श्री गणेशोत्सव
मंडळातर्फे सतारवादक समीप कुलकर्णी आणि जलतरंगवादक मिलिंद तुळणकर यांची जुगलबंधी युनायटेड वेस्टर्न सभागृहामध्ये जोरदार रंगली. पाण्यावर उमटणारे सुरांचे तरंग आणि २० तारांमधून
उमटणारे सतारीचे सूर यांची सांगड भारतीय शास्त्रीय संगीतातून घालण्याची
वेगळ्या प्रकारच्या कार्याक्रमाची संकल्पना समीप कुलकर्णी यांची होती.
कार्यक्रमाची सुरुवात जलतरंगवर
राग किरवाणी मधील एका रचनेने झाली. त्यानंतर नुकताच जपान दौरा गाजवून आलेल्या समीप कुलकर्णी यांनी राग यमन मध्ये शांत व मनमोहक
आलापीने रसिकांच्या मनाच्या तारा छेडल्या. त्यानंतर सतार व जलतरंग या दोन्ही वाद्यांवर जोड आणि
झाला दोघांनी एकत्र वाजवला. त्यानंतर दोघांनी ताल रूपक, मध्य तीनताल, द्रुत तीन ताल आणि अति द्रुत तीनताल मध्ये चार बंदिशी सादर केल्या.
सूर आणि तालावरील
कमालीच्या प्रभुत्वाची रसिकांना अनुभूती आली. कुलकर्णी यांची ही ६३२ वी मैफिल होती, भारताबरोबर या आधी
अमेरिका, युरोप, जपान, सिंगापूर, थायलंड,
जपान अशा अनेक देशात त्यांनी मैफली गाजवल्या
आहेत.
व्यवसायाने आयटी इजीनियर असलेल्या कुलकर्णी यांनी हॉलीवूडच्या दोन
चित्रपटात वादन पण केले आहे.
तुळणकर यांनी भारत, कॅनडा, अमेरिका, दुबई अशा अनेक देशात
सतार व जलतरंगच्या जुगलबंधीचे कार्यक्रम गाजवले आहेत.
राग यमनमध्ये सतारीवर 'जब दीप चले आना', 'आज जाने कि जिद ना करो', 'जिंदगी के सफर रंग लाते है' अशा हिंदी गीतांनी कार्यक्रमामध्ये रंगत आणली.
कार्यक्रमाचा शेवट समीप कुलकर्णी यांनी राग दरबारी मध्ये
फ्युजन सादर
करून केला.
कार्यक्रमाला तबल्याची साथ गणेश तानवडे आणि ड्रम्सची साथ योगेश वाघ यांनी केली.
No comments:
Post a Comment