subhash inamdar

subhash inamdar

Thursday, June 28, 2012

संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम


नाट्यसंगीताला 'लाइव्ह म्युझिक ट्रॅक'ची जोड देऊन अभिनव प्रयोग करणाऱ्या युवा संगीतकार गंधार संगोरामने आता जागतिक संगीतविषयक 'मिंड' या इंग्रजी ई-मॅगझिनचा उपक्रम हाती घेतला आहे. या मॅगझिनचा पहिला अंक जुलैमध्ये सादर केला जाणार असून, दर महिन्याला हे मॅगझिन ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. भारतीय संगीताबरोबरच जागतिक स्तरावरील संगीतक्षेत्रामध्ये होणारे प्रयोग सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.

सध्याच्या तरुणाईला भारतीय संगीताबद्दल जगभरातील संगीताबद्दलही तितकेच आकर्षण असून, संगीतामध्ये होत असणारे प्रयोग, बदलते तंत्रज्ञान, नवे संगीतकार, त्यांच्या रचना आदींबाबत तरुणाईमध्ये कुतुहल आहे. या सगळ्याबद्दल दजेर्दार माहिती देऊ शकेल असे मॅगझिन आपल्याकडे उपलब्ध नाही, ही उणीव लक्षात घेऊन गंधार संगोरामने ई-मॅगझिनचा उपक्रम सुरू केला आहे.



या उपक्रमाविषयी-

भारतामध्ये संपूर्णपणे जागतिक संगीताला वाहिलेले एकही मॅगझिन उपलब्ध नाही. बऱ्याच मॅगझिन्समध्ये संगीतकारांविषयी, वादकांविषयीची माहिती असते; मात्र संगीताविषयी गांभीर्याने कोणीच बोलत नाही. एका अर्थाने उत्तम दर्जाच्या संगीत समीक्षेची उणीव आहे. तरुण कलाकारांना जागतिक स्तरावरील संगीताविषयी नक्कीच कुतुहल आहे, त्या स्तरावरील संगीताविषयी जाणून घ्यायची इच्छा आहे; मात्र त्याबाबत परिपूर्ण माहिती मिळत नाही. या मॅगझिनमधून संगीतकार, वादक, तंत्रज्ञान, सांगीतिक प्रयोगांबरोबरच त्याच्या दर्जाविषयी विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

No comments:

Post a Comment