विद्याधर गोखले संगीत नाट्य प्रतिष्ठानच्या कलावंतानी रविवारी प्रेम व्यक्त करण्याच्या दिनी मराठी
संगीत नाटकांची परंपरा कायम ठेऊन..अगदी आण्णासाहेब किर्लास्करांपासून,,भास्करबुवा बखले, खाडीलकर, बालगंधर्व..राम मराठे, जितेंद्र अभिषेकी..ते कान्होपात्रा..ते कट्यार..ते स्वरसम्राज्ञी...पासून अनेक नाटकातली प्रेमविषयक भावना विविध रागात गुंफणारी सुंदर ओंजळ रसिकांच्या चरणी समर्पित केली.
व्हेलंटाईन दिनी आपली संगीत नाटकांची जुनी परंपरा सिध्द करत नवीन कलावंतांच्या साभिनय आणि सवेश प्रवेशांची आगळी मालिकांच पुण्यातल्या प्रेमरंग या कार्यक्रमातून शुभदा दादरकर यांच्या लेखनातून गुंफत मुक्तपणे नाट्यसंगीताच्या चाहत्या रसिक वृंदांसमोर सादर करुन वाहवा मिळविली..
मधुवंती दांडेकर आणि श्रीकांत दादरकर यांनी प्रतिष्ठानच्या दोन वर्ष नाट्यसंगीताची तालिम घेणा-या गुणी कलावंतांना रंगमंचीय कसे वावरावे..कसे गावे..गाताना चेहरा कसा हसरा ठेवावा..या सा-याची रितसर तालीम दिली.
नाट्यसंगीत गाताना ते वेळेच्या मर्यादेनुसार कसे विविधरंगी बनवावे याचे प्रशिक्षणही यामुळे इथे मिळाले..
असे कार्यक्रम महिन्यातून एक तरी करण्याचा मानसही शुभदा दादरकर यांनी बोलून दाखविला..
यात काम करणारे कलावंत..धीटाईने सारे काही साग्रसंगीत सादर करून रसिकांच्या पसंतीस उतरत होते..
हिमांशू जोशी आणि विद्यानंद देशपांडे यांची ऑर्गनची आणि तबल्याची साथ घेऊन ..संगीत नाटकातली पदे ही मुले तन्मयतेने वेशभुषेसह गात होती...
सादर करताना नटी-सूत्रधाराच्या हातात कार्यक्रमाची सूत्रे देत..सारा प्रेमरंगाचा प्रवास होत होता..
यात हेमंत आठवले..सूत्राधार..दिपाली राजे...नटी...तर त्यांच्या जोडीला नाट्यपदांची विविधरंगी मोरपिसे रसिकांच्या मुखी नाटविली ती ...अनुजा माढेकर, लीलाधर चक्रदेव, मीनल पोंक्षे, माधवी केळकर, कल्याणी बडगुजर, मानसी दातर आणि मानसी बडवे या कसदार कलावंतानी..
संगीत नाटकांची मजा काही वेगळीच असते..त्यातही ते ते रुप घेऊन तुम्ही ती पात्रेच बोलावली तर रंगमंचावर पाहतानाही सुंरेख वाटते...
असे कार्यक्रम करताना आगामी कलावंतांची एक फौज तयार होऊन नवे संगीत नाटक नव्या स्वरूपातही पुढे-मागे य़ेऊ शकेल..असी आशा करावयास काहीच हरकत नाही..
पुन्हा एकदा सा-या कलावंतांचे आणि सादरकर्त्या संस्थेलाही धन्यवाद द्यायला हवेत...
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment