उद्याच्या पीढीचा कणखर पाया
पुण्याच्या रसिकांसमोर कार्यक्रम करण्याचा योग हा नक्कीच सुयोग असतो..पुणेकर कलावंतावर, कलेवर प्रेम करतात. तितक्याच तन्मयतेने ऐकतात. म्हणूनच नेहमीच त्यांना वादन ऐकविताना आपल्या बेहद खुशी मिलती हे.... एन. राजम
मित्र फाउंडेशनच्या वतीन २१ ऑगस्टची सकाळ
संगीत प्रेमी एन. राजम यांचे व्हायोलिन एकायला उत्सुक
आपली नात रागिणी शंकर हिच्यासह त्या रंगमंचावर येतात तेव्हा रसिकांना हा मानाचा मुजरा करतात..अगदी सहजपणे त्या पुणेकर श्रोत्यांसमोर बोलत्या होत्या..
ते त्यांच्या रसिकतेची दाद घेतच.
आज मेरे साथ मेरी नतनीया( नात) रागिणी शंकर मुद्दाम आली आहे. हे सांगताना आपल्या घराण्याची परंपरा उलगडून बोलतात.. आमच्या घराण्यात मुले ३ वर्षाची झाली की हातात व्हायोलिन देतात. हळू हळू ती शिकत जातात.. खेळ खेळ म्हणून ते वाद्य वाजवायला शिकतात.. रोज किमान अर्धा-पाऊण तास ते वाद्याशी रियाज करतात.. स्वर.राग ताल यांचे नातू हळू हळू वयाबरोबर समृध्द होत जाते. रागिणीपण तशीत वयाच्या सातव्या वर्षापासून कार्यक्रम करायला लागली आहे...
रागिणीच्या तयारीच्या वाजविण्यात ती आजीच्या बरोबरीने साथ करत गेली हेच शिक्षण समृध्दतेकडे जात आहे...याची जाणिव पुणेकर संगीतप्रेमींना झाली..
मित्र फाउंडेशनच्या या मैफलीत तिच्या वादनाला जागोजागी टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली. आजी एन राजम यांच्या चेह-यावरचे कौतूकही स्वरमंचावर जाणवते होते..
मित्र फाउंडेशनच्या वतीने दरमैफलीत एका ज्येष्ठ कलावंताचा सन्मान केला जातो. आज केला तो ज्येष्ठ तबलावादक पं. विनायक थोरात यांचा. त्यांना १०,००१ रूपये आणि सन्मानभेट देउन एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रत्येक कलाकार ही परमेश्वरी देणगी आहे. ते घडतात परमेश्वराच्या कृपेने हा ठाम विश्वास बाळगणा-या या बुजुर्ग कलावंताला रियाजातून आपण तयार झाल्याचे सांगावेसे वाटते. संगीत हे व्हिटॅमीन आहे. ते शेवटपर्यत मिळो हिच त्यांची इच्छा सत्कार स्विकारताना त्यांनी बोलून दाखविली.
याच वेळी ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिनीस्ट प्रभाकर जोग यांना ८० व्या वर्षात पदापर्णाच्या निमित्ताने एन. राजम यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मैफलीची सुरवात अहिरभैरव रागाच्या सुंदर मांडणीतून एन राजम यांनी केली. मग भजन आणि घेई छंद हे नाट्यगीत सादर करून आपल्या सुरेल, सुस्वर आणि लालित्यपूर्ण वादनाचा साक्षात्कार घडविला.
उद्याच्या पीढीचा कणखर पायाही किती भक्कम तयार झाला आहे याचे दर्शनही रागिणीच्या रुपाने त्यांनी रसिकांसमोर पेश केले.
सुभाष इनामदार, पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment