नाट्यसृष्टीची गेली
४०
वर्ष
करणारे
भरत
नाट्य
मंदिराचे
पडद्यामागचे
कलावंत
विठ्ठल
नामदेव
हुलावळे
यांना
शुक्रवारी
२३
डिसेंबरला
दिवंगत अभिनेतेआनंद
अभ्यकंर
यांच्या
नावाने
दिला
जाणारा
आनंदरंग
पुरस्कार
ज्येष्ठ
नाट्यकलाकार
नीना
कुलकर्णी
यांच्या
हस्ते
पुण्यात
पत्रकार
संघात
एका
कार्यक्रमात
दिला
जाणार
आहे..त्यानिमित्ताने
कट्यार काळजात घुसली या
नाटकाचे नेपथ्य़ नाट्यसंपदा सारख्या
संस्थेचे होते..रंगमंचावर प्रथमच फिरत्या
रंगमंचाचा वापर केला गेला होता.. त्याबरहुकूम
नेपथ्य़ पुण्यात भरत नाट्यमंदिरात
तयार केले गेले..योग्य वेळी तो
फिरता रंगमंच हालायलाच
हवा..ते काम
पदड्यामागे समर्थमणे सामंभाळणारे जे
काही पदड्यामागचे कलाकार
होते..त्यात विठ्ठल
हुलावळे हे आघाडीवर
होते...नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे
यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि
य.मु वैद्य
यांच्या मार्गदर्शनाने ती करामत
आमचे त्यावेळचे सारेचजण
चोख बजावत.,.
हा काळ सुमारे
१९७७ असावा..त्यापूर्वी
म्हणजे शांकुंतल आणि शारदा
या नाटकाच्यावेळी पडद्यामागे
हा विठ्ठल सतत
झटत असायचा..उत्साह
तसाच..उमेद आणि
जिद्द या त्रिगुणी
स्वभावाने भारलेला बॅकस्टेज कलाकार
आणि भरत नाटय्
मंदिर यांचे समीकरण
१९७४च्या आधीपासून जमलेले..
खरे म्हणाल तर भरतचे
नाटक अगदी
आजही विठ्ठलच्या हातभाराशिवाय
पूर्ण होत नाही..ही अतिशयोक्तिची
गोष्ट नाही..
अनेक लोकांची नावे माहिती
असतात..पण तो
कुठला, काय करतो,
घरगूती परिस्थिती कशी यांची
अनेक कलावंतांना वार्ताही
नसते..त्यातलाच तो
एक..विठ्ठल.. त्याला
त्याच नावाने सारे
लोक हाक मारित...
पुढे पुढे दत्तोबा
मिस्त्री, विठ्ठल हुलावळे ही
त्यांची पूर्ण नावे कानावर
आली..पण ती
सतत वापरली जात
नव्हती आजही नाहीत.
नेपथ्याची मांडामांड कशी करायची
ते कोणते नेपथ्य
तुम्हाला योग्य शोभेल यांची माहिती`
विठ्ठल` शिवाय भरत मध्ये
दुसरा फारसा कुणी
जाणकार नसायचा..ही जाणकारी
इतकी वाढत गेली
की स्पर्धेच्या नाटकांपासून
ते अगदी पुरूषोत्तम
करंडकाच्या एकांकिका पर्य़ंत या
पदड्यामागच्या कलावंताचे नाव सर्व
कलाकारांच्या तोंडी झाले..आजही
आहे...पुरुषोत्तम आणि
स्पर्धेच्या नाटकात काम करणारे
कलावंत हौशी त्यांची
पुढे नाटकातली एंट्री
कमी होत गेली..पण मोठमोठ्या
हुद्यावर काम करणारे
अनेक कलावंत आजही
या कलावंतांना स्मरणात
ठेऊन आहेत..हे
विशेष.
विठ्ठलला कालवंत म्हणायचे यासाठी
की तो केवळ
पडद्यामागचा भाग सांभाळतो
असे नाही तर
कांही नाटकात तर
तो छोट्या भूमिकाही
करतो.. मला आठवते
ती कट्यार मधला
बद्रिप्रसाद..आणि इतरही..
तसा हा विठ्ठल
मूळचा पिरंगूटजवळच्या गावचा...तिथे त्याची
शेतीही आहे..नांगरणी,पेरणीसाठी तो आजही
घरी जातो.
.त्याला
पगार तो कीती..त्यात कसे भागायचे..म्हणून त्यांने महापालिकेतले
माजी अधिकारी आणि
पीडीएचे जुने कलावंत
श्रीपाद आडकर यांच्या
प्रभात रस्त्यावरच्या घरातली दोन चाफ्याची
झाडे वार्षिक करार
करून मिळविली..आणि
आणि गेली २५ वर्षे आज
आडकर नसले तरी
त्यांच्या मुलाच्या काळातही पहाटे ऊठून झाडावरीची
फुले काढून भरतच्या
समोर ती विकायचा
जोड उद्योग त्याने सुरु ठेवली आहे.. त्याला काही काळ
त्याच्या मुलानेही हातभार लावला..पण तोही
आता आपल्या स्वतंत्र उद्योगाला लागला आहे.
पत्नीच्या अकाली निधनानंतर तसा
तो एकाकी पडला..मुलीच्या लग्नानंतर मुलाचा
आणि आपला प्रपंच
तो उत्तम सांभाळतो..जावयांची साथही त्याला
चांगली मिळाली..
पण स्वावलंबी स्वभाव. कष्टाची
सवय आणि प्रामाणिक
वृत्ती यामुळे आजही भरतच्या
पगारावर त्यांची गुजराण सुरू
आहे..
अनेक कलावंतांच्या तोंडात त्याचे नाव
आजही असते..ते
त्याच्या या उत्तम
वर्तनाने. नाटकाचा सेट लावाय़ला
आजही तो तेवढ्याच
उत्साहाने पुढे असतो..भरत नाट्य
मंदिराचे प्रयोग जिथे जिथे
होतील तिथे हा
विठ्ठल कायम कटेवर
हात ठेऊन कामासाठी
ऊभा दिसेल..
आपली खासगी नोकरी सांभाळून
त्याने संस्थेच्या अनेक पदाधिका-यांचा विश्वास संपादन
केला आहे..अनेकांच्या
अडचणीला धावूनही गेला आहे.त्याची ही निष्ठा
आणि कार्यतप्तरता पाहून
नाटयपरिषद( मुंबई), सिंबयोसिस आणि
बारामतीच्या नाट्यसंमेलनातही विठ्ठल नामदेव हुलावळे
यांचा सत्कार केला
गेला.
आज आनंद अभ्यंकरच्या
नावाचा पुरस्कार मिळून तो
अधिक समाधानी झाला
आहे..
अशी अनेक अंधारात
वावरणारी माणसे आहेत..जी
उजेडात दिसणा-या कलावंतांच्यामागे
सावलीसारखी उभी असतात..खरं तर
असा असंख्य कलावंतांचा
प्रातिनिधि म्हणूनच या विठ्ठल
नामदेव हुलावळे यांना पुरस्कार
प्रकाशात स्विकारताना
साठीच्या आसपास असलेल्या
त्याला आपण सारे त्याच्या पाठीवर शाबासकीची
थाप देऊ या.
- सुभाष इनामदार पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment