subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 17, 2016

मानव्याच्या निमित्ताने रंगला गदिमायन..



मानव्य संस्थेच्या संस्थापिका विजयाताई लवाटे...
देहविक्रय करून चरितार्थ करणाऱ्या असहाय्य स्त्रियांचा आधार असलेल्या.....फूटपाथवर भाजीपासून कपड्यांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणाऱ्या हजारो कष्टक-यांचा आधार असलेल्या.....एड्सग्रस्त मुलांच्या पाठीवरून फिरणारा आईच्या मायेचा हात असणाऱ्या 'मानव्य' संस्था च्या कर्त्या धर्त्या….मानवतेचा, प्रेमाचा, वात्सल्याचा आणि निरपेक्ष माणुसकीचा वारसा देणा-या ... विजयाताई लवाटे.....!!!

एचआयव्ही बाधित मुलांना त्यांचे जीवन सुखाने जगता यावे याच उद्देशातून सामाजिक कार्यकर्त्यां विजयाताई लवाटे यांनी ‘मानव्य’ संस्थेच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली.
आता त्याला अकरा वर्षे झाली..काल म्हणजे ११ फेब्रुवारी २०१६ हा त्यांचा स्मृतिदिन..तो एस एम जोशी सभागृहात साजरा केला गेला..मानव्य संस्थेत आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरविणारी मुलंही इथे एकमेकांना बिलगून आपल्या या प्रेमाचा ओलावा शोधत होती..
यानिमित्ताने डॉ. अारुंधती सरदेसाई यांनी या मुलांच्या जीवनात आई-वडील, आजीःआजोबांचे प्रेम मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करीत ...विजयाताई लवाटे यांच्या कार्याची स्तुती  तिथे सर्वांच्या तोंडून होत होती..त्यांच्या कार्याने वाढलेल्या संस्थेचे बळ वाढविणारी आर्तिक मदतही लोक देत होते..एकूणच मानव्यच्या कार्याची पोचपावती समाज देत होता..

त्यातच भर म्हणून अलौकिक प्रतिभेचे कवी, लेखक, कलावंत आणि गीतरामायण लिहून अजरामर केलेले गदिमांचे मोठेपण सांगत त्यांच्या चित्रपट गीतांना पुन्हा एकदा सादर करून ती पोचपावती आपल्या गदीमायन या कार्यक्रमातून गदिमापुत्र आनंद माडगूळकर यांनी मानव्यसाठी जमलेल्या उपस्थितांना त्या काळाची आठवण करून दिली..
त्यांच्या थोरवीच्या आणि कवीतल्या श्रेष्ठत्वाची उदाहरणे देऊन गदिमांचा जीवनपट आनंद माडगूळकर सांगत होते..

नाटककार बाळ कोल्हटकरांनी आनंदला जेव्हा गीतरामायणातले एखादे गाणे म्हण म्हणून आग्रह करताना ते सादर करताना त्यांच्या डळ्यातून घळघळा अश्रूंचा बांध फुटला..आणि त्यांनी सांगितले ते ऐकताना गदिमा माझ्यासमोर मूर्तीमंत उभे राहिले...हेच गदिमा पुन्हा आपल्या स्मरणात आणण्याचे कसब आनंद माडगूळकरांच्या वाणीत त्यांच्या निवेदनात आणि त्यांच्या ओघवत्या गीतात पुरेपुर आहे..हे रसिकांनी जाणले...आणि गदिमायनच्या कार्यक्रमाचे स्वागत करत हा कार्यक्रम एकत रहावा ..गदिमा पुन्हा एकदा आपल्या कथानकातून बाहेर येत ओजस्वी वाणीने प्रतिभेचे लेणे लाभलेल्या पुत्राकरवी ऐकण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद इथे येत राहिला..

त्याचे सूत्रसंचालन करणा-या विनया देसाई यांचाही सहभाग लाभल्याने ही मैफल सुरु होता होता केव्हा संपली ते कळलेही नाही..
खर तर असा कार्यक्रम मानव्यच्या व्यासपीठावर ऐकायला मिळाला याचे समाधान वाटते..









-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments:

Post a Comment