subhash inamdar

subhash inamdar

Saturday, September 19, 2020

संगीत नाटकांची परंपरा सांगणारा सुरेख पट...

 




३० जून २०१७..

मराठी संगीत नाटकाची एकशे सत्तर वर्षांची परंपरा सांगणारा एक रंगमंचिय आविष्कार ललितकलादर्शची तिसरी पिढी म्हणजे बापुराव पेंढारकरांच्या नातवाने..ज्ञानेश पेंढारकर यांने नकताच भरत नाट्य मंदिरात खास पुणेकरांसाठी सादर केला.. जो वारसा त्याचे 
वडील भालचंद्र पेंढारकरांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या साथीने पुढे नेला तो... वारसा 
संगीत नाटकाचा...हेच त्याचे शिर्षक होते..

भरत वाक्यापासून भैरवीपर्य़तचा हा संगीत वारसा चार तासाचा कालावधी घेऊन खास इथे केला गेल्या त्याचे कारण त्यांच्या निवेदनातूनच स्पष्ट होते..बालगंधर्वभास्करबुवा 
बखलेवझे बुवाखाडीलकरगडकरी ...हे सारे दिग्गज या पुण्यातले..त्यांनी हे 
संगीत नाटक जागतिक क्षितिजावर फडकविले...त्यांना हा प्रयोग करून मानवंदना 
देण्याचा हा उद्देश होता..














नांदीदिंडीसाकी..पासून नाट्यपदांच्या विविध छटा या बैठकीच्या पदातून इथे ऐकवित असत..
.
मागे पडद्यावर त्या काळचे चेहरे..पेहराव..ते नट यांचाही इतिहास दिसत होता..कांही 
ठिकाणी ते सारे पडद्यावर ऐकविले देखिल..

ज्ञानेश पेंढारकरने निलाक्षी पेंढारकर या आपल्य़ा सुविद्य पत्नीच्या सुरेल
आवाजातून ही संगीत नाटकांची परंपरा उलगडून दाखविली..
आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जसा रसिकांचा स्पर्श झाला तसा तो पुण्यातल्या 
आणि मुंबईतल्या कलावंतांनीही हा प्रयोग पाहिला..

अगदी अखेरपर्यत..त्यात कीर्तीलता शिलेदारमधुवंती दांडेकरभास्करबुवा बखले यांंची नातसून लिखिका आणि गायिका शैला दातारविद्याधर गोखले यांची कन्या शुभदा 
आणि जावई श्रीकांत दादरकरगिरीजा काटदरे..असे कितीतरी..

रंगमंचावरही गायकात पंराम मराठे यांची पणती आदिती मराठे यांनाही त्यात सामिल 
करून घेतले होते..



ज्ञानेश पेंढारकरांनी अनेक नाट्यपदे उत्तम गायलिही..पण दुरितांचे तिमिर जावो मधले..आई तुझी आठवण येते..या पदांनी रसिकांच्या मनात त्यांचे स्थान अढळ करून टाकले..
निलाक्षी पेंढारकरांनी स्वयंवरमानापमान ते अखेरचा जोहार मायबाप..हा अभंग गाउन 
रसिकांना मोहात पाडले.
.
धनंजय म्हसकर यांनी कट्यार..ते मत्स्यगंधा मधील पदांना रसिकांसमोर मांडलेतर 
खास उल्लेख करावा लागेल तो निमिष कैकाडी यांचात्यांने गायलेली सगळी पदे 
रसिकांनी टाळ्यांचा गजरात दाद देत ऐकली.. काहींना तर वन्समोअर घ्यावाच लागला
तयारीचा दमदार आवाज यामुळे पुणकरांना ऐकता आला.













संकेत म्हात्रे आणि ऋग्वेदी प्रधान यांनी संवादातातून रसिकांना संगीत नाटकाचा इतिहास सांगितला..आणि अखेरीसया कार्यक्रमाची रंगत वाढविली किंवा ऐकावीसी वाटली 
ती उतम साथिदारांच्या संगतीमुळे


यात तबल्या धनंजय पुराणीकहार्मोनियम लिलाधर चक्रदेव  आणि ऑर्गनवर साथ 
करणारे पंगोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य मकरंद कुंडले..त्यांनी ऑर्गवर आपला सुरेल स्पर्श एका उत्तम नाट्यसंगीताच्या पदातून करवून दिला..




आपली संगीत नाटकांची परंपरा आता अशा बैठकीच्या कार्यक्रमातून का होईना..
काळानुरुप टिकविण्याचे आणि तो वारसा पुढच्या पिढीपर्य़त नेण्याचे कसब 
ज्ञानेश पेंढारकर आणि निलाक्षी पेंढारकर करताहेत... 
यासाठी त्यांनी खास शाबासकी.
आणि ही शाब्दिक दादही...



सुभाष इनामदारपुणे
subhashinamdar@gmail.com

संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होते-कीर्ती शिलेदार

 







कीर्ती शिलेदार यांचे अनुभवातून आलेले काव्यविषयक विचारदर्शन










( MONDAY, JULY 31, 2017 )


मल्हार कवीता..या कार्यक्रमाची सुरवात रविवारी  पुण्यात साहित्या परिषदेच्या सभागृहात कीर्ती शिलेदार यांच्या सन्मानाने झाली.. रंगत संगतचे प्रमोद आडकर यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्या जेष्ठ भगिनी दिप्ती किरण भोगलेही व्यासपीठावर होत्या..
तेव्हा रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीने केलेल्या सन्मानाचा मान राखत त्यांनी संगीत नाटक आणि पदांचे महत्व..यातून काव्य आणि साहित्य यांच्या आदानप्रदानातूनच उत्तम संगीत नाटक वा साहित्य बाहेर येते ते आपल्या मनोगतातून बोलून दाखविले..

संगीत नटालाही नायकातील पदांचा अर्थ उमजून मग त्यावर अभिनय करायचा असतो..नाटकातील रचना ही गेयच असावी लागते..आणि त्यातून अभिनयही करता यावा लागतो..

खाडीलकराच्या रचना थोड्या अवघड पण अर्थाने समऋध् होत्या आजही नाच्यसंगीतात खाडीलकरांच्या पदांची निवड केली जाते..असे सारे कीर्ती शिलेदार आपल्या विचारात स्पष्ट करतात..

त्याचा हा सारांश..



मी संगीत नाटकात काम करताना लक्षात येते की संगीत नाटकात जेवढे महत्व गद्याला आहे तेवढेच महत्व पदालाही  आहे..संगीत नाटकातली रचना ही गेय असावी लागते.. शब्दांचा अभ्यास करणे ही संगीत नटाची पहिली जबाबदारी असते.

संगीत नाटकात किर्लेास्कर मंडळींपासून हिच शिस्त नटांना आहे की काव्याचा भावार्थ आधी समजून घ्या मग नंतर  त्यावर तुम्हाला अभिनय करता येईलत्यामुळे पदांचा अर्थ कळाल्याशिवाय गायचे नाही हा दंडक नाना आईंनी किर्लोस्कर मंडळींपासून पाळला..तिच शिकवण आमच्या पिढीपर्य़त आली.

आम्ही कवींनी केलेल्या कवीतांपासून जरासे लांब असू पण नाटकामध्ये नाटककारांनी केलेल्या कवीतेशी आमचा खूप जवळचा संबंध आहेआमच्याकडे राम गणेश गडकरींसारखे काव्यप्रभू होते.  देवल आहेतकिर्लास्कर आहेतखाडीलकर आहेतबाळ कोल्हटकरांसारखा कवीलेखक मराठी रंगभूमीवर आले्ला आहे.  कवीवर्य रानापवारचिं.त्र्य़ंखानोलकरगंगाधर महांबरे हे सारे आमच्याकडे राहिलेले आहेत..त्यामुळे शब्दांची साधना हे लाकं किती करतातहे आम्ही तै अगदी जवळून अनुभवलेले आहे.

खानोलकरांचे अनुभव तर फारच  ग्रेटनिळकंठबुवा अभ्यंकर आणि खानोलकर यांच्या चर्चा व्हायच्या त्यातला क्षणन क्षण कानात साठवून ठेवला आहेआमचे बुवा शब्द गेय हवा यावर ठाम असत.. खानोलकर एकही शब्द इकडचा तिकडे करायला तयार नसतयेतो  येतो सजणा..सवतीचा वास तुझ्या वसना.. हि त्यांची शब्दरचना होती..बुवा म्हणाले वास म्हटल्यावर हे जरा विचित्र वाटतेहा शब्द बदला ना कवीराज.. बुवा म्हणालेखानोलकर म्हणाले गंध चालेल..चालेल म्हटल्यावर ते पद झाले..येतो रे येतो सजणा..  सवतीचा गंध तुझ्या वसना..असे पद कायम झालेनांदिच्या पदातला  कळा हा शब्द बदलालया मात्र खानोलकरांनी ठाम नकार दिला.. त्यांच्या मते.. कला सादर होत असताना नटाला आसंख्य कळा अनुभवाव्या लागतात तेव्हा तुमची कला पोहोचते
अशा चर्चेतून  आमचे जीवन समृध्द होऊन गेले..अभोगी नाटकाच्या तालमीमुळे.. अभोगी नाटकाने यश जरी दिले नसेल पण आमचे जीवन अगदी संपन्न केलेले आहे.
 


संगीतातून साहित्याचे आदानप्रदान होणे आणि त्यातून कलाकृती बाहेर येते हे फार महत्वाचे ...


 मीही एक लहानपणा कवीता करण्याचा प्रयत्न केला होता..बालवय आणि बालबुध्दी याच्यारलीकडजे त्याला काही अर्थ नव्हतामहांबरे कवीता लिहीतात मीही कवीता लिहिते..अशातून ती चूक घडली.


नवे संगीत नाटक करताना शब्द बदलण्याचे धाडस कधी केले..म्हणून मी किंचीत कवी असू शकेन.. शाळेत आमच्या कवीच्या जाणीवा समृध्द देल्या त्या  विमलाताई गरवारेतल्या वाभाजोशी सरांनीबालकवी आणि केशवसूत यांच्यावर शाळेत त्यांनी एक कार्क्रम शाळेत केला होतात्यात मी . लता सहभागी झालोत्यामुळे केशवसुतांचे काव्य अतिशय प्रिय झालेअजुनही त्या सुंदर कार्यक्रमाची आठवण माझ्या मनामध्ये  तशीच्या तशी कोरली गेलेली आहे.















मल्हार शब्द असेलेले नामदेवांचे काव्य त्यांनी शेवटी गाऊन दाखविले..





-सुभाष इनामदारपुणे
 subhashinamdar@gmail.com

साज आवाज.. एक धुंद मैफल

 






गायन वादनाचा एकत्रित आनंद देणारी मैफल


(ही मैफल 24 Jan. 2020 ला झाली )


शास्त्रीय गायन आणि वादनाचा आनंद देणारी संध्याकाळ पुणेकर रसिकांनी अनुभवली ती जयश्री कुलकर्णी आणि चारुशीला गोसावी या दोन रसिकप्रिय कलावंतांकडून.. आणि ती मैफल आपल्या शब्दातून रंगवीत होत्या विनया देसाई..

रागांच्या बंदिशी. त्यावर रचलेली गीते. कधी मोहरून यावी असे सुगम गीत तर कधी धुंद ऐकत रहावे असे नाट्यपद.. चारुशीला गोसावी यांचा व्हायोलिन वरील मनाला भिडणारा सुरेल आविष्कार. आणि त्यांना गायनातून प्रतिसाद घालणारा जयश्री कुलकर्णी यांचा कमालीचा तयार आवाज.


साज आवाज हे वेगळे नाव घेऊन रंगलेल्या या शुभारंभाच्या कार्यक्रमातील मधुवंती, पटदिप, यमन, चारुकेशी, रागेश्री, मियामल्हार..अशा रागांची कधी व्हायोलिनवरची सुरावट. तर कधी गायनातून रंगत गेलेली बंदिश..

 







स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना स्मरून कार्यक्रमातील विविध राग आणि त्यावर आधारलेली गाणी तेवढ्याच मेहनतीने हे दोन कलावंत जेंव्हा तल्लीन होऊन सादर करतात तेंव्हा ती स्वर नादमधुर होऊन रसिकांच्या ह्रदयाचा ठाव घेतो..आज गायन आणि वादनातून पुरेपूर उतरले असे म्हणावेसे वाटते.

