाचा आरंभ

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी सुरु केलेल्या आपल्या गुरुंच्या नावाने केलेल्या स्वरयज्ञाला गुरुवारी पुण्यात तेवढ्याच दिमाखात हजारो संगीत रसिकांच्या साक्षीने सुरवात झाली..सवाई गंधर्व भीमसेन जोशी महोत्सव असे नामकरण करुन दोन्ही महान गुरुंचे स्मरण होते.
आता ते सारे दिग्गज संस्थापक नाहीत पण तरीही ही स्वर ज्योत अनंक हस्तांनी पुढे प्रज्वलीत होत तेवत रहाते..मानाने आणि तेवढ्याच ताकदीने.
यंदाचे याचे वर्ष आहे ६१..साठीतून पुढे जाभन आता खरी प्रगल्भता सारीकडे दिसते आहे..आता या महोत्सवाला वलय आमि वैभव दोन्ही मिळत आहे..ती सारी पुण्याई पं. भीमसोन जोशी या दृष्ठ्र्या गायकाच्या दिव्य दृष्टीची.
आता त्यांच्याबरोबरीचे कोणीच संस्थापक सदस्य फारसे दिसत नाहीत.

पण एक जातकुळीने पत्रकार पण संगीताच्या या प्रवाहात त्यांच्याबरोबरीने साथ करणारे वयोवृध्द जाणकार नाव म्हणजे रामभाऊ जोशी..आज त्यांनी ९३ वर्षात पदार्पण केले आहे..काल त्यांच्या सत्कार खास करुन या स्वरमंडपात झाला...त्यांना मायेची शाल पांघरली गेली..
त्यांना आता केवळ शब्द पुरे आहेत. स्नेह  हवा आहे..त्यांनी सवाई गंधर्व महोत्वसासाठी घेतलेले व्रत सर्वांना माहित व्हायला हवे आहे..
काल त्यांना खास मंडपात आमंत्रीत केरून त्यांचा सत्कार श्रीनीवास जोशी यांनी केलाच...

त्याबरोबरच. सवाई गंधर्वांची नातसून सौ. पद्मा देशपांडे यांच्या २८ रांगावर आधारीत स्वरपद्मा ही सीडीही प्रकाशीत केली गेली..
यावेळी आपली आठवण ठेवल्याबद्दल रामभाभ जोशी यांनी समाधान व्यक्त केले.






कालचा दिवस गाजला तो जसरंगी जुगलबंदीने..सौ. अश्वीनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या दोन भिन्न रागातल्या मजेशीर बंदीशींच्या सुरांवटींमुळे. एक सप्तकात तर दुसरा खर्जात असा दुहेरी सुरांचा सुस्वर स्वरबहार रंगवत त्यांनी वेगळीच आर्वतने सावरमंचावर सादर करून बहार आणली..

निषाद खॉ यांनी सतारवादनात वेगवेगळी स्वरआवर्तने सादर करुन त्यात चमकृती आणण्याचा सुंदर प्रयत्न रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्विकारला..त्यांना कलकत्त्यांचे निष्णाद तबला नवाज आनंदो चटर्जी यांनी जी बेमालून साथ केली तीही विस्मरणीयच होती...

अखेरीस पं. जसराज यांचे स्वरमंचावर आगमन होत आहे अशी निवेदक आनंद देशमुख यांनी घोषणा केली आणि तमम रसिकांच्या टाळ्यातून दाद मिळत गेली...त्यांचे माफक गायन मंचाला एक झळाळी प्राप्त करुन देणारे ठरले..पण आता त्यांच्या स्वरात तो पूर्वांचा जोश नसल्याचे रसिकात बोललो जात होते...

सवाई गंधर्व महोत्सव आणि आनंद देशमुख यांचे रसभरीत आणि उत्स्फूर्त निवेदन हे एक समीकरणच झाले आहे.
निवेदक आनंद देशमुख यांचे हे २५ वर्ष सलगपणे निवेदन करण्याचे रेकॉर्ड गिनिज बुकात नोंद घेण्याजोगे आहे..त्यांच्या निवेदनात कुठेही खास शब्दावरचा दाब वाही..आब राखून अतिशय विनम्रपणे ते माहीती देतात...त्यांच्या या खास निवेदनाला एका वेगळ्या खर्जीची धार आहे..यंदाचे हे एक अणखी आकर्षण चारही दिवस एेकायला मिऴणार आहे..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276





Monday, October 21, 2013

कथेत जीवन शोधतो


- गिरीष कुलकर्णी

 एखाद्या कलाकृतीचा समाजावर मोठा परिणाम होत असतो त्यामुळे
चित्रपटाच्या कथेत मी माझं जगणं शोधण्याचा प्रयत्न करत असतो, माझ्या
चित्रपटांमधून काय संदेश जातो याविषयी मी तत्पर असतो, अशी भावना
दिग्दर्शक-अभिनेता गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केली. 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या युवक विभागातर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

यावेळी स. प. महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत नवा
विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संदीप जगधने या 'स्व'-रूपवर्धिनी संस्थेच्या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. 

शिल्पा पोफळे यांनी मुलाखत घेताना गिरीष कुलकर्णी यांच्या आयुष्यातील विविध पैलूं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संस्थेचे सहकार्याध्यक्ष शिरीष पटवर्धन,  पुष्पाताई नडे, विलास कुलकर्णी, प्रा. संजय तांबट, श्रीकांत यादव, मयूर कर्जतकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना गिरीष कुलकर्णी म्हणाले, की शालेय जीवनपासूनच सगळ्या
कलांचा समुच्चय असलेलं क्षेत्र निवडायचं ठरवलं होतं त्यामुळे नाटकाकडे
वळायचा निर्णय घेतला. संस्कारभारतीनं मला एक स्वप्न आणि विश्वास दिला.
वाचनातून  मानवी मनाचे वेगवेगळे पैलू समोर आले, त्यांची अनुभूती
घेण्यासाठी लोकांना भेटलो आणि माणसं वाचायची, त्यांच्यावर प्रेम करायची
सवय लागली. माझ्या कथेत अनेक पात्रं दिसतात त्याचं कारण हेच आहे. वळू,
देऊळ, मसाला नवीन येणारा हायवे या चित्रपटांमध्ये तुम्हाला तुम्ही जे
जगता त्याचं प्रतिबिंब पहायला मिळेल. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश धायरकर यांनी केले तर आभार मयूर कर्जतकर यांनी मानले.