बनारस घराण्याच्या युवा गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी रसिकांना अभिवादन करून राग यमनने त्यांनी गायनाला सुरुवात केली.
खडा आवाज, सुरांमधील स्पष्टता आणि आर्तता यंमुळे त्यांनी सुरुवातीच्या काही वेळातच मैफल जिंकली. आलाप आणि तानांवरील प्रभुत्व दर वेळी रसिकांच्या 'वाहऽऽवा'चे मानकरी ठरले.
'मोरी नय्या पार करा..' या बंदिशीसह त्यांनी रागाचा विस्तार करून वातावरणनिर्मिती केली. 'गणपती गजानन देवा..' या बंदिशीद्वारे सुरांवरील पकड सिद्ध करीत वातावरणात पवित्रता भरली. त्यानंतर पेश केलेला दादरा 'हमसे ना बोलो..' यातील हरकती व मुरक्यांचे रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
रसिकांच्या आग्रहाला मान देत लोकभाषेतील पूर्वी दादरा 'हमे ना भावे यारीरे सावरिया..' सादर करून त्यांनी आपल्या मैफलीला विराम दिला.
त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पंडित रामदास पळसुले (तबला), आभा पुरोहित व नीला वैद्य (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
No comments:
Post a Comment