subhash inamdar

subhash inamdar

Monday, December 26, 2011

योग्य वयात तरुणांच्या पाठीवर शाबासकी थाप

`स्वरानंद` या पुण्यातल्या संस्थेने आपल्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त चार तरुण कलावंतांना त्यांच्या संगीत क्षेत्रातल्या कामगिरीचा गौरव पुरस्कार देऊन सोमवारी २६ डिसेंबरला (२०११) केला. यात

गायक आनंद भाटे,


संगीतकार निलेश मोहरीर,



रसिकप्रिय गायिका योगिता गोडबोले-पाठक, आणि



गिटारवादक ज्ञानेश देव

यांना संगीतकार आनंद मोडक यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचवेळी सरदेशमुख महाराज आणि युसूफभाई मिरजकर यांच्या स्मृतीनिमित्त २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती कोल्हापूरची हार्मानियम वादक मुलगी शामिम मोमिन हिला याचवेळी प्रदान करण्यात आली.



ज्यांच्या अनेक रचनांनी मराठी मनावर भूरळ घातली असे संगीतकार यशवंत देव या समारंभासाठी तब्येत बरी नसूनही हजर होते. त्यांनीही या समारंभात आपले मनोगत मांडले . त्यांच्या मते गुरू तुम्हाला मार्ग दाखवितो. पण तुम्ही स्वतः त्या मार्गावर चालायचे असते.. पुरस्कार मिळालेल्या कलावंतांच्या वतीने योगिता गोडबोले-पाठक यांनी अशा पुरस्काराने बळ मिळते. कौतुकाची थाप माठीवर पडते. त्यामुळे पुढच्या काळासाठी एक जिद्द निर्माण होते... रसिकांचे रंजन करण्य़ासाठी प्रोत्साहनही यातून मिळते...


स्वरानंदचे प्रकाश भोंडे यांनी संस्थेत वीसएक वर्ष विविध कार्यक्रमातून व्हायोलिनची साथ करणारे निष्ठावान कलाकार पं. भालचंद्र देव यांचा त्यांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्त य़शवंत देवांना त्यांचा सत्कार करण्याची विनंती केली. भोंडे यांनी असे निष्ठावान साथीदार मिळाले हे संस्थेचे भाग्य असल्याचे सांगितले.. आणि त्यांची

पं. भालचंद्र देवांची कन्या सौ. चारुशीला गोसावी हिचाही उत्तम व्हायोलिनची साथ करणारी स्वरानंदची कलाकार म्हणून रसिकांना परिचय करुन दिला.


एकूणच सुगम संगीच्या क्षेत्रात ४१ वर्षे सातत्याने काम करणारी ही `स्वरानंद` आजही वेगवेगळे उपक्रम घेऊन मराठी रसिकांची पसंती मिळविते... दरवर्षाला नवीन आणि ज्यांची कला रसिकांनी पसंत केली आहे आणि ज्यांच्या गायनात, वादनात ,कलेत उद्याची उमेद आहे आशा तरुण कलावंतांचा पुरस्कार देऊन गौरव करते....


हे संगीतकार आनंद मोडक यांच्या शब्दात सांगायचे तर....`योग्य वयात या तरुणाईच्या पाठीवर शाबासकीची थाप संस्था देत आहे..हे उचित आहे. त्यांच्या प्रवासाच्या योग्य वयात त्यांना शाबासकी दिली जाते. तरुणाईत दिलेले पुरस्कार महत्वाचे वाटतात`.... असा उल्लेख केला.


पुरस्कारानंतर सर्वच पुरस्कार विजेत्या कलावंतांनी आपल्या गुणांची उधळण आपापली पेशकश सादर करुन रसिकांची दाद घेतली. या सर्वच कार्यक्रमाची सूत्रे अरुण नूलकर यांनी पुणेरी चिमटे काढत कार्यक्रम य़शस्वी करण्यात मोलाची भर घातली.



सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596176

Friday, December 23, 2011

खरी कला आणि खरा कलाकार

नटसम्राटाचे चिंतन....



`कलायात्री` हा संस्कार भारतीनं
केलेला फार मोलाचा उपक्रम आहे...


कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराच्या
कलाजीवनांत खोलवर शिरुन विचार व्हावा.
करायचे ठरविले तर ते जरुर करता येईल.
वास्तविक कलाकार हा गौरवार्थी शब्द आहे.


खरा `कलाकार` म्हणजे कोण ?
तर `तो` एखाद्या कलेनं भारलेला आहे.
त्या कलेचा त्याने ध्यास घेतलेला आहे तो !
जो आपल्या कलेद्वारे आपले म्हणणे प्रभावीपणे,
परिणामकारकरित्या मांडू शकतो तो !
अंगभूत प्रतिभेचे दर्शन जो घडवू शकतो , तो !
त्याला कालाकार म्हणता येईल.

कला म्हणजे काय ?
याची व्याख्या सांगणं फार अवघड आहे.
मलाही खरं तर ते निटसं सांगता येणारं नाही.
चित्रकला पाहिली तर भिंती, पाट्या रंगविणा-या पासून
पिकासो सारख्या जगद्विख्यात चित्ररकारापर्यंत सारे कलाकारच आहेत.
मॉडर्न आर्टही त्यातच येते.

मग ख-या प्रतिभावंताचे जी कला अंगीकारली, त्यात प्रगती करावी
त्या कलेमध्ये रमून जावे. सामाजबांधिलकीची जाण ठेवून स्वतःच्या बुध्दीला पटेल तेच करावं,
ती खरी कला आणि ते खरा कलाकार !

तर, प्रामाणिकपणे स्वतःचा शोध घ्यावा. कलात्मक आनंद मिळवावा.
त्यात्तली आद्भूतता अनुभवावी, आणि निर्मिती करावी...




-डॉ. श्रीराम लागू.

कलायात्री...दैनंदिनी २०१२ मधून साभार
संस्कार भारती,(पश्चिम प्रांत)

वेळेचे भान अन् रसिकांची सल

वाढलेल्या पुणे महानगरात संध्याकाळी-रात्री ८ नंतर रिक्षा मिळणे ही एक कठीण आणि धावपळीची गोष्ट आहे. पैसा तर जातोच पण अनेकविध संवादांची देवाण घेवाण होते. याचा फटका बसतो तो पुण्यात दररोज होणा-या विविध कार्यक्रमांना. मनात इच्छा भरपूर असते पण परत घरी जायचे कसे हा प्रश्न कार्यक्रमातही सतावतो. याची दखल वाहन सेवेनी आणि कार्यक्रमांच्या आयोजकांनी घ्यावी यासाठी लेखन प्रपंच.....




शहर वाढले. पसरले. अगदी नको तेवढ्या प्रमाणात विस्तारलेही. पण अनेकविध कार्यक्रमांच्या दृष्टीने सारे जणू एकवटले गेले ते पुणे शहराच्या महत्वाच्या भागात. पुण्यातल्या कार्यक्रम स्थळांचा विचार केला तर....

एस. एम. जोशी सभागृह,
निवारा वृध्दाश्रम,
पत्रकार संघाचे सभागृह,
लोकमान्य सभागृह, नारायण पेठ,
भरत नाट्य मंदीर, सदाशिव पेठ,
भारत इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ,
बालशिक्षण संस्थेचे, मयूर कॉलीनीतले सभागृह,

याशिवाय बालगंधर्व रंगमंदिर आमि य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह आहेतच....

पण प्रत्येक ठिकाणापासून घरी परतणा-या रसिकांची, वाचकांची, श्रोत्यांची निरासा होते, जेव्हा कार्यक्रम संपवून ते घरी जायला निघतात.
रिक्षावाल्यांशी सुसंवाद घडून त्यांची घरी जाण्याची सोय होण्यासाठी खदी कधी तर रक्तही आटवावे लागते....मिलाली बुवा एकदा रिक्षा....असे हुश्श...व्हायला होते..पण बरेचवेळा जायची मोठी पंचाईत. आठ-साडेआठनंतर होते. कधातरी सुखद अनुभवही येतो..पण तो विरळाच...
बर- सार्वजनिक वाहने सेवा तरी धड आहे....वेळेवर आहे..की सगळ्या रुटला जाणा-या बसेस आहेत...विसरा ते सारे... इतर साधनेही तशी दुबळीच...
मात्र थोडा दिलासा यात संयोजक आणि कार्यक्रमाचे आयोजकच देऊ शकतील. जर त्यांनी ठरविले की कार्यक्रम वेळेत सुरू ,करून वेळत संपवायचा.... तरच.
अनुभव असा की ५ ची वेळ असली तर समजावे ५.३० शिवाय जाण्यात काही अर्थ नाही.
सहाचा असेल तर साडेसहा धरुन चाला..
तीच गोष्ट वेळत सुटण्याची... तिकडेही कानाडोळा होतो..कलावंताच्या आणी रसिकांच्या आग्रहामुळेही कार्यक्रम लांबतो....आणि कधी कधी संयोजकांच्या हाताबाहेरही जातो...
संयोजक मंडळी याबाबत वेळेचे बंधन पाळले..तर रिक्षाही किंवा इतर सुविधा घरी जाणा-यांना सहजपण मिळतील.
खरं म्हणजे येणारा प्रेक्षक अनेक आवडत्या मालिका टाळून ...तकर कुणी घरचे अर्धवट टाकून....तर इतर मोहातून वेळ काढून खास कार्यक्रमांसाठी गर्धी करतात..तो तन्मयतेने ऐकतात...
मात्र वेळेचे गणीत आणि नाघण्याची वेळ जुळली की सारे कसे सुरळीत..होईल...
पाहू या या आमच्या विचाराची दिशा कोण पकडतो ते...मात्र काळाप्रमाणे फार लांबलेला कार्यक्रम कंटाळवाणा ठरतो..तर वेळेत सुरु झालेला कार्यक्रम आयत्यावेळी गुंडाळाव लागतो...
काय आमचे हे टिपण दखल घेण्यासारखे वाटते काय...?
असल्यास प्रतिक्रिया कळवा..मी ते संयोजकांपर्यत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 22, 2011

किरणांच्या छेडीत तारा....




पुण्याच्या प्रतिभा इनामदार यांनी दोन प्रतिभावंतांना वाहिलेली ही स्वरांजली...अतिशय बोलकी आणि हळवी आणि शब्द स्वरांच्या दोन नायकांना त्यांच्या आठवणी जागवून सादर केलेली आदरांजली.

महांबरेंच्या तिस-या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रतिभा संपन्न कवीला आदरांजली वाहतांना त्यांचे स्मरण करत खळे काकांच्या प्रतिभेचा साक्षात्कार घडविला तो या पुण्याच्या कलावंतांनी आणि प्रतिभा इनामदार यांच्या सहगायकांनी...

किरणांच्या छेडीत तारा..कंठातच रूतल्या ताना..पूर्वेच्या देवा तुला..देवाघरच्या फुला..धुंद धुंद ही हवा..पाण्यातले पाहता..आणि रसिका तुझ्याचसाठी सारखी एकापेक्षा एक श्रेष्ठ काव्ये जी पुढे गीते झाली ता सारी इथे लोेकमान्य सभागृहात गुरुवारी सादर झाली. पुणेकरांनीही त्याला भरभरुन प्रतिसाद दिला.





श्रीनिवास खळे आणि गंगाधर महांबरे यांची मैत्रीही तेवढीच..निरंतर...खळे बरेच वेळेला आजारी असायचे...पण महांबरे गेल्यानंतर महांबरेंच्या पत्नीला फोन करुन दिलासा देताना त्यांनी आवर्जून विचारले कशानं गेले हो....बोलतानाही त्या आठवणीत स्नेह होता.....

खळे काका आमच्या घरातलेच होते. लता मगंशकर आणि भीमसेन जोशी या दोघांनी आपली गीते गायल्याचे समाधान दोघांनाही होते.जाहल्या कांही चुका या गीतांच्या रेकॊर्डिंग वेळी बरे नव्हते तरी खळे काका हॊस्पीटलमधून कसे आले याची आठवण श्रीमती महांबरे यांनी सांगीतली.
जुने विसरताना दुःख होते...पण ते स्मरतानाही आनंद होतो...या कार्यक्रमाने तो दिला.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Wednesday, December 21, 2011

शास्त्रीय वाद्यवृंद रचनांचा आविष्कार

शास्त्रीय संगीतावर आधारित व्हायोलिन, सतार, हार्मोनियम, बासरी आणि तबला अशा वाद्यातून सादर केलेला आविष्कार शुक्रवारी पुरुषोत्तम गोडबोले यांच्या संकल्पनेवर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गांधर्व महाविद्यालयात ( शनिवार पेठ, मेहुणपुरा) संध्याकाळी ६ वाजता सर्वासांठी सादर होत आहे.

गांधर्व महाविद्यालयाच्या ८० व्या वर्षातील विविध उपक्रमांतर्गत हा खास कार्यक्रम आयोजित केला आहे.


