आदिमानवापासून ते ' आयटी ' च्या लाटेवर ऐटीत जगणाऱ्या आधुनिक मानवापर्यंत स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोषांवर बोट ठेवत केलेले व्यंग कायमच मामिर्क विनोदाचे उगमस्थान ठरते . आणि अशा विनोदामधून निर्माण झालेली हास्यगंगा कधीही आटत नाही ...
... कधी गावाकडच्या चावडीवर , देवळातल्या पारावरच्या गप्पांमधून , तर कधी विडंबन , उपहास , अतिशयोक्ती या अस्त्रांचा वापर करीत पोट धरून हसण्यास लावणारे द . मा . मिरासदार ' मटा ' शी संवाद साधत होते .
निमित्त आहे त्यांच्या अठरा पुस्तकांच्या पुनर्प्रकाशनाचे . ' दमां ' च्या गाजलेल्या अठरा पुस्तकांचा संच मेहता प्रकाशनतफेर् आज ( सोमवारी ) रसिकांसमोर आणला जात आहे . वगनाट्यापासून ते विनोदी कथासंग्रहांपर्यंत विविध प्रकारातील पुस्तकांचा इरसाल पात्रांचा ग्रामीण शैलीतून मागोवा घेणाऱ्या ' दमां ' च्या गंमतगोष्टी , गुदगुल्या , चकाट्या , चुटक्याच्या गोष्टी , माझ्या बापाची पेंड , गावरान मेवा , विरंगुळा , नावेतील तीन प्रवासी , माकडमेवा , भोकरवाडीत अशा लोकप्रिय पुस्तकांचा यात समावेश आहे . सर्वच पुस्तके नव्या पद्धतीने प्रकाशित करण्यात आली असून यातील काहींसाठी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि . द . फडणीस यांनी मुखपृष्ठेही काढली आहेत . मेहता पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनातफेर् हा संच प्रकाशित करण्यात येणार आहे .
अजूनही तुमचा विनोद हसवणार का , असे विचारता ' दमा ' उत्तरादाखल खळाळून हसतात आणि सांगतात , ' चांगले साहित्य , विनोदनिमिर्तीला काळाची बंधने नसतात . त्यामधील मामिर्कता जोपर्यंत कायम आहे , तोपर्यंत तो खुलविणारा ठरतो . कॉलेजमध्ये प्राध्यापकी करताना हाच अनुभव घ्यायचो . पिढ्या , त्यांची भाषा बदलली , विनोद व्यक्त करण्याच्या तऱ्हा बदलल्या , तरी मामिर्कता कायम असेल , तर विनोदातील हास्याला पिढ्यांची कुंपणे राहात नाहीत .'
' शब्दनिष्ठतेसह इतर कोणत्याही विनोदाला काही मर्यादा पडते . अत्र्यांसारख्या भन्नाट व्यक्तिमत्त्वाचा झेंडूची फुलेमधील विनोद सध्याच्या पिढीला उमगत नाही . कारण , ते कशाचे विडंबन आहे , हेच त्यांना कळत नाही . याउलट मानवी स्वभाववैशिष्ट्यांवर आधारित विनोद काळाच्या कसोटीपलिकडे जातो . कारण , अगदी आदिमानवापासून अतिप्रगत यंत्रमानवापर्यंत स्वभावविशेष हे कायमच राहतात . माझ्या पुस्तकांमधून हीच स्वभाववैशिष्ट्ये , गुण - दोष टिपण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे सध्याची पिढीसुद्धा माझ्या विनोदाला तुफान दाद देते ,' असेही ' दमा ' स्पष्ट करतात .
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7750256.cms
No comments:
Post a Comment