subhash inamdar

subhash inamdar

Wednesday, February 10, 2016

पोएट सुधीर मोघे साठला आहे रसिकांच्या ह्दयात


सोमवारी पुणेकरांनी दोन कार्यक्रमातून कवीराज सुधीर मोघे यांची स्मृती जागविली.. एक टिळक स्मारक मंदिरात डॉ. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी या पिता-पुत्रांनी टिळक स्मारक मंदिरात.....
....तर पुणेकर कलावंताला दूरदर्शनवरून थेट बोलते..करणारे निर्माते अरुण काकतकरांनी सुधीर मोघे यांच्या पंधरा कवीता..गीतांची पार्श्वभूमी सांगणारी आणि जिवनाबद्दलच्या जाणावांचे आणि आपण गेल्यानंतर काय उरावे यांची आपल्या कवीतेमधून सांगितलेली आठवण पुन्हा एकदा रसिकांसमोर ठेऊन मनोहर मंगल कार्यालयात अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या..
संस्कृती प्रतिष्ठानच्या शिरीष बोधनी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरवात मानसी मागिकर यांच्या प्रास्तावीकाने झाली..तर पुढे सलग तेरा आठवणीतून स्वतः सुधीर मोघे आपल्या आयुष्यातल्या विविध टप्प्यावर भेटलेले संगीतकार, निर्माते यांच्याशी कवीतांबाबात झालेल्या चर्चेतून चित्रपटातली गीते कशी कागदावर उतरत गेली याचे वर्णन सांगणारी मालीकाच रसिकांसमोर येत गेली..
अरूण काकतकरांनी सुधीर मोघे यांना बोलते केले..आणि तो बोलवीता धनी आपले मनोगत रसाळ वाणीत सांगत गेला..
इथे पोएट सुधीर मोघे बालते झाले..

बोलताना कांही ठिकाणी थांबून त्यांची गाणी विशेषतः राम फाटक यांनी संगीत दिलेले भावगीत सखी मंद झाल्या तारका आपले गुरू पं. भीमसेन जोशी यांनी कसे गायले..आणि ते सांगताना दोघांचे मोठेपण.. भीमसेन जाशी आणि सुधीर फडके यांचीही आठवण सांगून  उपेंद्र भट यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला.
हे नायका जगदीश्वरा ..ही नांदीही भट यांनी सादर केली..

गुरु एक जगी त्राता..हे गीत प्रमोद रानडे यांनी सादर केले..



आदिती देशमुख यांनी ..झुलते बाई रास झुला..आणि उत्कर्षा शहाणे यांनी ..एकाच या जन्मी जणू फिरूनी जणू जन्मेन मी..आणि... सांज ये गोकुळी गाऊन सुधीर मोघे यांच्या ओघवत्या शेलीची आठवण करून दिली.





या कार्यक्रमाचे वर्णन कवी सुधीर मोघे यांच्याच शब्दात सांगण्याचा मोह होतो..

क्षण जगून झालेले
जुन्या पानात जपावे
डोळ्यातील पाण्यानेच
नवे पान उलटाले..

अरूण काकतकरांनी हा अनुभव दिला..त्याबद्दल त्यांचे मनासापून ऋण...
पोएट सुधार मोघे..तुम्हाला आठवताना खूप कांही सोसावं लागते..
तुम्ही जपलेल्या आठवांना इथं.
स्मृतीत भरभरून सांभाळावं लागतं..




-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276





Friday, January 8, 2016

प्रत्येकाला ताल धरायला लावतील अशी गीते


राहूल सुधीर आपटे नावाच्या तरुणाचा आठवणीतली शब्दवारी..एक सुरवात...







राहूल सुधीर आपटे  नावाच्या तरुण संगीतकाराचा  आठवणीतली शब्दवारी..एक सुरवात...या नावाचा मराठी  संगीतातला नवा अल्बम गुरुवारी ७ जानेवारी १६ ला टिळक स्मारक मंदिरातल्या उपस्थित सुह्रुदांच्या  साक्षीने जेव्हा आजच्या पीढीचे संगीतकार म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो..त्या डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशीत झाला तेव्हा माझ्यामनातील भावना अशा श्बदातून व्यक्त झाल्या..

अनिल विठ्टल बोरोले आणि राहूल सुधीर आपटे या गीतकारांचा ही पहिली निर्मिती.आजपर्य़त ते दोघे जोडीने सगळीकडे दिसत गेले..पुढेही ही जोडी कामय राहून पुन्हा नव्या अल्बमची सुरवात ते करतील याची खात्री आहे..

आजपर्य़त आपण कुठल्याही अव्बम किंवा सीडी प्रकाशनाच्या समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो नाही..मात्र या दोन कवी आणि संगीतकार राहूल आपटे यांच्या या संगीतात नवे कांही करु पाहणा-या तरुणांच्या प्रयत्नाला दाद देण्यासाठी आलो..मीही काही वर्षापूर्वी अशाच धावपळीच्या लगबगीतून इथे गेलो आहे..ही वेळ फार चांगली आणि धाकधुकीची असते..तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नाला खूप शुभेच्छा..आता वारी सुरुच केली आहेच..पण आता थांबू नका...वारी निघाली आहे..ती पंढरपूरला पोहोचणार आहे...मात्र आता सतत काही ना काही करत रहायचे आहं..तुमची हि सुरवात आहे...पुढे पता का घेऊन चालत रहा..

असा मोलाचा सल्ला डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिला..

आपल्या वाटचालीविषयी राहूल आपटे सांगतात..गीताची आवड पहिल्यापासूनच, १५ वर्षांचा असल्यापासून गाणी ऐकणे आणि पेटीवर वाजवायचा प्रयत्न करणे हा छंद होता.
हळुहळु त्यात रुची निर्माण होऊन त्यात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली, पण काही क्लास लावून शिकता आलं नाही.
कॉलेजच्या वयात काही कविता पण केल्या, काही चाली पण बसवल्या.
पण एवढी वर्ष ते त्या आवडीपुर्तच मर्यादित राहिलं...
५ महिन्यांपूर्वीच माझा कवी मित्र अनिल या बरोबर बसलो असता, त्याने त्याच्या काही कविता ऐकवल्या आणि मीही माझ्या काही कविता आणि चाली ऐकवल्या, दुधात साखर पडावी तसा दुग्धशर्करा योग घडून ती संध्याकाळ एका छोटेखानी मैफिलीत सजून गेली.
माझे आजोबा स्व. संगीत सुधाकर पंडित वि. दे. अंभईकर यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील एकही गोष्ट शिकू शकलो नाही याची खंत आहे, पण त्यांच्या कडून मिळालेली संगीताची देणगी आणि आशीर्वाद कुठेतरी जतन करायला पाहिजे असे वाटू लागले व सुरु झाला हा मनातील शब्द सुरांचा प्रवास.
मग काय सर्व साधनसामुग्रीची जुळवा जुळव केली आणि एक छोटा घरगुती कार्यक्रम केला, नाव फारसं शोधावं लागलं नाहीच कारण काय करायचं? काय म्हणायचं? हे स्पष्टच होतं.
जीवनात ज्या आठवणींवर बोलायचे होते, त्यातून आठवण घेतले आणि पुन्हा पुन्हा त्या येतात म्हंटल्यावर त्यात वारी जोडले.
त्यातून "आठवणीतली शब्द्वारी" हे नाव कार्यक्रमाला दिले...

कार्यक्रमातली एकेक गाणी..सादर करून त्यातल्या काही भागावर चित्रिकरण करुन जे शब्दापेक्षा चित्रातून बोलके होते आसे हळवे क्षण दाखविण्याचा राहूल आपटे यांना मनापासूप यत्न केला...

प्रत्येक सहभागी गायकाला रंगमंचावर बोलावून आपापल्या मतांची चाचपणी निवेदिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी चपखलपणे केली..
आटोपशीर पण संगीतकाराच्या विविध गाण्याची सुंदरता यातून प्रत्यक्ष अजमावता आली..
या अल्बमला रसिक दाद देतील अशी आशा आहे...


- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Saturday, January 2, 2016

आठवणीतली शब्दवारी..अल्बम गुरूवारी प्रकाशित होणार


दव धुक्याचे पानावरी
रंग तुझे मनावरी
मनमंदिरी साकारली
आठवणींची शब्दवारी...

असं सागून सुरवात करणारा नऊ नवीन गाण्यांचा संगीतकार राहूल आपटे यांचा ...आठवणीतली शब्दवारी ...हा अल्बम गुरूवारी ७ जानेवारीला टिळक स्मारक मंदिरात तरुणाईला प्रोत्साहन देणारे आघाडीचे लोकप्रिय संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.







राहुल आपटेंना आधी शब्दाचे वेड होते..त्यात ते स्वतः उत्तम पेटीवादन करतात .नवीन कवीतांना चाली लावून त्या रचना संगीतबध्द करण्याचा त्यांचा छंद जुनाच आहे. त्यातच या नव्या कवीची ओळख वाढली व सहवास लाभला, यातून दोघांनी याच नावाचा कार्यक्रम आपल्या खाजगी मैफलीत सादर करून त्याची पसंती आजमावली आणि आता आपटे यांनी स्वतः लिहिलेली ४  व अनिल बोरोलेंची ५ अशी या अल्बम मध्ये वेगवेगळ्या रसातील गीते घेऊन हा "एक वेगळा प्रयोग" करण्याचे धाडस केले आहे.






अल्बम प्रकाशनाचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून तो गुरुवारी रात्री ९ वाजता टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षगृहात आयोजित केला आहे. रसिकांना उपस्थित राहण्याची आग्रहाची विनंती आहे.






सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com

9552596276

Wednesday, December 30, 2015

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..



मंगेश पाडगावकर यांना समर्पित..

या जन्मावर प्रेम करावे असा आपल्या सुंदर..आयुष्यातल्या सर्व वळणार आनंदाने जगायला लागणारे ब आपल्या शब्दातून सर्वांच्या रसिकतेला सलाम करणारे ज्येष्ठ कवीवर्य मंगेश पाडगावकरांचे निधन झाले..
वाटेवरच्या प्रत्येक वळणावर पाडगावकरांची कवीता साथ करीत रसिकाच्या मनात रुंजी घालत होती..
मग ती लिज्जत पापडाच्या जाहिरातीत दरवर्षी हमखास भेटणारी असो वा श्रावणात बरसणा-या रिमझिम धारांनी तृप्त करणारी असो..

जगताना भान देणारी आणि जगायला बळ देणारी त्याची प्रतिभा सतत मराठी मनात कायम वास्तव्य करत राहिली..
केवळ कवीता करून ते थांबले नाहीती..ती रसिकाच्या मनापर्यत आपल्या शब्दांच्या भावनांनी बोलकी करत ते देशभर फिरले..त्यांच्या कवीता सादर करण्यातला वेगळेपणा शब्दातून सांगता येत नाही..तो अनुभवावाच लागेल.
शब्द त्यांच्या पुढे पुढे करत आणि त्यांना ते अगदी निवडक..वेचित मराठी मनाला संपन्न करत एकेक कवीता करत राहिले..
आता कितीही सूर लावून गायलेले गीत त्यांच्यापर्य़त पोचू शकणार नाहीत..कारण ते आपल्यातून कायमचे दूर निघून वेगळ्या प्रवासाला निघाले आहेत..


आपल्या पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा मारून त्यानी हा मृत्यूलोक सोडला. आता आपल्याला डोळ्यामधले आसू पूसून ओठांवर गाणे म्हणावे लागेल.
कारण ह्दयात दाटलेले सारे ह्दयातच राहिले आहे..आता बंद पापण्यांनी अश्रूत भिजवून त्यांची आठवण उरली आहे.
पाठीवर मायेने फिरणारा त्यांचा हात केवळ थरथरला नाही तो आता  उरलाच नाही ..असे झाले आहे.
आता अवती भवती न पाहता आकाशी पाहण्याचे आपल्या नशीबी असणार आहे.
तुमचे चित्र समोरून जाताना पाहण्याचे फक्त उरले आहे..
त्यांच्या शब्दात सांगायचे म्हणजे तू कुठेही जा...चंद्र माझा साथ आहे...गीत माझे घेऊन जा ..त्यात माझा प्राण आहे..म्हणत पाडगावकर गेले.

अंतरी कारूण्य असताना वेदनेची फुंकर घालीत त्यांची कवीता आपल्या सोबत आहे..त्यांचा तो आवाज माध्यमाच्या चमचमत्या लखलखाटात उरला आहे..ते शब्द आता आपली साथ करणार आहे..त्यातली वेदना..प्रेम, कारूण्य..तरलता सारे तसेच आहे..पण ज्या शरीरातून ही वेदनेची फुंकर घातली गेली ते शरीर आता उरले नाही..याचा खरे दुःख आहे..
आता नवल वर्तले..अंती देवाचिये पायी
ज्योत जळून काजळी उरलीच नाही...
ते पिंपळपान आता गळून गेले..नदीच्या काठचे गाणे विरून गेले..आता केवळ उरल्या स्म-ती..वेदना आणि हूरहूर..

त्यांच्या स्मृतीला सांस्कृतिक पुणेच्या वतीने विनम्र शब्दांजली..



-सुभाष इनामदार,
www.culturalpune.blogspot.com
9552596276

Wednesday, September 30, 2015

रसिक भारावले तिघींची नृत्यकला पाहून




मध्यंतरी तीन युवतींची नृत्यकला पाहण्याची संधी मिळाली..खरचं किती छान तयारी होती त्यांची.. आपल्या गुरुकडून भरतनाट्यमच्या सा-या प्राथमिक शिक्षणाच्या कला शिकल्यावर  गुरुंच्या म्हणजे नृत्यांजली संस्थेच्या प्रमुख सौ. अंजली गोखले-भाटवडेकर यांच्या परवानगीने  प्राजक्ता विवेक कुलकर्णी,चैतन्या चंद्रकांत जाधव आणि मुग्धा विजयकुमार पाध्ये यांनी पुण्याच्या बालशिक्षण मंदीरात आपला पहिला जाहिर कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम..सादर केले

आणि खरोखरीच रसिकांना नृत्यकलेतील निपुणतेचे दर्शन घडविले.

मलरी, अलारिपू, जातीस्वरम, दशावतार..आणि मध्यतरांनंतर पदम्, तिल्लीना, अभंग आणि मंगलम्..अशी एकापेक्षा एक तयार रचनेतून केलेले सादरीकरण पाहताना या कलेत किती एकाग्रचित्त झाल्या आहेत हेच स्पष्ट होत होते.

यातले तांत्रिकपण जरी फारसे समजले नाही तरी जे काही त्या सादर करीत होत्या त्याला ताल, लय आणि त्पातल्या पदन्यासाचे ते एकचित्त स्वरूप पाहताना त्यांचा अभिमान वाटतो..

अशा कला पारंपारिक पध्दतीने आजही सादर केल्या जातात..आणि या अधुनिक काळाचे आवरण असलेल्या
जमान्यातही पालक आपल्या कन्यकांना ती सादर करण्यासाठी परवानगी देतात याचे अधिक बरे वाटते.
तसे पाहिले तर ह्या सर्वच कला शिकण्यासाठी असणारी जिद्द आणि पराकाष्ठ्येची भक्ती यातून दिसून येते..
आपल्या गुरूवर असलेला अढळ विश्वासही याला कारणाभूत ठरतो..

यासर्वांना साथसंगत करणारी मंडळीही उत्तम होती...गायक मयुर महाजन, मृदंगवर शंकर नारायणन्, पखवाज- राजू जावळकर, व्हायोलिन- रमाकांत परांजपे, सिंथेसायझर- केदार परांजपे आणि निवेदनाची यथायोग्य बाजू सांभाळणारे रवीन्द्र खरे यांचाही उल्लेख नक्कीच करावा लागेल.

यासाठी सौ. निलिमा व विवेक कुलकर्णी, सौ. उमा व चंद्रकांत जाधव आणि सौ. सषमा व विजयकुमार पाध्ये या माता-पित्यांनाही धन्यवाद द्यावासा वाटतो..
यासाठी आर्थिक झीज तर होतेच..पण कलेतले प्राविण्य मिळविल्यावर ते अद्भूत  सादरीकरण पाहण्यातला अभिमान तिनही माता-पित्यांना धन्यतेकडे घेऊन जातो..

अतिशय मृदु आणि निगर्वी अशा गुरु सौ. अंजली भाटवडेकर यांचे गोडवे गावे तितके कमी पडतील..
त्यांनी या तीनही कलावतींना देखणे रुप प्राप्त करुन कलेतील साधना एकाग्रतेने शिकण्याची जिद्द निर्माण केली...

पुढील काळात  त्या तीनही कलावती उत्तम नृत्यकलानिपूण होतील आणि आपल्या गुरूंचे, आई-वडीलांचे आणि भारतीय संस्कृतीचॉी महती पुढे उत्तमरित्या जपतील यात शंका नाही..त्यांना खूप सा-या शुभेच्छा.



-सुभाष इनामदार, पुणे

Saturday, April 18, 2015

....त्या फुलांच्या गंधकोषी

मिलिंद रथकंठीवार यांच्या ई-बुकचे प्रकाशन आणि त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद



अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर रविवारी  १८ एप्रिलला...एका नव्या लेखकाच्या नव्या कादंबरीचे ईबुक आनंदाचे पासबुक लिहिणारे साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले..त्यानिमित्ताने लेखकाशी संवादाचा खास कार्यक्रम विनया देसाई यांच्या प्रश्नातून उलगडत गेला..
महाराष्ट्र बॅंकेच्या पर्वती शाखेत पैशाची देवाण घेवाण करणारा हा लेखक म्हणजे मिलिंद रथकंठीवार...अभिवाचक, गायक, चित्रकार..आणि कादंबरीकार..म्हणजे साहित्यिाकाच्या कोषात मोडणारा आसा हा हरहुन्नरी माणूस...

शब्दांचे व्यसन लागले की ते तुम्हाला त्यातच गुंगवून ठेवते..तसे त्यांचे झाले..या फुलांच्या गंधकोषी..या पुस्तकातून एक निरागस ..प्रेमाची उदबोधक कहाणी लेखकाने मांडली आहे...त्या व्यक्तिरेखेतले प्रेम खोलवर माणुसकीचा झरा दाखविणारे उक्तट ..नितांत सुंदर आमि सात्विक आहे..निर्मळतेतून ती कादंबरी फुलत जोते..अखेरीस नायिकेला आपले मरण समोर दिसत असतानाही ती आपल्यातला हा प्रमाचा झरा पाझरू देत नाही..अशी काहिशी या कादंबरीचा कथा आहे..

या कादंबरीवरुन मानिकाही बनण्याच्या मार्गावर आहे..त्यातली गीते कवी जयंत भिडे यांनी लिहली आहेत..भिडे यांच्या मते अतिशय तरल अशी ही प्रेमकहाणी लेखकाने यातून मांडली आहे..त्यातले प्रसंग अगदी खरे घडलेत असे वाटतात...म्हणूमन मला भावगीताच्या धर्तीवर आधारित गीते सुचली..


नव्याने प्रेरणा घेऊन लिहलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनाकरीता  तेजल प्रकाशनाने आपले दार उघडे करुन त्यात  रथकंठीवार यांच्यासारख्या नविन लेखकाला प्रोत्साहित केले..
या निमित्ताने पुस्तकातील काही भागाचे आणि गीतांचे सादरीकरण केले गेले..हे पुस्तक वाटण्याची उस्तुकता तुमच्या प्रमाणेच मलाही आहे..हे निश्चित..




- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 27, 2014

सत्यदेव दुबेेंचे नाटकवेड दाखविणारा प्रभावी आविष्कार


इन्शाअल्ला

सत्यदेव  दुबे एक अफलातून नाटकासाठी जगलेला माणूस..मी तो माणूस आज ख-या अर्थाने अनुभवला..पुरेपुर..सुशिल इनामदार यांच्या अभिनयातून..दुबे वावरले..बोलके झाले..काही गोष्टी नव्याने समजल्या..काही अंगावर आल्या,,, पुण्याच्या भरत नाट्य मंदिरातला २७ डिसेंबरच्या संध्याकाळी  झालेला हा प्रयोग मला न कळत माझ्यावर परिणाम करुन गेला..तो असा..
पण जे उमजले ते हे ..त्यामाणसाने स्वतःला कधीही विकले नाही..आपल्या मस्तीत जगले..रमले..इतरांना रमविले..जे आले त्यांना घेऊन..जे गेले त्यांना शुभेच्छा देऊन..नाट्ययज्ञ त्यांनी जसा मांडला तो आविष्कार चेतन दातार यांचाया लेखनातून उलगडत गेला..

पहिल्या अंकातील भावभावनांचा आणि प्रसंगांचा प्रायोगिक नाटकांचा त्यांचा अभ्यास एकेका प्रसंगातून दिसत गेला..ती उत्कत प्रतिभा जर प्रेक्षकांमनध्ये नसली तर तायंना ते कळणार नाही..काय हे नाटकवाले करताहेत असा बोल लागले..म्हणूनच काही गाष्टी अॅबसर्ड वाटल्या ..त्या कळत नकळत डोक्यावरुन गेल्या..पण दुसरा अंक दुबेंचे खरं जीवन उलगडणा-या होत्य़ा....तिथे फक्त दुबे होते..दुबे यांच्या मनातली ती नाटकाविषयी कलेविषयीची ओढ किती खोलवर रुजली होती याचे हे प्रतिबिब पूर्णपणे इथे  प्रतित होत होते...नटांनी विषेषतः सुशिल इनमामदार यांनी तो सर्वेश्वर फारच ताकदिने होत गेला..इथे एकसुरी होण्याची संधी होती..पण त्यांनी तो बोली आमि शारीरीक अभिनयाच्या छटातून असे काही स्वतःला बोहर काढले की त्यांच्यातला नट सतत खुणावत रहातो..नटाची शैली..त्याची ताकद आणि सभोवताल घेऱून ठेवण्याची त्यांची भाषा...केवळ अप्रतिम...