कधी गळा डोलवत होता तर कधी व्हायोलीन ताल धरायला लावत होते.
मधुवंतीचे स्वर चारुशीला गोसावी ह्यांच्या व्हायोलिनमधून मनाचा ठाव घेत होते तर गीतरामायणातील निरोप कसला माझा घेता..जेथे राघव तेथे सीता.. ह्या जयश्री कुलकर्णी यांच्या गीताने वेगळीच स्वर ताल आणि रागाची पकड घेतली होती..



 शिवरंजनीतल्या निसर्गराजा.. या गाण्याच्या व्हायोलिन आणि गाण्याच्या अनोख्या जुगलबंदीने रसिकही भाराऊन गेले आणि टाळया बरोबर वन्स मोअर चा नारा बुलंद झाला..अनेक गाणी पुन्हा सादर करावी लागली.







विनया देसाई यांनी केलेल्या निवेदनातून तो फुलत गेला..आणि या कार्यक्रमाची पसंती रसिकांनी तेव्हाच दिली..ह्या वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमाला परदेशातही पसंत पडेल.. आम्ही तो तिथेही करून साज आवाजला प्रतिसाद दिला..



मराठी ,हिंदी अशा दोन्ही भाषेतील रसिकांना हा मोहिनी घालेल याची खात्री आहे.. मुख्य म्हणजे मर्यादित साथीदारांच्या संगतीने रंगणारा हा कार्यक्रम प्रसन्न बाम ( हार्मोनियम) वसंत देव( तालवाद्ये) आणि अभिजीत जायदे (तबला) यांच्या साथीने हा अधिक भारावून टाकणारा होता..




पुणेकर रसिकांच्या पसंतीला तो उतरण्यासाठी रवींद्र मेघावत याची ध्वनिव्यवस्था तवेढीच कारणीभूत ठरते..
गाण्यांची यादी देण्यापेक्षा तो पुन्हा आपणच अनुभवा असे माझे मत आहे..






- सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

24 Jan. 2020

गायक श्रीपाद भावे यांचे जाणे चटका लावून गेले!

खणखणीत आवाजाचे गायक श्रीपाद भावे गेले..

जानेवारी २० ..आणि तारीख होती १४ जयजयराम जयजयरामच्या गजराने श्रीपाद भावे यांनी पंचपदीची सुरवात केली..आणि उद्यान प्रसाद सभागृहातले वातावरण आपोआपच भक्तीरसात बुडून गेले..संतदर्शनचे संस्थापक श्रीराम साठे यांच्या स्मृतिदिनाचे निमित्ताने संतवाणी..साजरी केली जात होती..टाऴ मृदुंगाच्या साथीने कार्यक्रम बहरत जात होता.. 

आज आठ महिन्यांनी त्याची आठवण पुन्हा आली..कारण आज सकाळीच यातले दमदार आणि खणखणतीत आवाजात अभंगातून रसिकांना तृप्त करणारे गायक श्रीपाद भावे यांच्या निधनाची बातमी आली..त्यांचा तो जाहिरपणे झालेला कार्यक्रम पुन्हा मनात ताजा होऊन मनात ते स्वर आळवू लागला.. 

जयश्री कुलकर्णी यांच्या पुढाकाराने ही संतवाणी सादर झाली होती.. निष्ठापूर्वक गाणारा आणि सहजपणे आपल्या गायनात तन्मय होणारा श्रीपाद भावे..अभंग, नाट्यसंगीत..आणि भकतीगीते आपल्या जात्याच तयार असलेल्या
आवाजात सादर करीत असे.  

आपली महाराष्ट्र बॅंकेतली नोकरी निवृत्तीपर्यत प्रामाणिकपणे करून श्रीपाद भावे आपले गायनातील सौंदर्य रसिकांच्या पदरात आपल्यापरीने टाकत होते. 

भक्तीभावाने आणि तल्लीनतेने गाणे सादर करण्याचे कसब संतदर्शन मंडळाचे संस्थापक श्रीराम साठे यांनी तेव्हांच ओळखून त्यांना दरवर्षी होणा-या संतवाणीच्या संचात हमखास स्थान देत असत. छोटे माठे कार्यक्रमातून भावे यांचे दर्शन आणि त्यांची गायनातली तल्लीनता महाराष्ट्रातल्या रसिकांना आता कळून येत होती..
नोकरीच्या मर्यादा ओळखून ते गायनसेवा रुजू करीत असत.. 

नोकरीत असताना त्यांनी ज्या एकमेव संगीत नाटकात भूमिका केली त्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या कट्यार काळजात घुसली.. यात.. मीही त्यात एक कलाकार म्हणून सामिल झालो होतो. पंच्च्याहत्तर सालापासून श्रीपाद भावे यांच्याशी संबंध आला.. गाण्यासोबत अभिनयाचे अंगही त्यांच्यात होते..पण ते पुढे नाटचकाकडे अधिक वळलेच नाहीत.

 कट्यारमध्ये त्यांची खांसाहेबांचे शिष्य असलेल्या चांदची भूमिका छान होत असे. . आम्ही त्याचे पंचवीस तरी प्रयोग केले असावेत. 

सगळ्याशी मनमोकळे वावरणारे भावे..कलावंत आणि सहभागी तंत्रज्ञात लाडके होते.. निगर्वी स्वभाव ..मिळून मिसऴून वागण्याने भावे सर्वांना आपलेसे करत.. कसदारपणे तान घेणे आणि त्यातील स्वरात आपला ठसा उमटविणे हे त्यांचे विशेष गुण होते. अभंगातला ताल आणि स्वरातील भाव ते सहजपणे व्यक्त करत.. 

 श्रीपाद भावे यांच्या जाण्याने एक दिलदार मनाचा..मित्र गमावला यांचा निषाद वाटतो.. 

 वडीलांच्या वाहतूक व्यवसाला मदत करून प्रसंगी त्यांनी गाडीही चालविली आहे.कष्टाची तयारी आणि संघर्षमय आयुष्यातून वर येऊन ते आपल्या बंगल्यात उत्तम वास्तव्य करीत होते..

त्यांच्या या चटका लावून जाणा-या वृत्ताने संतवाणीतला खणखणीत आवाजाचा गायक हरपला आहे..
त्यांच्या स्मृतीस आदरांजली.. 

 - सुभाष इनामदार, पुणे..
 subhashinamdar@gmail.com

Tuesday, November 27, 2018

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे

 शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे



सर्व लोकप्रिय गायक ,वादकाना आपल्या व्हायोलिन साथीने मनमुराद आनंद देणारे रमाकांत परांजपे यांनी आपल्या साथीने सनई, सरोद, दिलरूबा,बासरी, सारंगी यांचा भास कसा घडवला याचे प्रत्यक्ष दर्शन पुणेकर रसिकांना घडविले.

नोव्हेंबर २४ला 'मुक्तसंध्या'मध्ये जेष्ठ व्हायोलिन वादक रमाकांत परांजपे यांचे व्हायोलिन वादन आणि गप्पा मनसोक्त ऐकता आल्या.संवादक आहेत अरुण नुलकर
यांनी त्यांना बोलते केले..














चतुरंग प्रतिष्ठान आयोजित एक संध्याकाळ एक कलाकार मध्ये रमाकांत परांजपे यांनी आपण आजोबा नरहरबुवा पाटणकर यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतले. आरंभी तबला मग पेटी आणि शालेय वयातच व्हायोलिनकडे कसे आकर्षित झालो याची आठवणही त्यांनी सांगितली.

त्यांच्याच शब्दा नेमके सांगायचे म्हणजे..




आरंभी गोपल गायन समाजात गायन. पेटी वडीलांनी शिकविली. रामभाऊ आठवले यांचेकडे तबल्याचे धडे गिरविले. नूमवि शाळेत स्नेहसंमेलनात एका मुलाचे व्हायोलिन पाहिले. ते आवडले. म्हणून वडिलांकडे हट्ट केला . मला हे शिकायचे आहे. घरात धुळखात पडलेले दुरुस्त करून भास्करराव चिरमुले यांचेकडे सारेगमपासून शिकलो. संगीताची पार्श्वभूमि   तयार असल्याने ते शिकायला वेळ लागला नाही.





व्हायेलिनमध्ये सूर शोधावा लागतो..खरे तर ही तारेवरची कसरत आहे. सूऱ शोधावा वागतो.  कुठे बोट ठोवायचे ते कानानी ठरवायचे आसते. किंचित जरी इतर ठिकाणी बोट गेले की सूर बेसूर होतो. त्यासाठी कानही तयार लागतात.

हे वाद्य आपल्याकडे अतिप्राचिन काळीही होते. अगदी रावणाच्या काळातही त्याला रावणहत्ता म्हणत असत. भरताच्या नाट्यशास्त्रात याचा उल्लेख आहे. सारी तांत्रीक माहितीही ते इथे सविस्तरपणे देत होते. ते इतर देशात फिरत युरोपमध्ये गेले. आणि आजचा आकर्षक आकार युरोपमध्ये  तयार झाला.  हे वाद्य आकाराने छान. सुटसुटीत.त्यात आवाजाचे माधुर्य आहे. हे विश्ववाद्य आहे असे समजतात. जगात त्यांच्या संगीतात वेगवेगळ्या प्रकारे या वाद्याचा उपयोग केला जातो. या वाद्याविशयी मला माझे गुरुजी शंकरराव बिनिवाले यांनी सारे काही शिकविले. ते इटलीला जावून पाश्चात्य संगीत शिकून आलेले होते.



कुठल्याही कार्यक्रात रंमाकांत परांजपे यांचा सूर योग्य समजला जातो. त्यांचा होकार मिळाल्यवरच इतर वादक त्याचे अनुकरण करतात. अरूण नूलकर यांनी परांजपे यांचेबाबत आपली टिपणी केली.

यावेळी परांजपे यांच्या स्वरलिपीचेही वेगळेपण रसिकांना उमगले.आणि व्हायोलिनवरच्या त्यांच्या अभ्यासाविषयीही शब्दातून आणि स्वरातून काही ऐकता आले.


केवळ गाणेच नाही तर गाण्यातली जोडाक्षरेही व्हायोलिनमधून आपण  हुबेहुब काढायचा कसा प्रयत्न कसा करतो ते पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा हे गीतरामायणातले गाणे वाजवून रसिकांना त्यांनी दाखवून दिले.


गेली ५८ वर्षे ते व्हायोलिन वादनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून आहेत. आपण कसे घडलो..या वादनात कसा अभ्यास केला. याविषयी ते मनमोकळे बोलले. अरूण नूलकर यांनी प्रश्न विचारून त्यांच्या कलेचे यथोचित दर्शन घडविले.



यावेळी धाकटे बंधू विवेक परांजपे आणि मुलगा केदार परांजपे हेही खास हजर होते.
केदारने तर त्यांना काही गाण्यांसाठी मदत ही केली होती.

शब्द आणि स्वर यातून रंगलेली ही मुलाखत कायम लक्षात राहील. नेहमी वाद्यातून बोलणाऱ्या कलावंताला बोलते केले याबद्दल चतुरंग परिवाराचे आभार मानावे लागतील.

शब्द स्वरातून उमगलेले..रमाकांत परांजपे
एक झलक या लिंकमध्ये ऐका







-सुभाष इनामदार, पुणे
Subhashinamdar@gmail. com

Sunday, August 26, 2018

लता,आशा सोडून उत्कृष्ठ गायिका म्हणजे अनुराधा मराठे


माझ्याबरोबर जेवढ्या रंगमंचावर गायिका गायल्यात त्यात लता मंगेशकर आणि आशा भोसले सोडून अतिशय उत्कृष्ट गायिका म्हणजे अनुराधा मराठे..

बाळासाहेंबाकडून असा आशिर्वाद मिळणे म्हणजे त्यांंना संगातातली पद्मश्री मिळविल्यासारखेच आहे. तुम्ही उत्तम गाता. जोपर्य़त गाउ शकता तो पर्य़त .. आप गाती रहो..असा अशिर्वादही त्यांनी दिला.

ह्रदयनाथ मंगेशकर यांनी जाहीरपणे अनुराधा मराठे यांची मोकळेपणाने स्तुती केली आणि अनुराधा मराठे यांच्या गायनसेवेचे चीज झाल्याची पावती रसिकांनी टाळ्या वाजवून दिली..

निमित्त होते.. अनुराधा मराठे यांनी लिहलेल्या 'स्वरानुराधा ',
या अनुबंध प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्मकथनाच्या पुस्तक प्रकाशनाचे..

\




ज्येष्ठ पत्रकार, कवी विजय कुवळेकर यांनी अनुराधाबाईंच्या पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगताना त्यांचा साधेपणा. निर्मळपणा.सहजता. आजच्या समाजजिवनामध्ये विशेषकरून कलेच्या जीवनामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत.जवळजवळ चाळीस वर्ष त्या सातत्याने त्या जपताहेत. संगीताचे प्रवाह बदलले. काळाचे प्रवाह बदलले. पिढ्या बदलल्या. अनुराधाबाई नवनव्या गायक गायिकांसमवेत गात राहिल्या. नवं आत्मसात करत राहिल्या. मात्र त्यांनी त्यांच्या स्वभावाचा आणि संगीताचा पोत कायम ठेवला. त्यांच्या इतकेच पुस्तक कुठलाही आविर्भाव न आणता जसे आयुष्यात प्रसंग घडत गेले तसे सहज यात टिपल्याचे म्हटले आहे.

हे आत्मचरित्र आपल्याला खूप आवडले कारण ते खूप साधे आहे. वहात्या पाण्यासारखा त्यात एक ओघ आहे..मुख्य म्हणजे त्यात कुठलाही आभिनिवेश नाही. गम आणि खुशी एकाच मापात मोजणारे हे अनुराधा मराठे यांचे वास्तव मनाला भिडून जाईल असे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनी सांगितले..

नेहा वैशंपायन यांनी शब्दांकन केलेल्या पुस्तकाच्या आजच्या विक्रीतील निम्मी रक्कम केरळच्या पुराग्रस्तांच्या निधीसाठी देणार असल्याचे अस्मिता कुलकर्णी यांनी जाहीर केले.

स्नेहल दामले यांनी प्रकाशन सोहळ्याला सहजपणे पुढे नेले.
अनिल कुलकर्णी यांनी पुस्तक करतानाचा आनंद व्यक्त केला.



गाता गाता सहज .. या कार्यक्रमातून अनुराधा मराठे यांनी रमण रणदिवे यांची रचना ज्याला संगीत दिले होते गजानन वाटवे यांनी.. जयदेव, चंद्रशेखर गाडगीळ, गिरीश जोशी या संगीतकारांच्या रचना सादर केल्या..

चाळीस वर्षांचा गाण्यांचा प्रवास त्यांनी आपल्या पुस्तकातून सहजपणे मांडला आहे.
तसा तो संवादकौशल्य असलेल्या जेष्ठ अरुण नुलकर यांनी अनुराधाबाईंच्या सहज , मृदू स्वभावापणे हलक्याफुलक्या गप्पातून उलगडत फुलवून नेला. केदार परांजपे, निनाद सोलापूरकर, उद्धध कुंभार आणि अजय धोंगडे यांनी साथसंगत केली.

चैतन्य कुंटे, अनुराधा कुबेर, संगीतकार नरेंद्र भिडे, शैला दातार, सुधीर गाडगीळ आणि अनुराधा मराठे यांच्या कुटुंबीयांनी पडद्यावर त्यांच्या स्वभावातील वेगळेपण आणि गायनसेवेचे व्रत घरातल्या कुणाच्या कपाळावर आठ्या न आणता कसे जपले याचे वर्णन केले.
यावेळी त्यांना साथ केलेल्या आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांनी अनुराधाबाईंच्या गुणाचे जाहीर आभार मानून त्यांच्या विसराळू पणालाही टोमणा मारत मानपत्र तबला वादक अजय धोंगडे यांच्या हस्ते दिले.

आपल्याला गायला मिळते याचा आनंद घेताना शास्त्रीय संगीत कसे मागे पडले आणि सुगम संगीताची वाटचाल कशी होत गेली याची माहिती सहजपणे कार्यक्रमातून रसिकांना उमगली.



- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com