रंगशारदेच्या
दरबारात
आजही संगीत नाटकातली
पदे ऐकायला रसिक उत्सुक असतात..आणि तेही नाटककार-पत्रकार आणि साहिंत्यिक विद्याधर
गोखले यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहारदार पंदांची बरसात होत असेल..तर निवारा
वृद्दाश्रमाचे पुण्यातले सभागृह गुरुवारी ६ नोव्हेंबर २०१४ ला टाळ्यांच्या आनंदात
त्या पदांचे स्वागत करते..वन्समोअरचा गलाकाही करते... आणि त्यातही आपल्या आवडीच्या
लेखकांची स्मृती जपताना नव्या-जुन्यांच्या या संगमातून नव्याने काही कलावंत आजही
ती पदे शिकतात आणि उत्तमरित्या सादर करताहेत..हा एक नजाराही इथे पहायला मिळाला.
पूर्णब्रम्ह...या किल्लेदारांच्या
परिवाराच्यावतीने विद्याधर गोखले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आपल्या २२ व्या
वर्षातल्या पदार्पणाचे निमित्ताने नीला किल्लेदार यांनी लोकसत्ताचे माजी संपादक
आणि संगीत नाटकातून संस्कृती आणि संस्काराची उत्तम पेरणी करणारे नाटकाकार विद्याधर
गोखले यांच्या पदांची निवड केली...गोखले यांच्या कन्यका सौ. सुनंदा दातार यांचा
सन्मानाने सत्कार करून ही मैफल रसिली करुन सोडली. स्वतः किलेलेदारांनीही (पुणेकरांच्या पोटापाण्यासाठी सुग्रास अन्न
पुरविले आहे).. सुरगंगा मंगला हे जय जय गौरीशंकर नाटकातले पदही सादर केले.
त्यांच्या अभ्यासू
लेखणीच्या स्पर्शाने आपल्या आयुष्यात अनमोल असे क्षण आल्याचे त्यांच्या सर्वच
नाटकात भूमिका केलेल्या मधुवंती दांडेकर यांनी आवर्जुन सांगितले..आणि आपली
नाट्यपदेही रंगविली..शैली मुकूंद यां अभ्यासू निवेदिकेने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट
झाली नसतानाही..त्यांच्या साहित्याचा नाटकांचा अभ्यास करुन शैलीदार शब्दातून .गोखले आण्णांचे पैलू उलगडत
नेत बहारदार असा पदांना खुमासदार वाणीत गायकांना गाते केले..
स्वतः मधुवंती
दांडेकर या तर गोखले यांच्या नाटकातून भूमिकाही करीत होत्या...रविंद्र कुलकर्णी
यांनीही त्यांच्या काही नाटकातून भुमिका करुन त्या पदांची ओळख आधीच करुन घेतली
आहे..पण मंगला चितळे यां भजनांचे..भक्तीगीतांचे संस्करण करतात...पण त्यांनीही या
वयात गोखलेंच्या नाटकातली काही पदे इतकी सुंरेल आणि ओघवती सादर केली की खरे तर
त्यांच्याबद्दल खूप काही सांगावेसे वाटेल..आजही त्यांच्यासारख्या गायकांनीही ती
म्हणाविशी वाटतात..आणि पेलता येतात..यातच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे..पदातले
शब्द आणि नाटय्रदांना आवश्यक असणारी लयदार तानही त्यांनी उत्तमप्रकारे आपल्या
गळ्यातून रसिकांसमोर सादर करुन स्वतःबरोबरच त्यांनाही आनंद दिला..
जय जय गोरीशंकर,
सुवर्णतुला, मंदारमाला, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजीरी अशा लोकप्रिय झालेल्या
विद्याधर गोखले यांच्या नाटकांची तसेच वसंत देसाई, छोटा गंधर्व, प. राम मराठे
यांच्या संगीताने संपन्न झालेल्या पदांची पुन्हा आठवण नाट्यसंगीत जाणणा-या
रसिकांना करुन दिली. खरं तर काळाच्या ओघात
ही संगीत नाटके केवळ होशी संच कधीमधी सादर करतो..काही प्रमाणात.
स्वरसम्राज्ञी..शिलेदार सादर करतात..पण बाकी नाटके काळाच्या या गतीमान संगीताच्या युगात
विसरुन जाऊ लागली आहेत..अशा कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा ही संगीत नाटके ज्यांना
किर्लोस्कर..देवल..खाडीलकर..यांच्या परंपरेचे पंख आहेत..ती पाहण्याची उस्तुकता
निर्माण होते...मधुवंती दांडकर, रविंदर् कुलकर्णी आणि मंगला चितळे यांनी ती सारी
पदे रसरसून गायली...त्यातली सूरभाषा आणि शब्दातले सोंदर्य जसेच्यातसे नव्हे काकणभर जास्त सुंदर नटविले...ही सारी पदे
रसिकांना आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे या कार्यक्रमाला लाभलेले साथीदार,.,.
निलिमा राडकर (व्हायोलीन)..माधव मोडक (तबला) आणि संजय गोगटे यांची ऑर्गनवरची
साथसंगत..त्यांच्यामुळे पदांना साग्रसंगीत आणि तालसंगत सूर लाभले..
विद्याधर गोखले
यांच्यावरच्या नाट्यपदांच्या अशा कार्यक्रमांना इतर शहरातही दाद मिळेल..हाच संच
तिथल्या रसिकांनीही आवडेल..याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत...आणि गोखले
यांच्या नाटकांचे पुनरूज्जीवन होऊन..एखादी सुनिल बर्वे ( ज्याने हार्बेरियमच्या
माध्यमातून जुन्या नाटकांचे संदर प्रयोग सादर केले) इथेही पुढे यावा आणि अशा
नाटकांची वेळेच्या मर्यादा ओळखून रंगावृत्ती करुन ही नाटके पुन्हा प्रेक्षकांना
सुंदर नेपथ्यातून दाखविल अशी अपेक्षा
करतो..
पुन्हा एकदा
किल्लेदार परिवारला गोखले यांच्या नाटकातली पदांची रंगत आणि त्यानाटकाल्या उत्तम
नाट्यगीतांना रसिकांसमोर आणले याबद्दल मनापासून धन्य़वाद देतो...त्याबद्दल आनंद
व्यक्त करतो..आणि इतरत्रही अशीच दाद मिळेल असा विश्वास देतो.
-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
No comments:
Post a Comment