वडिलांकडून आलेला संगीताचा वारसा जपत आणि संगीत नाटकात आपल्या गायनाने छाप पाडणारे गायक नट कै. उदयराज गोडबोले यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन संगीताची ही परंपरा पुरुषोत्तम गोडबोले यांनी जपली, वाढविली. वडिल एके काळी सांगली संस्थानचे मातब्बर गायक. त्यांनी १९४६ साली वालचंदनगरला वाद्यवृंद रचनांचा कार्यक्रम केला होता. पुरुषोत्तम गोडबोले यांच्या वयाच्या १० व्या वर्षीचा तो ठसा पक्का बसला. स्वतः व्हायोलिन, हार्मोनियम तरुण पिढीला शिकवताना आपणही असा शास्त्रीय संगीतावर वाद्यवृंद तयार करावा अशी संकल्पना आली. त्यातूनच वाद्यशिकणारे कलावंत एकत्र करुन त्यांनी हा रागदारीवर आधारित वाद्यवृंद रचना बसविल्या. अनेक ठिकाणी या कार्यक्रमानंतर मिळालेली पसंती पाहून तोच पुढे नव्या रचनांची भर घालीत त्यांनी तो सिध्द केला आहे.

`स्वर संवाद`, प्रस्तुत या वाद्यवृंद रचनांच्या कार्यक्रमात सहभागी कलावंत आहेत – पुरुषोत्तम गोडबोले, अशोक पटवर्धन, निकिता गुंदेचा (व्हायोलिन), निलिमा कुलकर्णी, कांचन खाडीलकर (सतार), माधवी करंदीकर, देवेंद्र पटवर्धन, हेमा कुलकर्णी (हार्मोनियम), अजरुद्दीन शेख (बासरी), अनिल दोशी, अभिजित पानवलकर (तबला) आणि निवेदक आहेत ज्योती परांजपे.

वयाच्या ८०व्या वर्षीही पुरुषोत्तम गोडबोले नविन कल्पना या माध्यमातून साकार करुन रसिकांची दाद घेत आहे. य़ापूर्वी १९८१ ला गानवर्धनच्या मंचावरही त्यांचा असाच आविष्कार गाजल्याचे रसिकांच्या लक्षात असेल.


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
mob- 9552596276

Saturday, December 17, 2011

कविता माझी अवस्था- मयुरेश कुलकर्णी

`एकांतील ओळी` केपटाऊनला संशेधनसाछी वास्तव्य असलेल्या मयुरेश कुलकर्णी यांच्या चारोळीच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचा घाट पुण्यात काल्हापूरच्या मुक्ता पब्लिकेशनच्या वतीने शक्रवारी संध्याकाळी पुण्यातल्या एस एम जोशी सभागृहात घातला होता.

लग्नाच्या धामधुमीचे दिवस असल्यामुळे वाचक, रसिक मोजकेच होते. पण जे होते ते मयुरेशच्या शब्दांच्या प्रेमतच पडले....

साधी भाषा. थेट भिडणारी साधी बोली. जे सांगायचे ते मोजक्याच पण तकेवढ्याच तिडकीने सांगणा-या ओळी...अशा मस्त मजेशीर शब्दांची ओंजळ घेऊन तो सभागृहाच्या व्यासपीठावर एकटा लढत होता. प्रेक्षकही तेवढेच मश्गुल होऊन..प्रेम, वेदना, राग, हुरहुर, दुखः, एकाकीपण आणि आई-वडीलांविषयीच्या आदराच्या भावना ऐकत होते..आणि दादही देत होते.

आपण कविता करतो कारण सांगता तोच म्हणतो....

कविता माझी अवस्था
जे बोलता येत नाही
ते लिहितो मी
अशीच आहे व्यवस्था


असाच मैफलीतून एकोक चारोळी आणि कवितांची पामे उलगडत मयुरेश शब्दांवहोवर रसिकांच्या मनॉतले भावही टिपत होता जणू. पीएचडी करण्यासाठी वास्तव्य करणारा हा मयुरेश केपटावूनमध्ये बसून मराठी भाषेतल्या संवेदना तेवढ्याच उत्कटपणे चारोळींतून सागत होता...

ग्रंथासाठी लिहितो न मी
पुस्ककासाठी मी ना लिहितो
माझ्या मनातले मी
माझ्यासाठी लिहितो



कवितांचा खेळ पुस्तकरुपाने मुक्ता पब्लिकेशन्सने प्रकाशित केलाय. यापूर्चाही `शोध मनाचा` हे पुस्तकही त्यांनीच त्याच्या रचनांवर भारावून जावून काढले होते. मुक्ताच्या वतीने संचालिका विजया पाटील .यांनी त्यांचे कौतूक करताना `मराठी भाषेवर तिथे राहून प्रेम करणारा मुलगा `म्हणून खास शब्दात ओळख करुन दिली. आम्ही काही पुस्तके व्यवसायाचा विचार न करता वेगळी पण तरुण, नवोदितांना संधी देण्यासाटी काढतो असेही त्या म्हणाल्या.

एकांतातल्या ओळीचे प्रकाशन मयुरेशच्या आजी श्रीमती विजया कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
एक भावपूर्ण पण मराठी भाषेवर प्रेम करणा-या उद्याच्या पिढीसाठी आणि पिढीच्या भावनांसाठी झाले ,
याचे वेगळेपण हेच सांगावे लागेल.


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


मयुरेश कपलकर्णीचा हा ब्लॊग पहा...

(http://mayureshkulkarni.wordpress.com)

Friday, December 16, 2011

नानामय पुलोत्सव

पु. ल. देशपांडे, विजयाबाई मेहता, कुसुमाग्रज, आरती प्रभू यांच्या नावाने घटकेत हळवा होणारा... त्यांनी दिलेले भरभरून वेचणारा तरीही, आपण कितीसे घेऊ शकलो हा प्रश्‍न पडलेला... समाजाला आपण दिलेच पाहिजे, देतो म्हणजे उपकार करत नाही, हे ठामपणे ऐकवणारा आणि नाटक-चित्रपट करताना घडलेले किस्से सांगताना प्रेक्षकांना खळाळून हसविणारा... नानाची नाना रूपे... त्यातीलच काही रूपांना श्रोत्यांनी आज पुन्हा पाहिले आणि पुन्हा नानामय होण्यात धन्य मानले. निमित्त होते पु. ल. स्मृती सन्मानचे...

"

तरुणाई'चे उद्‌घाटन व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी नाना पाटेकर यांना पु. ल. स्मृती सन्मान व आर. के. लक्ष्मण यांना विशेष पुरस्कार रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी श्रीकांत गद्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत नानाचा एकपात्रीचा अनुभवच रसिकांनी घेतला. काव्यवाचनात आपल्या तरल मनाचे प्रतिबिंब उमटविणारा, पूर्वाश्रमीच्या देण्याने कृतार्थ असल्याची भावना व्यक्त करणारा आणि दुसऱ्याची टोपी उडविणारा खट्याळ अशा नाना रंगात रसिक रंगून गेले. आपल्या शिष्याला पुरस्कार देताना मेहता यांनीही गुरूच्या अधिकाराने पहिल्यांदा कान पिळले आणि नंतर प्रेमाने जवळही घेतले. पाटेकरही मग लहान झाले. पाया पडलेच होते; पण बाईंच्या उंचीपेक्षा लहान दिसावे म्हणून गुडघ्यात वाकून "बाल' झाले.

वडलांच्या नावाने पुरस्कार मिळाला, असे कृतार्थतेने सांगत पाटेकर म्हणाले, ""पितृसमान असलेल्या पुलंच्या लेखनावर आमचा पिंड पोसला गेला. त्यांनी पुस्तकात जी माणसे लपविली, ती मला कधी एकटे पडू देत नाहीत. पुलंच लेखन कधीच एकपदरी वाटले नाही. विजयाबाई या चालतीबोलती शाळा आहेत. आम्ही नेमके कोण आहोत, हे माहीत नसताना आमच्याकडून त्यांनी काढून घेतले.''

नाटकाच्या तालमी, दौऱ्याचे किस्से केवळ ऐकवत नव्हे; तर उभे राहून रंगमंचावर साकारत त्यांनी रसिकांना जणू आपल्याबरोबर त्या काळात नेले. पुरुष नाटकावेळी बायका माझ्यावर खूप चिडायच्या असे सांगत, 5-6 वेळा रंगमंचावर आलेल्या चप्पल "पुरस्कार' म्हणून जपल्याचे मनमोकळेपणे सांगितले.
परकाया प्रवेश करतो तो चांगला अभिनेता, असे सांगत, नानाला हे जमले अशी शाबासकीही मेहता यांनी दिली.

http://www.esakal.com/eSakal/20111217/5158034451279370942.htm