गदिमांच्या ९४ व्या जयंतीनिमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्या थोरवीची गाथा ऐकण्याचे भाग्य..
आम्हा पुणेकरांना लाभले ते त्यांच्या अप्रकाशित कवीतांचे पुस्तक त्यांचे सुपूत्र श्रीधर माडगूळकर यांनी लिहले आणि ते प्रकाशित केलेल कॉन्टिनेंटलच्या देवयानी अभंय्कर यांत्या वतीने... अजून गदिमा...या पुस्तकाच्या निमित्तानि पुन्हा एकदा गदिमांची थोरवी रसिकांच्या कानी घातली गेली..खरे पाहता पुन्हा एकदा माडगूळकर पुन्हा जीवंत झाल्यासारख्या वाटले..
तरुण पिढिचे लोकमान्य कवी..संदीप खरे ..यांनी माडगूळकरांच्या सहवासात यानिमित्ताने आपल्याला रहाता आले..याचा अधिक आनंद झाल्याचे सांगून आमची पिढी त्यांच्या कवीतांवर आणि गीतांचा आजही किती चाहती आहे हे स्पष्ट केले.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ग. दि. माडगूळकर यांच्या अप्रकाशित कवितांचा समावेश असलेल्या ‘अजून गदिमा’ आणि गजलकार प्रदीप निफाडकर यांच्या ‘मैं शायर’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले.
गदिमा कुठे नव्हते. ते स्वातंत्र्य चळवळीत होते. काँग्रेसमध्ये होते. सामाजिक चळवळीत होते. लेखक रस्त्यावर उतरला पाहिजे ही त्यांची धारणा होती, असे सांगून कोत्तापल्ले म्हणाले, चित्रपटासाठी गाणी लिहिणे म्हणजे गीतकार असे नव्हे. तर, संगीतकाराला चाल सुचावी असे लिहिणारा तो खरा गीतकार. असे गीतलेखन करणाऱ्या गदिमांनी मराठी आणि हिंदूी चित्रपटांसाठी कथा-पटकथा लेखन केले. चित्रपटामधील धंदेवाईक लोकांनी मोठय़ा लेखकांना दूर केल्यामुळे मराठी चित्रपट रसिकांपासून दूर गेले.
बांगला देशाच्या निर्मितीनंतर पुण्याच्या रेसकोर्सवर इंदिरा गांधी यांच्या झालेल्या सभेसाठी स्वागतगीत लिहिणारे गदिमा आणि या गीताच्या तालमी गदिमांसमवेत पाहण्याचे भाग्य लाभले हीच माझी श्रीमंती, अशी भावना उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी भाषांमधील भिंती दूर केल्या पाहिजेत, असे सांगून अनिस चिश्ती यांनी निफाडकर यांच्या पुस्तकाने मराठी आणि उर्दू साहित्यामध्ये भर घातली असल्याचे मत व्यक्त केले.
श्रीधर माडगूळकरांनी जयंतीच्या दिवशीच गदिमांच्या जन्माची कथी जी ऐकविली..तेव्हा ड़ोळ्यातून पाणी आले..मृतसमान असलेल्या मांसाच्या गोळ्याला जेव्हा विस्तवाचा स्पर्श झाला आणि जेव्हा पहिला कौहमचा उद्गार आला तेव्हाच हा मोठा होणार याची कल्पना आली...पुरण्याची तयारी असताना सुईणीने केलेल्या या प्रयत्नातून हा महातवी उदयाला आल्याची भावना..फार निराळी आणि चटकालावून जाणारी होती..
आपल्या आईेने बबनराव नावडीकरांच्या १०८ वेळा गीतरामायणाच्या कार्यक्रमाला बेलबागेत आपल्याला नेले..तिथेच गदिमांची महती लक्षात आली..मात्र ती गेली त्यानंतर चारच दिवसांनी गदिमा गेले..ह्या दोन्ही घटना आयुष्यात चटका लावणा-या होत्या असेही निफाडकरांनी सांगितले. ३५ उर्दु शायरांचा परिचय करुन देणारे मै शायर हेपुस्तक आज प्रकाशित होते याबद्दल समाधान व्यक्त करुन माडगूळकरांच्या पुस्तकाशेजारी बसणायचे भाग्य म्हणजे त्यांच्या तरणाजवळ बसण्याचा हा मान आहे..असे समजतो अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
देवयानी अभ्येकरांच्या निवडीचेही अनेकांनी कौतूक केले. ७५ वर्षीची परंपरा असलेल्या प्रकाशन संस्थेचे आजोबा.अनंतराव, वडील. अनिरुध्द आणि आता काका.रत्नाकर कोणीही नाहित.याची वेदनाही देवयानी यांनी बोलून आपल्या भावना वाचकांसमोर उघड्या केल्या..
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment