राहूल सुधीर आपटे नावाच्या तरुणाचा आठवणीतली
शब्दवारी..एक सुरवात...
राहूल सुधीर आपटे नावाच्या तरुण संगीतकाराचा आठवणीतली शब्दवारी..एक सुरवात...या नावाचा मराठी
संगीतातला नवा अल्बम गुरुवारी ७ जानेवारी १६ ला टिळक स्मारक मंदिरातल्या
उपस्थित सुह्रुदांच्या साक्षीने जेव्हा
आजच्या पीढीचे संगीतकार म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो..त्या डॉ. सलील
कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशीत झाला तेव्हा माझ्यामनातील भावना अशा श्बदातून व्यक्त झाल्या..
अनिल विठ्टल बोरोले आणि राहूल सुधीर आपटे या गीतकारांचा
ही पहिली निर्मिती.आजपर्य़त ते दोघे जोडीने सगळीकडे दिसत गेले..पुढेही ही जोडी कामय
राहून पुन्हा नव्या अल्बमची सुरवात ते करतील याची खात्री आहे..
आजपर्य़त आपण कुठल्याही अव्बम किंवा सीडी प्रकाशनाच्या
समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो नाही..मात्र या दोन कवी आणि संगीतकार राहूल
आपटे यांच्या या संगीतात नवे कांही करु पाहणा-या तरुणांच्या प्रयत्नाला दाद
देण्यासाठी आलो..मीही काही वर्षापूर्वी अशाच धावपळीच्या लगबगीतून इथे गेलो आहे..ही
वेळ फार चांगली आणि धाकधुकीची असते..तुमच्या या प्रामाणिक प्रयत्नाला खूप
शुभेच्छा..आता वारी सुरुच केली आहेच..पण आता थांबू नका...वारी निघाली आहे..ती
पंढरपूरला पोहोचणार आहे...मात्र आता सतत काही ना काही करत रहायचे आहं..तुमची हि
सुरवात आहे...पुढे पता का घेऊन चालत रहा..
असा मोलाचा सल्ला डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिला..
आपल्या वाटचालीविषयी राहूल आपटे सांगतात..गीताची आवड
पहिल्यापासूनच, १५
वर्षांचा असल्यापासून गाणी ऐकणे आणि पेटीवर वाजवायचा प्रयत्न करणे हा छंद होता.
हळुहळु त्यात रुची निर्माण होऊन त्यात वेगवेगळे प्रयोग
करण्यास सुरुवात केली, पण काही क्लास लावून शिकता आलं नाही.
कॉलेजच्या वयात काही कविता पण केल्या, काही चाली
पण बसवल्या.
पण एवढी वर्ष ते त्या आवडीपुर्तच मर्यादित राहिलं...
५ महिन्यांपूर्वीच माझा कवी मित्र अनिल या बरोबर बसलो
असता, त्याने
त्याच्या काही कविता ऐकवल्या आणि मीही माझ्या काही कविता आणि चाली ऐकवल्या, दुधात
साखर पडावी तसा दुग्धशर्करा योग घडून ती संध्याकाळ एका छोटेखानी मैफिलीत सजून
गेली.
माझे आजोबा स्व. संगीत सुधाकर पंडित वि. दे. अंभईकर
यांच्याकडून शास्त्रीय संगीतातील एकही गोष्ट शिकू शकलो नाही याची खंत आहे, पण
त्यांच्या कडून मिळालेली संगीताची देणगी आणि आशीर्वाद कुठेतरी जतन करायला पाहिजे
असे वाटू लागले व सुरु झाला हा मनातील शब्द सुरांचा प्रवास.
मग काय सर्व साधनसामुग्रीची जुळवा जुळव केली आणि एक छोटा
घरगुती कार्यक्रम केला, नाव फारसं शोधावं लागलं नाहीच कारण काय करायचं? काय
म्हणायचं? हे
स्पष्टच होतं.
जीवनात ज्या आठवणींवर बोलायचे होते, त्यातून
आठवण घेतले आणि पुन्हा पुन्हा त्या येतात म्हंटल्यावर त्यात वारी जोडले.
त्यातून "आठवणीतली शब्द्वारी" हे नाव
कार्यक्रमाला दिले...
कार्यक्रमातली एकेक गाणी..सादर करून त्यातल्या काही
भागावर चित्रिकरण करुन जे शब्दापेक्षा चित्रातून बोलके होते आसे हळवे क्षण
दाखविण्याचा राहूल आपटे यांना मनापासूप यत्न केला...
प्रत्येक सहभागी गायकाला रंगमंचावर बोलावून आपापल्या
मतांची चाचपणी निवेदिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी चपखलपणे केली..
आटोपशीर पण संगीतकाराच्या विविध गाण्याची सुंदरता यातून
प्रत्यक्ष अजमावता आली..
या अल्बमला रसिक दाद देतील अशी आशा आहे...
- सुभाष
इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
Check all the songs here...
ReplyDeletehttps://www.youtube.com/watch?v=EiJYIxe7w4U&index=16&list=PLHmg-eK6ZfMvkJhyBQNyh2EpWllIveSdh