नाटक झाल्यावर दुसरा अंक माझ्या सौ.ला फारच आवडला..त्यातल्या सुशिल इनामदारांच्या कामावर तर त्या बेहद्द खुष झाल्य़ा...मना त्यांनी केलेले काम पाहता नटसम्राट आठवला..असे म्हटले..मला ते अदिक जास्त मोलाचे वाटले.
अजित भगत यांनी ते फारच अंगावर येईल इतके उत्कटपणे कलावंतांच्या माध्यमातून साकारले..






चिन्मय-निनाद यांनी दिलेली संगीताची भाषा नाटकाला अधिक बोलती करुन गेली..खरं म्हणजे ज्यांनी दुबे पाहिले नाहीत त्यांना दुबेंचे विलक्षण झपाटलेपण कळेल...त्यांनी अंतीम क्षणापर्यंत सोबत केली..पण तो क्षण ते स्वतः अधुरेपण सतत आपल्याजवळ ठेवत..नाटकात म्हटल्याप्रमाणे चारआणे आपल्या मुठीतून सुटून दिले नाहीत. ते नाणे त्यांनी घट्टपणे आपल्याजवळ सांभाळले..ते आपल्याबरोबरच इन्शाअल्ला..करत स्वतः बरोबरच घेऊन गेले..

त्यांच्या स्त्री अभिनेत्रींच्या कथा इथे दिसतात..काही वेळा त्यांचे बिनधास्त बोलही ऐकावे लागतात..पण त्यांच्या मनस्वी स्वभावाला सारे काही चिकटून आले आहे..
सतत नाटक..नाटकाविषयक...आणि शेवटी तर सुदाम्याच्या तोंडून त्या कृष्ण लिला ज्या उत्कटतेने सादर झाल्या..तिथे ते सारे खोटेपण जळून गेले..उरले ते खरं..अस्स्ल खणखणीत नाणे..ज्यांने अनेक शिष्य घडविले..नाट्यचळवळ उभारली..रंगभूमिवर काळ्या पडद्यावर सफेद जग उभे केले...इथेही त्याचे दर्शन सुशील इनामदार यांच्या परिपूर्ण वाचिक, आंगिक आणि उत्तम अभिनयातून घडले..
सर्वेश्वर सोबत देवेंदर- गौतम बेडं आणि गुलन- मृणाल वरणकर यांच्या भूमिकांची दाद द्यावीशी वाटते..मोनिलिसा विश्वास, संजाना हिदुपूर,सुदेश बारलिंगे या नटांच्या भूमिकाही उत्तम बळ देऊन नाटकात प्राण ओतीत गेल्या..
मला व्यक्तिशः देवेंद्रर मध्ये अच्युत पोतदार आणि सर्वेश्वरमध्ये विजय केंकरे यांच्या व्य़क्तिमत्वाची झलक दिसली..ज्या उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे आविष्कारने ही कलाकृती घडविली यात सत्यदेव दुबेंसारखा नाट्यअभ्यासक अधिक ठळकपणे समोर दिसला..नाटकाविषयीची अत्यतिक ओढ आणि आवड...हिच त्यांची वैयक्तिक ओळख होती..ती इथे जपली गेली..

मला व्य़क्तिशः सत्यदेव दुबे दिसले..भासले..अंगावर आले..अगदी त्यांच्या गुण-दोषांसह..रंगभूमसाठी जगणरा हा वेडा माणूस...त्यांच्या स्मृतीला खरंच इथे आकार मिळाला आहे...पुढच्या पिढीला  अगदी ज्याने दुबे पाहिले नाहीत..त्यांना तो माणूस आणि त्यांत असलेला नाट्यवेडाने झपाटलेला माणूस स्पष्ट दिसेल.



या नाटकाला रसिकांची हजेरी वाढली...एका वेड्या नाट्यजीवनाची कहाणी अधिक लोकांपर्य़त पोहोचली तर ही आविष्कारच्या अरुण काकडे यांनी केलेली तळमळ  सार्थकी लागेल..ज्यांना कुणाला शक्य असेल त्यांनी हा प्रयोग जिथे असेल तिथे पहावा एवढीच विनंती



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276